एंडोमेट्रियॉसिस - Endometriosis in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 01, 2018

March 06, 2020

एंडोमेट्रियॉसिस
एंडोमेट्रियॉसिस

एंडोमेट्रियॉसिस काय आहे?

एंडोमेट्रीयम, गर्भाशयाचे सर्वात आतील आवरण, मासिक पाळीत रक्तस्त्रावात गळून पडते. अंडाशयाचे हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे आतील आवरणाला सेन्सेटिव्ह असतात. एन्डोमेट्रोसिस तेव्हा उद्भवते जेव्हा एंडोमेट्रियल पेशी गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अंड नलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढू लागतात. ही एक लक्षणीय वेदनादायी परिस्थिती आहे आणि सहसा एवढी गंभीर आहे की गर्भाशयातील अवयव एकमेकांशी चिपकू लागतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

एंडोमेट्रियॉसिसची लक्षणे काही प्रमाणात त्या क्षेत्रावर अवलंबून असतात जेथे एंडोमेट्रियल पेशी वाढते. एंडोमेट्रोसिसच्या काही सामान्य लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहे

  • पाळी दरम्यान पोटात किंवा पेल्विक क्षेत्रात तीव्र वेदना (डिसमेनोरिया).
  • डिस्पॅरुनिया (संभोगादरम्यान वेदना).
  • असामान्यरित्या विपुल प्रमाणात रक्तस्त्राव (मेनोरॅगिया) किंवा लांब काळापर्यंत पाळीदरम्यान रक्तस्त्राव.
  • वंधत्व.
  • वेदनादायी रक्तस्त्राव आणि शौच.
  • थकवा (विशेषतः मासिक पाळी दरम्यान).

याची मुख्य कारणं काय आहेत?

जेव्हा एंडोमेट्रियल पेशी अपघाताने अंडाशय, अंड नलिका किंवा इतर पेल्विक अवयवांमध्ये फसते तेव्हा एंडोमेट्रियॉसिस होऊ शकते. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे:

  • रीट्रोग्रेडेड मासिक पाळी - जेव्हा मासिक पाळीचे रक्त अंड नलिका किंवा अंडाशयामध्ये (उलट दिशेने) परत जाते तेव्हा अंड नलिकेमध्ये किंवा अंडाशयामध्ये एंडोमेट्रियल पेशी प्रत्यारोपित होऊ शकतात.
  • सर्जिकल इम्प्लांटेशन - शल्यक्रियात्मक प्रसव (सेझेरियन डिलिव्हरीज) किंवा हिस्टेरेस्कोपी दरम्यान, एंडोमेट्रियल पेशी पेल्विक अवयवांमध्ये प्रत्यारोपित होऊ शकतात.
  • पेरीटोनियल सेल ट्रान्सफॉर्मेशन - विशिष्ट प्रतिरक्षा कॉम्प्लिकेशनमुळे किंवा हार्मोन्समुळे, पेरीटोनियल पेशी एंडोमेट्रियल टिश्यूमध्ये रूपांतरित होतात.
  • एंडोमेट्रियल सेल ट्रान्सपोर्टेशन - एंडोमेट्रियल सेल्स रक्त किंवा लिम्फद्वारे इतर अवयवांमध्ये दाखल होऊ शकते.
  • एम्ब्रिओनिक सेल ट्रान्सफॉर्मेशन - प्युबर्टी दरम्यान इस्ट्रोजन मुळे एम्ब्रिओनिक पेशी एंडोमेट्रियल पेशी मध्ये रूपांतरित होतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संपूर्ण शारीरिक तपासणीसह (पेल्विक तपासणीसह) योग्य क्लिनिकल इतिहास सहसा एंडोमेट्रियॉसिसचे निदान करण्यात मदत करते. तरीही, निदानाची पुष्टी आणि प्रसाराची मर्यादा तपासण्यासाठी काही खालील अन्वेषण केले जातात:

  • पेल्विसचा अल्ट्रासाऊंड - इतर पेल्विक अवयवांमध्ये एंडोमेट्रियल टिश्यू दाखल झाल्याचा खुलासा करतो.
  • ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड - पेल्विक अवयवांमध्ये एंडोमेट्रियल टिश्यूची तपासणी करण्यासाठी तुलनेत अधिक अचूक.
  • लॅपरोस्कोपी - बायोप्सीसह एंडोमेट्रियल टिश्यूचे एंडोस्कोपिक व्हिज्युअलायझेशन, निदानाची पुष्टी करण्यास मदत करते.
  • मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) - स्थानिककरण मध्ये मदत करते तसेच एंडोमेट्रियल इम्प्लांट चा आकार देखील तपासते.

एंडोमेट्रियॉसिसच्या उपचार पद्धतींमध्ये हे समाविष्ट आहे:

  • तोंडावाटे औषधोपचार - वेदनाशामके, डिसमोनोरिआ कमी करण्याकरिता.
  • हार्मोन थेरपी - वेदना कमी करण्यासाठी,मासिकपाळी नियमित करण्यासाठी, प्रवाह कमी करण्यासाठी.
  • शस्त्रक्रिया (कंझर्वेटिव्ह थेरपी) - प्रत्यारोपित किंवा रूपांतरित एंडोमेट्रियल टिश्यू शस्त्रक्रियेने काढणे. गंभीर प्रकरणात, अंड नलिका आणि अंडाशयासोबत गर्भाशय काढले जाते (हिस्टरेक्टमी).



संदर्भ

  1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Endometriosis
  2. Zhao X, Lang J, Leng J, et al. Abdominal wall endometriomas.. Int J Gynaecol Obstet 2005; 90:218.
  3. Blanco RG. et al. Abdominal wall endometriomas.. Am J Surg. 2003 Jun;185(6):596-8. PMID: 12781893
  4. Schrager S, et al. Evaluation and Treatment of Endometriosis. American Family Physician. 2013;87:107
  5. Burney RO, et al. Pathogenesis and pathophysiology of endometriosis.. Fertility and sterility. 2012;98:511

एंडोमेट्रियॉसिस साठी औषधे

Medicines listed below are available for एंडोमेट्रियॉसिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.