नाक वाहणे - Runny Nose in Marathi

Dr. Abhishek GuptaMBBS

January 27, 2019

September 10, 2020

नाक वाहणे
नाक वाहणे

सारांश

वाहते नाक ही सामान्यपणे आढळणारी व चिडचिड उत्पन्न करणारी शारीरिक अवस्था आहे. वाहत्या नाकासाठीची वैद्यकीय संज्ञा “र्हाइनोरिआ” अशी आहे. तथापी, अचूकपणे सांगावयाचे झाल्यास, र्हाइनोरिया म्हणजे कुठली शारीरिक अवस्था नसून, नासिकेतून पाझरणारे पातळ व पारदर्शक द्रव्य आहे.

अतिरीक्त तयार झालेला श्लेष्मा नासिकेच्या कवटीमधे सायनसमधे (डोळ्यांचे खोबण, गालांची हाडे, आणि कपाळ) किंवा वायूमार्गात जमा झाल्यास अशी अवस्था होते. सायनस हा भाग गुहेच्या रचनेसारखा आहे. तो चेहऱ्याच्या हाडांच्या मागच्या बाजूला असतो व नासिकामार्गाला जोडलेला असतो. नासिकामार्गात श्लेष्मा जमा होतो. सामान्य सर्दी किंवा तापाच्या विषाणूंच्या वसाहतीच्या उपस्थितीमूळे व आक्रमणामूळे, श्लेष्मा तयार होतो. वाहत्या नाकाचे मुख्य लक्षण पांढरे द्रव्य श्लेष्माचे (पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक स्वभावाचे) तयार होणे आहे. ते नासिकामार्गाने पाझरते. सोबतच शिंका येतात व नाकाचा भाग लालसर होतो. ही स्थिती स्वतःच बरी होते आणि बहुतांश वेळा वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसते.

नाक वाहणे काय आहे - What is Runny Nose in Marathi

शरीराची नैसर्गिक प्रतिकार यंत्रणा शरिरात आलेल्या अलर्जीला किंवा संक्रमणाला अतीसंवेदनशीलतेला प्रतिकार म्हणून श्लेष्मा तयार करते, जे नाक वाहण्याचे कारण आहे.असे लक्षात आले आहे की अतिरिक्त श्लेष्मा तयार झाल्याने घसादुखी, घशाची सूज, आणि खोकला होतो. वाहते नाक बहुतांशी स्वतःहून बरे होते ज्यामूळे त्याला कमीत कमी वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. परंतू, ते निदान न झालेल्या वैद्यकीय स्थितीचे (आजाराचे) निर्देशकही असू शकते. अधिक माहितीसाठी पुढे वाचा:

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

नाक वाहणे ची लक्षणे - Symptoms of Runny Nose in Marathi

वाहत्या नाकाचे मुख्य वेधक लक्षण नासिकामार्गातून बाहेर अविरत वाहणारा श्लेष्मा हे आहे. तुम्ही वाहत्या नाकासोबत खालील लक्षणे अनुभवत असाल तर तुम्ही नाक, कान आणि घसा तज्ञाला भेटा:

  • सर्दी होणे, सौम्य किंवा हलके छातीचे दुखणे, ताप, डोक्याच्या तीव्र वेदना, फोडे येणे, गुंगी येणे, स्वस्थ्यातील बिघाडासोबत वाहते नाक.
  • डोळ्याखाली सूज येणे,गालांवरील सूज किंवा द्रुष्टीचे अस्पष्ट व विक्रुत होणे
  • घशात तीव्र वेदना होणे किंवा आतल्या भागात पांढरे पिवळे डाग विकसित होणे (टोंसील्स)
  • नाकातून घाणेरड्या वासाचा पदार्थ बाहेर पडतो ज्याचा वास असह्य असतो जो नाकाच्या एका नाकपुडीतून वाहतो आणि पांढर्र्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा ओळखता येण्यासारखा असतो.
  • सततचा खोकला जो 7-10 दिवस टिकतो आणि पिवळे,हिरवे, किंवा घाणेरडे कफ (श्लेष्मा) तयार करतो.

नाक वाहणे चा उपचार - Treatment of Runny Nose in Marathi

वाहत्या नाकावर सुरुवातीला घरीच साधे उपाय करून उपचार करतात. बहुतांशी, ते वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय बरे होते. काही घटनांमध्ये जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा औषधोपचारांची, श्लेष्माचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, आवश्यकता  पडते.

  • साधारणपणे, नाकाचे वाहणे सामान्य सर्दीमुळे होते. सामान्य सर्दी बरी होताच लक्षणे दूर होतात. सामान्य सर्दीवरील उपचार मर्यादीत आहेत आणि डॉक्टर भरपूर विश्रांती घेण्यासोबत भरपूर द्रव्यपदार्थ आणि निरोगी आहार घेण्याचा सल्ला देतात. सामान्य सर्दी बरी होण्याकरता 6-7 दिवस लागतात.
  • तुमचे डॉक्टर काही प्रतिजैविके घेण्यचा सल्ला देऊ शकतात. तथापी, सर्दी आणि तापाची स्थिती विषाणूंमुळे होत  असल्याने, विषाणूंचे संक्रमण ताप आणि सर्दीसोबत असल्यास, प्रतिजैविके घेतल्याने फक्त लक्षणे बरी होतात. तुम्हाला तीव्र ताप असल्यास डॉक्टर प्रतिविषाणू औषधे निर्धारित करतात. प्रतिविषाणू औषधे रोगमुक्ततेची प्रक्रिया जलद करतात, परंतू संशोधन असे सांगते की बहूतेक लोकांमधे त्याची आवश्यकता नसते. प्रति-विषाणू औषधे फक्त गंभीर परिस्थितींमधेच दिली जातात.

औषधोपचार

तुम्हाला कळकळीचा सल्ला दिला जातो की  डॉक्टरच्या समुपदेशनाशिवाय कुठलीही औषधे घेऊ नका. कारण काही औषधे नको ते दुष्परिणाम करतात जसे की आजारांचे परतून येणे आणि परिस्थिती गंभीर होणे.

  • संशोधन असे  सांगते की अतीसंवेदनशीलतेमूळे होणाऱ्या शिंका आणि वाहते नाक यावर एँटिकोलीनेर्जीक नेसल एलर्जी स्प्रेने प्रभाविपणे उपचार होतो.
  • डॉक्टर काही अँटीहीस्टेमाइन्स (अँटी-एलर्जी) औषधं ,जसे डायफेन्हाइड्रामाइन आणि क्लोर्फेनाइरामाइन औषधं, वाहते नाक व शिंका या लक्षणांना नियंत्रीत करण्यासाठी निर्धारीत करतात. तथापी, ही औषधे, झोप आणि गुंगी आणतात.
  • डिकंजेस्टंट नाकांचे फवारे जसे स्युडोएफेड्रीन,फिनाएलेफ्रीन, ओक्सीमेटाझोलीन, इत्यादी औषधं घेतली जातात जी नाक आणी कानातील अडथळे दूर करतात. तथापी, त्यांच्यासोबत अनेक दुष्परीणाम जुळलेले  आहेत ज्यात हृदयाचे ठोके जलद पडणे आणि  उच्च रक्तदाब समाविष्ट आहे. वर उल्लेख केलेली औषधे 3 दिवसांच्या वर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

स्वतःची अशी काळजी घ्या

  • क्षारयूक्त पाणी
    तुम्हाला सुचविण्यात येते की तुमचे नाक क्षारयूक्त पाण्याने स्वच्छ करा. हे केल्याने नाकातील अडथळे दूर होण्यास मदत  होती आणि श्वसनाची क्रिया व्यवस्थित होते. असा पण विश्वास आहे की नासिकामार्ग स्वच्छ करण्यासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्याने विषाणू बाहेर पडतात.  क्षारयुक्त पणी वापरण्याआधी एक लक्षात ठेवा की  पाणी उकळलेले असावे आणि नाक धुण्याअगोदर समान्य तापमानावर येऊ द्यावे.
  • वाफ
    वाफ घेणे नाकमोकळे करण्यासाठी अतीशय उपयुक्त आहे; ते वाहते नाक बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. वाफेची व्यवस्थित मात्रा मिळण्यासाठी, उकळते पाणि भांड्यात घ्या, तुमचा चेहरा भांड्याच्या जवळ न्या, नंतर एक जाड कापड किंवा पंचा तुमच्या डोक्याच्या व भांड्याच्या सभोवताली गुंडाळून घ्या. तुम्ही स्नानगृहात गरम पाण्याचा फवारा सुरू करून व दारे खिडक्या बंद करून भरपूर प्रमाणात वाफ घेऊ शकता.
  • सी जीवनसत्त्वे
    सी जीवनसत्त्वांच्या सेवनाने देखील सर्दी व ताप बरा होतो,त्यासाठी संत्री व लिंबांचे सेवन करावे.
  • नीलगीरीचे तेल
    एका मोठ्या भांड्यात उकळते पाणी घ्या आणि त्यात नीलगिरी तेलाचे थोडे थेंब टाका. त्यानंतर वर उल्लेख केल्याप्रमाणे पंच्याने झाका. नीलगिरीचे तेल वाहते नाकमोकळे करण्यास उपयूक्त आहे.
  • विश्रांती
    व्यवस्थीत झोप आणि संपुर्ण विश्रांती घेतल्यास लवकर  रोगमुक्त होता येते.


संदर्भ

  1. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. Runny Nose, Stuffy Nose, Sneezing
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Stuffy or runny nose - adult
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Common Cold and Runny Nose
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Common Colds: Protect Yourself and Others
  5. National Health Service [internet]. UK; Cold, Flu, or Allergy?

नाक वाहणे साठी औषधे

Medicines listed below are available for नाक वाहणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.