मोतीबिंदू - Cataract in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 29, 2018

July 31, 2020

मोतीबिंदू
मोतीबिंदू

मोतीबिंदू काय आहे?

आपल्या सर्वांच्या डोळ्यांत लेंस आहेत जे दृष्टीसाठी महत्वाचे असते. आपण वापरत असलेला चष्मा किंवा आपण वापरत असलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्संप्रमाणेच ते असतात. आपण जे पाहतो त्याचा स्पष्टपणा आपल्या डोळ्यातील लेंसच्या स्पष्टतेवर अवलंबून असतो. मोतीबिंदू ही एक अशी समस्या आहे ज्यात लेंस ढगाळ होते आणि स्पष्ट दृष्टीस प्रतिबंधित करते.हे अधिक सामान्यपणे वृद्धांमधे दिसते, तसेच तरुण लोक सुद्धा प्रभावित झालेले बघायला मिळतात. मोतिबिंदू दृष्टी, दैनिक कार्य, गाडी चालविण्याची क्षमता, वाचणे आणि पहाण्याची क्षमता प्रभावित करते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरवातीला मोतीबिंदू चे निदान करणे कठीण होऊ शकते. जरी परिस्थिती बिघडत असली, तरी होत जाणारे बदल खूप मंद असल्याने ते लक्षात येत नाही. बहुतेकदा दृष्टीत होत जाणारे हे बदल वृद्धत्वाशी जोडले जातात.जेव्हा ही चिन्हे स्पष्ट होतात, तेव्हा तो एक मोतीबिंदू आहे म्हणून ओळखले जाते. मोतिबिंदू ची लक्षणं अशी आहेत:

  • अस्पष्ट किंवा ढगाळ दृष्टी.
  • रात्री बघणे अवघड होणे.
  • स्पष्टपणे बघण्यासाठी मोठा फॉन्ट आणि अधिक प्रकाशाची आवश्यकता.
  • रंगांचा तेजस्वीपणा कमी होणे.
  • प्रकाश आणि सूर्यापासून येणाऱ्या तीक्ष्णते प्रति संवेदनशीलता.
  • दुहेरी दृष्टी.
  • प्रकाशित वस्तूच्या सभोवती वर्तुळ किंवा तेजोवलय दिसणे.
  • चष्म्याचा नंबर वारंवर बदलणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

मोतिबिंदूची कारणं ही असू शकतात:

  • वाढलेले वय.
  • ज्या उतकांपासून लेन्स तयार होते त्यात बदल.
  • आनुवंशिक विकार.
  • मधुमेह सारख्या इतर आरोग्य समस्या.
  • डोळ्याच्या जुन्या समस्या जसे सर्जरी, संसर्ग इ.
  • स्टेरॉईड्सचा दीर्घकाळ उपयोग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डोळ्याची तपासणी आणि वैद्यकीय इतिहास जाणून प्राथमिक निदान करता येते. ते पुढील प्रकारे केले जाऊ शकते:

  • वाचन साहित्य अचूकपणे वाचता येत आहे की नाही हे तपासण्यासाठी दृष्टी चाचणी.
  • लेन्स, कॉर्निया, बुबुळ आणि त्यांना दरम्यान मोकळ्या जागेचे परीक्षण करण्यासाठी स्लिट लॅम्प टेस्ट.
  • मोतीबिंदूसाठी रेटिनाचे परीक्षण.

मोतीबिंदू आणि सुधारित दृष्टीचा फायद्यांना संबोधित करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे जेव्हा डॉक्टरांनी दिलेला चष्मा मदत करत नाही तेव्हा शस्त्रक्रिया करणे. मोतिबिंदूसाठी शस्त्रक्रिया सिद्ध आणि सुरक्षित आहे आणि प्रक्रिये नंतर सुधारणा त्वरित आणि सुलभ आहे. मोतीबिंदू असलेल्या लेन्सला कृत्रिम लेन्ससह बदलले जाते जी नंतर डोळ्याचा भाग बनते. सुधारित लेंस शस्त्रक्रियेनंतर चष्म्याची देखील गरज दूर करु शकतात.

प्रक्रियेच्या सर्वात महत्वाच्या भागांत पोस्ट-ऑपरेटिव्ह केअर फार महत्त्वाचे आहे.



संदर्भ

  1. American Optometric Association. Cataract. Lindbergh Boulevard,United States; [Internet]
  2. National Eye Institute. Facts About Cataract. U.S. National Institutes of Health[Internet]
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cataract
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Cataract
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Common Eye Disorders

मोतीबिंदू साठी औषधे

Medicines listed below are available for मोतीबिंदू. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.