मायोपिया (निकटदृष्टीदोष) - Myopia (Nearsightedness) in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

April 26, 2019

March 06, 2020

मायोपिया
मायोपिया

मायोपिया (निकटदृष्टीदोष) काय आहे ?

मायोपिया (निकटदृष्टीदोष) ही अशी स्थिती आहे जिथे तुम्ही जवळच्या वस्तू स्पष्टपणे बघू शकता पण दूरची दृष्टी अस्पष्ट होते. टेलीव्हिजन स्क्रीन, व्हाईटबोर्ड इत्यादी सारख्या वस्तू पाहणे आपल्याला कठीण वाटू शकते. मायोपियाला उच्च मायोपिया (गंभीर मायोपिया) आणि कमी प्रतीचा मायोपिया (सौम्य मायोपिया) म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

मायोपिया असलेल्या व्यक्तीला पुढील चिन्हं आणि लक्षणं असू शकतात:

  • दूरचे व्यवस्थित न दिसणे.
  • डोकेदुखी.
  • डोळ्याला ताण.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

मायोपियाची कारणं पुढील प्रमाणे आहेत:

  • अनुवांशिकता: मायोपिया होण्याची प्रवृत्ती वारस्याने मिळत असते, परंतु आपण डोळ्यावर किती ताण देतो यावर देखील हे अवलंबून आहे.
  • दृश्यमान ताण (व्हिज्युअल स्ट्रेस): कार्य-किंवा अभ्यास-संबंधित तणाव जसे संगणकावरील कामकाजाचे जास्त तास.
  • मधुमेह सारखे रोग: मधुमेहात रक्त शर्कराची बदलत जाणारी पातळी दृष्टीवर परिणाम करते.
  • पर्यावरणीय घटकः वातावरणातील बदल आपल्या दृष्टीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, केवळ रात्रीच्या वेळेस अस्पष्ट दूरस्थ दृष्टी रात्रीचा मायोपिया (नाईट मायोपिया) म्हणून ओळखला जातो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

मायोपियाचे निदान करण्यासाठी डोळ्यांची निगा राखणाऱ्या तज्ञांद्वारे (आय केयर प्रोफेशनल्स) डोळ्यांचे एक व्यापक परीक्षण केले जाते. चाचणीमध्ये डोळ्यांची चाचणी आणि तपासणी समाविष्ट असते. यात डोळ्याचा प्रसार (डायलेशन) करण्यासाठी आय ड्रॉप्सच्या वापराचा समावेश असतो ज्यामुळे बुबुळा (प्युपिल) ची तपासणी सोपी होते. हे रेटिना आणि ऑप्टिक तंत्रिकाची जवळची आणि अचूक तपासणीस अनुमती देते.

मायोपियाचा उपचार करण्यासाठी सर्वात सामान्यपणे वापरली जाणाऱ्या पद्धतींमध्ये, सुधारणा करणारे चष्मे किंवा डोळ्यांचे लेंस समाविष्ट असतात. इतर पद्धती ज्या वापरल्या जाऊ शकतात त्या आहेत: 

  • रेफ्रेक्टिव सर्जरी जसे की फोटोरेफ्रेटिव्ह केराटेक्टॉमी (पीआरके-PRK) आणि लेझर-असिस्टेड इन-सिटू केरेटोमाइल्युसिस (एलएएसआयके-LASIK). ऑप्टिक त्रुटी स्थिर झाल्यानंतर अपवर्तक शस्त्रक्रिया (रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी) केली जाते (म्हणजे आपल्या चष्माचा क्रमांक काही काळासाठी स्थिर असतो), सामान्यत: जेव्हा आपण आपल्या 20 व्या वयाच्या सुरुवातीस असता आणि आपला विकास पूर्ण झालेला असतो. या शस्त्रक्रिया कॉर्नियाचा आकार बदलुन रेटिनावर प्रकाशाचा फोकस सुधारतात.
  • कॉर्नियल रिफ्रॅक्टिव्ह थेरपी (ऑर्थो-के-Ortho-k): ही एक नॉन-सर्जिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपण एक कठोर लेंस वापरता जो आपल्या कॉर्नियाला पुनर्स्थापित करतो.
  • व्हिजन थेरेपी : आपल्याला तणाव-संबंधित मायोपिया असल्यास हे उपयुक्त आहे. लक्ष केंद्रित करण्यासाठी डोळ्यांच्या व्यायामाचा सल्ला दिला जातो आणि याप्रकारे दूरची स्पष्ट दृष्टी परत मिळवता येते.



संदर्भ

  1. American Optometric Association. [Internet]: Missouri, United States; Myopia (Nearsightedness).
  2. National Eye Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Facts About Myopia
  3. American Academy of Ophthalmology [Internet] California, United States; Nearsightedness: What Is Myopia?
  4. National Health Portal [Internet] India; Myopia.
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Short-sightedness.

मायोपिया (निकटदृष्टीदोष) साठी औषधे

Medicines listed below are available for मायोपिया (निकटदृष्टीदोष). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.