एक्स्ट्राव्हेसेशन - Extravasation in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

January 03, 2019

March 06, 2020

एक्स्ट्राव्हेसेशन
एक्स्ट्राव्हेसेशन

एक्स्ट्राव्हेसेशन काय आहे?

एक्स्ट्राव्हेसेशन म्हणजे शिरेत द्रव प्रशासना दरम्यान शेजारच्या टिश्यूमध्ये म्हणजेच उतींमध्ये इन्ट्राव्हेनस औषधोपचाराची नकळत झालेली गळती .व्हेसिकेंट नावाचे औषध (ज्यामुळे फोड येतात किंवा उतींना दुखापत होऊ शकते) लीक झाल्याने आसपासच्या ऊतींना नुकसान पोहोचवते, यामुळे गंभीर कॉम्प्लिकेशन होतात आणि प्राथमिक रोगाच्या उपचारास विलंब होतो. ऊतकांचे नुकसान हे दिले गेलेल्या औषधांची तीव्रता आणि गळती झालेल्या औषधांचे प्रमाण, यांच्या थेट प्रमाणात असते.

याची मुख्य संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

एक्स्ट्राव्हेसेशनशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे वर्गीकृत केली जाऊ शकतातः

प्रारंभिक लक्षणे

  • सूज.
  • एरिथेमा.
  • वेदना.
  • फोड येणे.
  • लक्षणं उशिरा दिसणे.
  • त्वचा हळूहळू नष्ट होणे.
  • प्रभावित ऊतींमध्ये अल्सर.
  • दीर्घकालीन वेदना.
  • प्रभावित भाग कार्य न करणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

एक्स्ट्राव्हेसेशन खालील कारणांमुळे होऊ शकते:

  • शिरेच्या आत द्रावपदार्थाचा अयोग्यप्रकारे प्रवेश.
  • त्वचा किंवा रक्तवाहिनीचा नाजूकपणा.
  • लठ्ठपणा.
  • दीर्घकाळापर्यंत शिरेच्याआत सुई टोचणे.
  • भूतकाळात अनेकदा शिरावेदन (सूया टोचणे).
  • स्नायू ते त्वचेपर्यंत टिश्यूंचे वस्तुमान कमी असणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

जर एखाद्या व्यक्तीत कोणत्याही संबंधित लक्षणांची उपस्थिती दिसत असेल तर ती एक्स्ट्राव्हेसेशन ची शंका असू शकते. प्रत्येक व्यक्ती ज्याला इंट्राव्हेनस थेरपी (शिरेच्या आत सुया देणे) दिली जाते,त्याला एक्स्ट्राव्हेसेशनच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दलची माहिती दिलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने त्यांना आढळणार्‍या लक्षणांबद्दलची माहिती डॉक्टरांना कळवली पाहिजे. आरोग्य सेवा प्रदाते निदानासाठी खालील तपासणी करू शकतातः

  • इंट्राव्हेनस कॅन्युलामधून रक्त परत न येणे.
  • इंट्राव्हेनस कॅन्युलाच्या माध्यमातून औषध देत असताना प्रतिकार.
  • शिरेच्या आतील द्रावपदार्थाच्या प्रवाहात अडथळा.

उपचारात पुढील समाविष्ट आहेत:

  • शिरेच्या आत द्रवपदार्थ घेणे लगेच थांबवणे.
  • शिल्लक राहिलेल्या औषधांचे ॲस्पीरेशन (बाहेर काढणे).
  • व्हेनस ॲक्सेस यंत्र काढून टाकणे.
  • प्रभावित अवयवाला उंचावणे.
  • प्रभावित भाग स्थानिक रित्या थंड करणे.
  • कॉर्टिकोस्टेरॉईड्सचे स्थानिक अप्लिकेशन.
  • डायमिथाइल सल्फॉक्साइडचे स्थानिक अप्लिकेशन.

बरेचदा काळजीपूर्वक, व्यवस्थित, आणि कुशल व्यवस्थापन तंत्राद्वारे एक्स्ट्राव्हेसेशन प्रतिबंधित केले जाऊ शकते.



संदर्भ

  1. The Royal children's Hospital Melbourne [internet]: Victoria State Government. Extravasation Injury Management
  2. Great Ormond Street Hospital for Children. Extravasation and infiltration. NHS Foundation Trust. [internet].
  3. European Oncology Nursing Society. Causes, Diagnosis, and Treatment of Extravasation . European Specialist Nurses Organisation. Causes, Diagnosis, and Treatment of Extravasation .
  4. Oxford University Press. Management of chemotherapy extravasation: ESMO–EONS Clinical Practice Guidelines. University of Oxford. [internet].
  5. Journal of the American Academy of Physician Assistants. How should extravasation injuries be treated?. American Academy of Physician Assistants. [internet].

एक्स्ट्राव्हेसेशन साठी औषधे

Medicines listed below are available for एक्स्ट्राव्हेसेशन. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.