भाजणे - Burns in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 29, 2018

March 06, 2020

भाजणे
भाजणे

भाजणे म्हणजे काय?

भाजणे हे बहुदा सर्वात सामान्य दुखापतीं पैकी एक आहे. घरामध्ये, रस्त्यावर, कार्यालयात – कुठेही व्यक्तीस भाजू शकते. भाजून इजा झाल्यामुळे जी वेदना होते त्यालाच बरेच जण भाजणे असे समजतात, पण भाजणे म्हणजे त्वचेच्या टिश्यूंना झालेले नुकसान ज्यामुळे प्रभावित जागेतील पेशी नष्ट होतात.

भाजल्यामुळे होणारे नुकसान कमी जास्त असते आणि तीव्रतेच्या वाढत्या क्रमाने प्रथम-, द्वितीय- किंवा तृतीय- श्रेणीचे भाजणे म्हणून वर्गीकृत केले जाते. चौथ्या-श्रेणीचे भाजणे म्हणजे जिथे भाजणे त्वचेच्या आत जाऊन  स्नायू, हाडे आणि स्नायूबंधांवर परिणाम करते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

भाजण्याच्या श्रेणीनुसार याची चिन्हे आणि लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलतात.

  • प्रथम श्रेणीचे भाजणे:
    • किंचित सूज येणे.
    • त्वचा लाल होणे.
    • तीव्र वेदना.
    • त्वचा बरी होत असताना कोरडी पडणे आणि पापुद्रे निघणे.
    • जळलेली त्वचा पडुन गेल्यावर डाग जवळजवळ संपूर्ण दिसेनासे होणे.
  • द्वितीय श्रेणीचे भाजणे:
    • हे भाजणे त्वचेच्या पहिल्या थरापलीकडे जाते.
    • तीव्र वेदना आणि लालसरपणा.
    • त्वचे वर फोड येतात.
    • फोड फुटल्यास फोडातुन ओले, पाण्यासारखे पदार्थ गळतात.
    • जाड, नरम ऊतक जखमेवर खपली तयार करतात.
    • जळालेल्या ठिकाणी त्वचेचा रंग बदलतो.
    • जर त्वचा संपूर्ण खराब झाली असेल तर ग्राफटींग ची आवश्यकता भासू शकते.
  • तृतीय श्रेणीचे भाजणे:
    • हे भाजणे त्वचेच्या सर्व थरातून जाते.
    • मज्जतांतुचे नुकसान होते आणि संवेदना कमी होतात.
    • भाजलेला भाग पांढरा आणि मेणासारखा, करपलेला किंवा तपकिरी दिसू शकतो.
    • भाजलेली जागा चिवट आणि वर आल्यासारखी दिसते.
    • व्रण उमटू नये आणि अधिक नुकसान होऊ नये याकरिता शस्त्रक्रियेची आवश्यकता पडु शकते.
    • पूर्णपणे बरे होण्याकरिता खूप वेळ लागू शकतो.

भाजण्याची मुख्य कारणं काय आहेत?

भाजण्याची बरीच कारणं असू शकतात जसे की:

  • रसायने आणि विजेचा प्रवाह.
  • आग आणि ज्वाला.
  • गरम वस्तू.
  • उकळते गरम द्रव पदार्थ ज्यामुळे होरपळू शकतं.
  • सूर्यप्रकाशाशी दीर्घकाळ संपर्क.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रोगनिदान करण्याचे पहिले पाऊल म्हणजे भाजण्याचा विस्तार आणि तीव्रता किती आहे हे जाणून घ्यायला भाजलेला भाग पूर्णपणे तपासणे. जर रुग्णास खूप नुकसान झाले असेल तर त्याला विशेष क्लिनिक किंवा बर्न सेंटरमध्ये पाठवले जाऊ शकते. इतर संभाव्य हानीची तपासणी करण्यासाठी एक्स-रे सारख्या चाचण्या करू शकतात.

भाजल्याच्या प्रमाणावर उपचार अवलंबून असतात. काही भाजणे घरीच बरे होऊ शकते, तर काहींना त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

  • प्रथम श्रेणीचे भाजणे
    • भाजलेली जागा 10 मिनिटांपर्यंत थंड पाण्यात बडवून ठेवा.
    • वेदनाशामक औषधं घ्या.
    • सिल्व्हर नायट्रेट मलम सारखे आराम देणारे जेल किंवा क्रिम लावा.
    • अँटीबायोटिक आणि गॉझने क्षेत्र संरक्षित करा.
  • द्वितीय श्रेणीचे भाजणे
    • भाजलेले क्षेत्र स्वछ करा टटआणि झाकून ठेवा.
    • जळलेल्या क्षेत्राला 15 मिनिटांपर्यंत थंड पाण्याखाली धरून ठेवा.
    • फोडांसाठी अँटीबायोटिक क्रीम वापरा.
    • कापूस वापरणे आणि घट्ट बांधणे टाळा.
  • तृतीय श्रेणीचे भाजणे
    • त्वरित वैद्यकीय सहाय्य घ्या.
    • कुठलेही घरगुती औषधे किंवा उपचार टाळा.
    • इन्टरव्हीनस अँटिबायोटिक्स आणि फ्लूइड्स.
    • जखमेवर विशिष्ट मलमपट्टी.
    • वेदना कमी करण्यासाठी औषधे.
    • व्रण झालेल्या भागावर स्किन ग्राफ्टिंग.
    • आवश्यक असल्यास, श्वासोच्छवासास मदत आणि आहारासाठी नळी.
    • आवश्यक असल्यास, प्लॅस्टिक सर्जरी.



संदर्भ

  1. American Society for Surgery of the Hand. Burns. Chicago, USA. [internet].
  2. National Health Portal. Burns. Centre for Health Informatics; National Institute of Health and Family Welfare
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Burns
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Burns
  5. National Institute of General Medical Sciences. Burns. U.S. Department of Health and Human Services. [internet].

भाजणे साठी औषधे

Medicines listed below are available for भाजणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.