इन्फ्लुएंझा - Flu (Influenza) in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 30, 2018

July 31, 2020

इन्फ्लुएंझा
इन्फ्लुएंझा

फ्लू (इन्फ्लुएंझा) काय आहे?

फ्लू (इन्फ्लूएंजा) एक सामान्य संसर्ग विषाणूजन्य आजार आहे, जो खोकला आणि शिंका याद्वारे पसरवतो.

वर्षाच्या कोणत्याही वेळी फ्लू होऊ शकतो पण तो हिवाळ्यात जास्त प्रमाणात होतो; म्हणूनच, याला मौसमी फ्लू म्हणूनही ओळखले जाते. इन्फ्लुएंझा हा आरएनए विषाणूमुळे होतो, जो श्वसनमार्गास इन्फेक्ट करतो. सामान्य सर्दी सारख्या इतर व्हायरल इन्फेक्शन्सच्या तुलनेत, इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे 0.1% मृत्यू दराने गंभीर आजार होऊ शकतो. बऱ्याचदा, इन्फ्लूएंझाचे निराकरण सुमारे एक आठवड्यात किंवा 10 दिवसांमध्ये होते.

5 वर्षाखालील व 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसने संसर्ग होण्याचा धोका असतो. गर्भवती महिला, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती, आरोग्य सेवा केंद्रात काम करणारे आणि दीर्घकालीन श्वसनविकाराने ग्रस्त व्यक्तींना देखील इन्फ्लूएंजा संसर्गाचा धोका अधिक असतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरुवातीला फ्लू इतर कोणत्याही सामान्य सर्दीसारखे वाटू शकते. सामान्य लक्षणे दुखणारा घसा, वाहणारे नाक आणि शिंका ही आहेत. सर्दी आणि फ्लू यांच्यातील मोठा फरक म्हणजे फ्लू वेगाने वाढतो. लक्षणे सामान्यतः 1 ते 3 दिवसांच्या आत संसर्गानंतर विकसित होतात आणि साधारणतः एकाच आठवड्यात लोकांना बरे वाटू लागते.

फ्लूची लक्षणं खाली सूचीबद्ध आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

इन्फ्लुएंझा विषाणूमुळे फ्लू होतो आणि त्याचे तीन प्रकार आहेत- इन्फ्लूएन्झा ए, बी आणि सी. प्रकार ए आणि बी श्वसनमार्गाच्या गंभीर स्वरुपाचा संसर्ग होतो ज्यामुळे प्रकार सी मुळे साथीच्या रोगासारखी परिस्थिती असल्यास मृत्यु दर जास्त असतो.

हा विषाणू संक्रमित व्यक्तीकडून शिंकणे, खोकला किंवा बोलणे याद्वारे प्रसारित केला जातो. काहीवेळा तुम्ही थेट संक्रमित थेंबच नाकात टाकतात आणि श्वास घेतात किंवा व्हायरसने दूषित असणाऱ्या पृष्ठ भागांना स्पर्श करण्यापासून संसर्ग होऊ शकतो. पहिली लक्षणं दिसण्याच्या पाच दिवस आधीच संक्रमित व्यक्ती अत्यंत संक्रामक असतात.

इन्फ्लूएंझा विषाणूचा कालावधी सतत बदलत जातो म्हणजे ते उत्परिवर्तन घेतात. यामुळे तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्यभर व्हायरल संसर्ग होण्याची शक्यता असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

आपण घरी आराम करावा आणि हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तपासणीसाठी डॉक्टरांकडे  देखील जावे. पॉलिमेरेस चेन रिॲक्शन (पीसीआर), रॅपिड एंटीजन चाचणी किंवा इम्यूनोफ्लोरेसेंस ॲसे चाचणीसाठी तुमचे श्वसनाचे नमुने घेऊ शकतात.

मग, तुमचे डॉक्टर आपल्याला अँटीवायरल औषधे सांगतील. या अँटीवायरल औषधांचे मळमळ आणि उलट्यासारखे काही साइड इफेक्ट्स आहेत.

लक्षणांनुसार उपचार देखील ताप कमी करण्यासाठी आणि एंटीप्रायट्रिक्स आणि एंटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्सच्या मदतीने अस्वस्थता कमी करते. नवजात मुलांच्या बाबतीत, बाळाचे हायड्रेशन स्तर टिकवण्यासाठी स्तनपानाची वारंवारता वाढवणे आवश्यक आहे.



संदर्भ

  1. NHS Inform. Flu. National health information service, Scotland. [internet].
  2. Oregon Health & Science University. A Guide for Parents - Seasonal Flu Information. Portland, Oregon. [internet].
  3. British Medical Journal. Influenza. BMJ Publishing Group. [internet].
  4. Ministry of Health. Influenza. Wellington, New Zealand. [internet].
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Frequently Asked Flu Questions 2018-2019 Influenza Season

इन्फ्लुएंझा साठी औषधे

Medicines listed below are available for इन्फ्लुएंझा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.