लिंगावर सूज - Penile Inflammation (Balanitis) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 27, 2018

March 06, 2020

लिंगावर सूज
लिंगावर सूज

लिंगावर सूज म्हणजे काय?

बॅलेनीटीस म्हणजे ग्लान्स पेनिस (पुरुषांच्या जननेंद्रियाचे पुढील टोक) ला सूज येणे. ही सुंता न केलेल्या (बाह्यत्वचा न काढलेल्या) पुरुषांमध्ये, अस्वच्छता आणि यीस्ट जमा होणे तसेच बाहेरील त्वचेखालील इतर सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणारी सर्वसामान्य स्थिती आहे. यामुळे बॅलेनोपोस्थिटीस (पुरुषी जननेंद्रियाचे पुढचे टोक आणि बाह्यत्वचेला सूज) तसेच जननेंद्रियाच्या आजूबाजूच्या पेशींना सूज येते. एचआयव्हीमधुमेह आणि कर्करोग बाधित इम्युनोकॉम्प्रोमाईज्ड व्यक्तींमध्ये हे खूप सहज आढळून येते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बॅलेनीटीसमध्ये दिसून येणारे वैद्यकीय लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • खाजवणे.
  • कोमलता.
  • त्या जागी दुखणे किंवा ताठ होताना दुखणे.
  • लालसर होणे आणि चट्टे येणे.
  • सूजणे.
  • उग्र वासाचा स्त्राव होणे.

बॅलेनीटीसमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांशी साधर्म्य असणारी इतर लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • फिमोसीस (बाह्यत्वचेचा घट्टपणा).
  • पॅराफिमोसिस (मागे घेतलेली बाह्यत्वचा तिच्या मूळ जागी खेचली जाऊ शकत नाही).

याची मुख्य कारणं काय आहेत ?

हे सहसा पुरुषी जननेंद्रियाच्या टोकावरील त्वचेवर आढळणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या अतिरिक्त वाढीमुळे निर्माण होते. उबदार, ओलसर वातावरण अश्या सूक्ष्मजंतूच्या वाढीला अनुकूल बनवते. हे प्रामुख्याने कॅनेडियन अल्बायकंस या विषाणूच्या संसर्गामुळे होते. मधुमेहासारखी परिस्थिती आणि विशिष्ट त्वचा स्थिती बॅलेनीटीस निर्माण करू शकते आणि अधिक बिघडवू शकते. अस्वच्छतेमुळेदेखील बॅलेनीटीस होऊ शकतो. बाह्यत्वचेखाली घाम, जीवाणू, (त्वचेचे) एकावर एक थर आणि मृतपेशी जमा होऊ शकतात, ज्यामुळे खाज आणि जळजळ होऊ शकते. बाह्यत्वचेच्या घट्टपणामुळे ही समस्या वाढू शकते कारण तो भाग व्यवस्थित धुतला जाऊ शकत नाही.

इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • त्वचारोग/ॲलर्जीची परिस्थिती: साबण, सुगंधी द्रव्य/अत्तर/परफ्युम, कपडे धुण्याची पावडर आणि शुक्राणुनाशक यांच्या संपर्कात आल्यामुळे  त्वचेला सूज येणे, ज्यामुळे चट्टे येतात आणि जळजळ होते.
  • संसर्ग: काही लैंगिकतेमुळे पसरणारे रोग जसे की गोनोरिया, हर्पिस आणि सिफिलीस बॅलेनीटीसची लक्षणे निर्माण करतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

बॅलेनीटीसचे निदान यावरून केले जाते:

  • वैद्यकीय/चिकित्सक लक्षणे: एरीथेमाटस चट्टे सोबत खाज आणि वेदना.
  • दर्शनी भाग: छोट्या पॅपुल्ससहित लाल डाग किंवा चमकणारा फिकट लाल दर्शनी भाग.
  • मायक्रोस्कोपी: संसर्गास कारणीभूत जीवजंतू ओळखणे.
  • त्वचेची बायोप्सी: निदान अद्याप अस्पष्ट असेल तरच.
  • मूत्र विश्लेषण: ग्ल्युकोजचा अंश आहे कि नाही हे तपासण्यासाठी.

उपचारांमध्ये यांचा अंतर्भाव होतो:

  • जंतूसंसर्गावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स .
  • सूजेसाठी स्टेरॉइड मलम.
  • विषाणूजन्य(फंगल) संसर्ग ची काळजी घेण्यासाठी अँटीफंगल औषधांचा वापर केला जाऊ शकतो.
  • गंभीर प्रकरणामध्ये (केसमध्ये), सुंता करणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो कारण घट्ट त्वचा त्या भागाच्या स्वच्छतेसाठी अडथळा ठरू शकते.
  • तो भाग स्वच्छ करण्यासाठी साधारण सलाईनने धुणे.

स्वत:ची काळजी घेण्यासाठी टीपा:

  • जोपर्यंत वेदना पूर्णपणे कमी होत नाही, लैंगिक संपर्क आणि हस्तमैथुन टाळा.
  • वेदनेपासून मुक्त करणाऱ्या औषधांची नोंद ठेवा, जी गरज भासल्यास घेता येतील.
  • सुजलेल्या जागेवर बर्फाची पिशवी ठेवल्याने वेदना आणि सूज कमी होण्यास मदत मिळते.
  • स्नग-फिटिंग अंतर्वस्त्राचा वापर दुखणाऱ्या जागेला आधार देऊ शकतो.
  • पुरुषांच्या जननेंद्रिया भोवती किंवा लघवीमध्ये रक्ताचा अंश आहे का ते तपासा, कारण ते गंभीर सूज अथवा इजा दर्शवू शकते आणि अशा प्रकरणात डॉक्टरशी सल्लामसलत करणे अतिशय गरजेचे आहे.
  • साबणासारख्या कठोर रसायनांचा वापर टाळा. साबण-विरहितआंघोळीची शिफारस केली जाते.
  • तो भाग स्वच्छ राहण्यासाठी आणि अजून संसर्ग होण्याची शक्यता रोखण्यासाठी लघवी करते वेळी बाह्यत्वचा मागे घेण्याचा प्रयत्न करा.
  • जोडीदारांमध्ये लक्षणे दिसल्याशिवाय त्यांच्यावर सहसा उपचार केले जात नाहीत.



संदर्भ

  1. Brian J. Morris, John N. Krieger. Penile Inflammatory Skin Disorders and the Preventive Role of Circumcision. Int J Prev Med. 2017; 8: 32. PMID: 28567234
  2. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Penile Disorders
  3. Healthdirect Australia. Penis swelling or pain. Australian government: Department of Health
  4. Government of south Australia. Balanitis and balanoposthitis diagnosis and management.Department for Health and Wellbeing
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Balanitis
  6. Healthy Male. Foreskin Hygiene. Monash University; Australian Government Department of Health.