लघवीत आग होणे - Painful Urination in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 18, 2018

October 27, 2020

लघवीत आग होणे
लघवीत आग होणे

सारांश

आपल्या शरिराची विष्ठा, लघवी आणि घाम यामार्फत विषारी, अनुपयोगी आणि हानिकारक असलेलेपदार्थ काढून टाकण्याची नैसर्गिक अशी यंत्रणा आहे. आपल्या शरिरातील मूत्रनलिका अशा यंत्रणांपैकी एक आहे. या मूत्रनलिकेत युरेथ्राद्वारे लघवीच्या रूपात रक्ताची छाननी करणे आणि रक्तातील कचरा बाहेर काढण्यासाठी अवयवांचे समायोजन असते. मूत्रविसर्जन करतांना होणारी कोणतीही वेदना किंवा गैरसोय झाल्यास, हिला सामान्यपणें वेदनायुक्त लघवी असे म्हणतात. मूत्रनलिका किंवा इतर ओटीपोट क्षेत्रातील अवयवांचे संक्रमण, सूज, निर्जलीकरण, मूत्रपिंडातील खडा, शरिरातील गाठी, औषध उपचार, प्रकाश विकिरण आणि रुग्णाला आधीच असलेली अलर्जी याची सामान्य कारणे असतात. सर्वांत सामान्य लक्षणे मूत्र विसर्जन करतांना किंवा सुरू करतांना वेदना या असतात. वेदनायुक्त लघवीच्या इतर लक्षणांमध्ये दुर्गंध, युरेथ्रामधून गळती, ओटीपोट या क्षेत्रात लालसरपणा किंवा खाज आणि इतर असतात.

वेदनायुक्त लघवी  या आजाराचे निवारण योग्य आहार विशेष करून पुरेसे असतील एवढे तरळ पदार्थ घेऊन, आपली वैय्यक्तिक स्वच्छता सांभाळून, मद्यपान व धूम्रपान आटोक्यात आणून आणि कमीत कमी वर्षातून एक वेळा नियमित वैद्यकीय चाचणी करवून घेऊन करता येते. उपचार म्हणजे संक्रमण, सूज व मूत्रपिंडाचे लहान खडे बरे करतील अशी  औषधे, आणि गाठी व मूत्रपिंडाचे मोठे खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया असे असतात. उपचार वेळीच केल्याने रुग्णाची प्रगती बरी असते. गुंतागुंती क्वचित् होतात आणि त्यामध्ये पुनरावर्त संक्रमण, रक्त संक्रमण किंवा सेप्सिस, मूत्रपिंड निकामी होणें, वेळेच्या पूर्वी शिशुजन्म किंवा नुकतेच जन्म झालेल्या बाळाचे वजन कमी असणे हे सामील आहेत.

लघवीत आग होणे ची लक्षणे - Symptoms of Painful Urination in Marathi

मूत्रविसर्जनात खालीलप्रमाणें संलग्न लक्षणेही असू शकतात:

  • वेदना
    रुग्णामध्ये वेदनायुक्त लघवीची लक्षणे बहुतांशी लघवी करतांना दिसतात. लघवीमध्ये सुरवातीच्या वेळी किंवा संपूर्ण मूत्रविसर्जनाच्या काळावधीमध्ये वेदना होऊ शकते. ही वेदना अधिकतर खोचक, अप्रिय आणि गैरसोयीची असते. वेदना लघवीनंतर थांबू अगर नाहीही थांबू शकत.  
  • ताप
    मूत्रनलिकेत संक्रमण असल्यास, शरिराचे तापमान वाढू शकते. ताप सौम्य ते मध्यम अंशाचे असू शकते (38. 5⁰C पेक्षा अधिक). तापासोबत कंपही सुटू शकतात.
  • धुळसर किंवा रक्तयुक्त लघवी
    वेदनेसोबत, लघवीच्या रंगामध्येही बदल घडू शकतो. लघवी स्वच्छ किंवा पिवळसर असे नसून धूळसर किंवा हलकी लालसर दिसू शकते, जे लघवीत रक्त निघत असल्याने असेल.
  • पू/रक्त/ इतर द्रव्याची असामान्य गळती
    मूत्रविसर्जनाच्या वेळी किंवा नंतर इतर द्रव्याची, रक्त, पू असामान्य गळती लक्षात येऊ शकते.  
  • गंध
    लघवीचे रंग अत्यंत तीव्र व अप्रियही असू शकते.
  • मूत्रविसर्जनाची वारंवारता
    काही वेळेस, वेदनेसह मूत्रविसर्जनाची वारंवारता किंवा लघवी करण्याची आचही वाढू शकते 
  • पोटाच्या वरच्या भागेत दुखणे
    ही वेदना किंवा गैरसोय बरगड्या आणि ओटीपोटीच्या भागाच्या मध्ये होते (लिलॅक बोनजवळ, जो दोन्ही बाजूला असणारा मांडीच्या हाडाचा भाग असतो)
  • ओरखडे, खाज, जळजळ
    अंतर्निहित संक्रंमणाशी निगडीत वेदनायुक्त लघवीमध्ये, ओटीपोट या भागात अधिकतर ओरखडे, लालसरपणा आणि जळजळ याची जाणीव होते आणि म्हणून हे आजार असलेली व्यक्ती काही आराम मिळण्यासाठी तिथे खाजवत राहते.
  • फोड
    लैंगिक संबंधातून पसरणार्र्या आजारांने झालेली असल्यास वेदनायुक्त लघवीमध्ये साधारणपणें फोडी दिसतात. या फोडी रुग्ण स्त्रीच्या योनीच्या भोवती आणि रुग्ण पुरुषाच्या लिंगावर असू शकतात.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

लघवी करताना दुखणे आणि जळजळ होणे चा उपचार - Treatment of Painful Urination in Marathi

वेदनायुक्त लघवीचे उपचार अंतर्निहित वैद्यकीय कारणावर अवलंबून असते.

औषधोपचार
वेदनायुक्त लघवीचे कारण मूत्रनलिका किंवा प्रजननतंत्रातील संक्रमण असे असल्यास, तुमचे चिकित्सक काही औषधोपचारांचा सल्ला देऊ शकतात (प्रतिजैविके किंवा विषाणूरोधके). विहित काळावधीसाठी औषधे घेतल्यानंतर, तुमचे डॉक्टर, लक्षणे कमी झालीत की नाही हे पाहण्यासाठी, तुम्हाला पाठपुरावा करण्यास आणि परत तपासणी करून घ्यायला सांगतात.

मूत्रपिंडातील खडा हे कारण असल्यास, खड्याच्या आकाराप्रमाणे उपचार वेगळा आहे. आकार लहान असल्यास, तुमचे डॉक्टर तो मूत्रपिंडातील खडा लघवीमारफत निघण्याची वाट बघतील. खडा विरघळावा म्हणून काही औषधेही दिली जाऊ शकतात.

शस्त्रक्रिया
रुग्णाच्या शरिरात मूत्रपिंडाचे मोठे खडे, अडसर, गाठ किंवा मूत्रनलिका अरुंद झाल्यास, कोणत्याही रुग्णावरील उपचार करणारे चिकित्सक शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.

लघवीत आग होणे काय आहे - What is Painful Urination in Marathi

एक निरोगी प्रौढ व्यक्ती दिवसांतून औसत कमीत कमी पाच ते सहा वेळा आणि दिवसातून 1.2 ते 1.5 L मूत्र विसर्जन करते. लघवीमध्ये सुरवातीच्या वेळी किंवा संपूर्ण मूत्रविसर्जनाच्या काळावधीमध्ये वेदना किंवा गैरसोय येत असल्यास, या अवस्थेला डायस्युरिआ (वेदनायुक्त लघवी) असे म्हणतात. मूत्रनलिकेच्या आजारांपैकी हे सर्वांत प्रचलित तक्रार आहे.



संदर्भ

  1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Urinary Tract Imaging
  2. STD-GOV [Internet]. St SW, Rochester, USA. Painful Urination (Dysuria)
  3. Bueschen AJ. Flank Pain. In: Walker HK, Hall WD, Hurst JW. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition.. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 182.
  4. Hochreiter W . [Painful micturition (dysuria, algiuria). Ther Umsch. 1996 Sep;53(9):668-71.PMID: 8966693.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Urination - difficulty with flow

लघवीत आग होणे साठी औषधे

Medicines listed below are available for लघवीत आग होणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for लघवीत आग होणे

Number of tests are available for लघवीत आग होणे. We have listed commonly prescribed tests below: