खरूज - Scabies in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

July 31, 2020

खरूज
खरूज

खरूज म्हणजे काय?

खरूज हा एक अत्यंत संसर्गजन्य संसर्ग आहे जे इच माइट्स (आठ पायाचा बग) यामुळे होते. हे परजीवी (माइट्स) उघड्या डोळ्यांना दिसत नसले तरी ते त्वचेला त्यांच्या वाढीची जागा बनवतात. माइट्स त्वचेखाली बीळ करतात आणि अंडी घालतात, यावर रोगप्रतिकारक शक्ती तीव्र खाजेच्या रूपात प्रतिसाद देते, जी सामान्यपणे रात्री वाढते. तरूण मुले आणि वृद्ध या माइट्स च्या संसर्गास जास्त बळी पडतात. त्याचप्रमाणे, गरम वातावरण देखील स्थिती वाढवू शकते. बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे हे अजून बिकट बनते, ज्यामुळे त्वचेवर फोड येणे, ह्रदय रोग, सेप्टीकिमिया ( रक्तप्रवाहात प्रवेश करणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन) आणि अगदी किडनीचे आजार सुद्धा उद्भवतात.

योग्य उपचारामुळे, इच माइट्स मरतात, आणि संसर्ग दूर होतो. पण, जर उपचार केले नाहीत, तर माइट्सना पसरतात आणि परिस्थिती गंभीर होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

आजाराची चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

  • सतत खाज.
  • पुरळ किंवा खवल्या असलेली त्वचा.
  • स्किन सोअर्स.

त्वचेच्या कोणत्याही भागावर आजार विकसित होऊ शकतो; तरीही, खालील भाग सर्वात जास्त प्रभावित होतात:

  • हात, विशेषतः नखांच्या भोवती आणि बोटांमध्ये (फिंगर वेब्स).
  • काख, कोपरा आणि मनगट.
  • निप्पल्स.
  • ग्रॉइन.

खरूजचा उष्मायन कालावधी 8 आठवड्यांचा आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

थेट त्वचेच्या संपर्काद्वारे तसेच बेडिंग, कपडे आणि अगदी फर्निचर शेअर केल्याने इच माइट्स एका व्यक्तीतून दुसर्‍या व्यक्तीत पसरतात. त्याचप्रमाणे, ते आईकडून बालकाकडे प्रसारित होऊ शकतात. होस्ट शिवाय, माइटचे आयुष्य 3-4 दिवसांचे असते.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

या स्थितीचे निदान दीर्घ काळापर्यंत खाज आणि स्तन आणि जेनाइटल भागाच्या भोवती खरूजाच्या लहान गाठींचा विकास याद्वारे केले जाते. तसेच स्किन स्क्रॅपिंगचे मायक्रोस्कोपिक मूल्यांकन देखील स्थितीच्या पुष्टीकरणासाठी मदतशीर आहे.

गरजेनुसार योग्य क्रीम्स, लोशन्स किंवा टॅब्लेट्स वापरून खरूजाची जटिळता टाळता येऊ शकते. संसर्गाच्या उपचारासाठी मानेच्या खालील शरीरावर लावण्यासाठी डाॅक्टर लोशन आणि क्रीम देतात.

घरातील सर्व सदस्यांना आणि बाधित व्यक्तीच्या लैंगिक भागीदारांना अशाच प्रकारच्या उपचाराचा सल्ला दिला जातो. उपचार बंद केल्यानंतर जर खाज किंवा पुरळ दिसल्यास पुन्हा उपचार करणे आवश्यक असू शकते.

या बाबतीत काही सावधगिरी देखील घेता येऊ शकते जसे :

  • स्वच्छ बेडिंग आणि कपडे वापरणे.
  • 50 पेक्षा जास्त सेल्सिअस वर कपडे धुणे.



संदर्भ

  1. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Scabies
  2. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Scabies
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Scabies Frequently Asked Questions (FAQs)
  4. National Health Service [Internet]. UK; Scabies.
  5. HealthLink BC [Internet] British Columbia; Scabies

खरूज साठी औषधे

Medicines listed below are available for खरूज. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.