तणाव - Stress in Marathi

Dr. Ayush Pandey

January 27, 2019

March 06, 2020

तणाव
तणाव

सारांश

भय म्हणून आपल्या समोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे मानसिक तणाव आहे. तणाव हा भयाला दिलेला ‘लढा किंवा पळा’ प्रतिसाद आहे आणि व्यक्तीला समोर उभ्या ठाकलेल्या घटनेस किंवा उत्तेजक अवस्थेस देता यावी अशी प्रतीक्रिया ठरवण्यात मदत करतो. आपल्या कर्तबगारीच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी कही प्रमाणात तणाव असणे आवश्यक आहे. तथापी, अतिरिक्त प्रमाणातील तणाव लोकांना त्रासदायक आहे आणि व्यक्ती कोलमडू शकतात. तणाव अंतर्गत, बाह्य किंवा दोन्हींच्या संयुक्त कारणांनी येतो. पारिवारिक मतभेद, व्यावसायिक व शैक्षणिक दबाव, आणि पैसा हे बाह्य कारणांमधे समाविष्ट आहेत. कमी आत्म-सन्मान, नकरात्मक मानसिकता, आणि ताठरपणा ही अंतर्गत कारणे आहेत. हा कुठल्याही पुढीलपैकी कुठल्या एका रुपात वाढू शकतो जसे –तीव्र तणाव, क्षणिक तीव्र ताण, किंवा दीर्घकालीन तणाव. प्रत्येक चरणात भिन्न लक्षणे दिसत असली तरी कही सर्वसाधारण घटकांमधे अतिरिक्त घाम येणे, विचारांमधे स्पष्टता नसणे, स्व-संभ्रम, राग येणे आणि भिती वाटणे.उत्तेजीत करणाऱ्या घटकांना ओळखणे व सतर्क राहणे आणि सुद्रुढ विकल्प शोधणे या दोन महत्वाच्या सुत्रांनी तणाव टळू शकतो.परिस्थितीचे निदान करण्यासाठी काही चाचण्या आणि तपासण्या आहेत, तरी पात्र व्यावसायिकांसोबत विस्तृत चर्चा केल्याने सर्वात योग्य निदान होते. उपचारांमध्ये औषधोपचार, समुपदेशन, व वैकल्पिक निवारण आणि जीवनशैलीतील फेरबदल यांचा संयुक्त समावेश आहे.

तणाव ची लक्षणे - Symptoms of Stress in Marathi

लक्षणे व्यक्तीगणिक भिन्न असतात व तणावांच्या प्रकरांवर तसेच व्यक्ती कुठल्या स्तरावर आहे त्यावर अवलंबून असतात. काही लक्षणे इतकी मूळ असतात की ती दुर्लक्षिले जाणे सोपे असते किंवा वेगळ्याच स्थितीचा संभ्रम तयार करतात.

  • गंभीर तणावाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे:
  • अल्पकालीन गंभीर तणावांच्या लक्षणांचे गुण असे आहेत:
    • आक्रमकता, अधीरता,साधारणतः शत्रुत्वाची भावना, आणि अंतरंगातील भिती.
    • सगळ्याची न संपणारी भिती, नकारात्मकता आणि अविश्वासाचे भाव
    • उच्च रक्तदाब, छतीचे दुखणे, मायग्रेन अणि ह्रूदयाच्या समस्या
  • गंभीर तणाव तीव्र लक्षणे दाखवितात, ज्यात समविष्ट आहेत:
    • सतत आपले मूल्यांकन होत असल्याची भावना येणे
    • पुर्णवेळ उत्कृष्ट दिसण्याचा प्रयत्न करणे
    • अनुभवत असलेल्या दिर्घकालीन तणावांची अनभीज्ञता
    • ह्रूदयाचे आजार, ह्रूदयरोगाचे झटके आणि कर्करोग होण्याच्या संभावनेत वृद्धी होणे
    • हिंसक आणि आत्महत्येची वृत्ती  
    • तणावांना खुप वेळ सहन केल्यानेमानसीकरित्या गंभीरपणे कोलमडणे

तणाव चा उपचार - Treatment of Stress in Marathi

भिन्न प्रकारांचे उपलब्ध उपचार एकत्रीतपणे करणे तणावांसाठी उपयूक्त आहे.

  • औषधोपचार
    थेट तणावांचे उपचार करण्यासाठी औषधं निर्धारीत करता येत नसली तरिही तणावांशी संबंधीत समस्यांसाठी औषधोपचारांचा वापर करतात. निद्रानाश, भिती, नैराश्य,आणि पोटाशी संबंधीत आजारांच्या उपचरांसाठी औषधे दिली जातात.
  • समुपदेशन
    बोलणे तणावांना बऱ्यापैकी मुक्त करते. व्यवसायीक, सामंजस्यावर आधारीत उपचार आणि बुद्धीमत्तापूर्ण-आधारीत तणावमुक्ती, जे शक्तीला दिशा देण्यात व ताण कमी करण्यात मदत करतात, वापरतात.
  • वैकल्पिक उपचार
    योगासने, एक्युपंचर, अरोमाथेरपी (गंधांवर आधारित उपचार), आणि निवारणाच्या इतर पद्धती हे मान्यताप्राप्त विकल्प आहेत.
  • करमणूक
    करमणूकीचे उपक्रम तणाव कमी करण्यास मदत करतात आणि स्वस्थतेची जाणीव वाढीस लावतात. आत्मविश्वास वाढीला लावणारे प्रकल्प घेणे आणि विधायक योगदान करणे उपचारांची उत्तम साधने आहेत.

जीवनशैली व्यवस्थापन

दृष्टीकोन अधीक सकारात्मक होण्यासाठी व्यवस्थापनाची भिन्न तंत्रे मदत करतात

  • आधारगट
    दीर्घ काळासाठी, आधार गटांकडे, अनुभवांच्या आदानप्रदानातून, (तणावांचे) निवारण करण्यासाठी उत्तम मंच म्हणून बघता येते. त्याने आत्म-प्रशंसा वाढीस लागते आणि व्यक्तीला ती अपूर्ण व एकटी नसल्याची जाणीव होण्यास मदत होते.
  • छंद जोपासा
    आपला रिकामा वेळ स्वतःच्या आवडी पूर्ण करण्यात घालवणे तणावांना खूप कमी करते. छंद जोपासण्यातून आराम मिळतो आणि काही तरी सिद्ध केल्याची भावना होते. 
  • शरीर शिथील करण्याची तंत्रे
    ध्यान, योग आणि दृष्टीचे व्ययाम यासारख्या विश्रांतीतंत्रांचा नियमित अभ्यास करणे, व्यक्तीस शांत करण्यास मदत करतात आणि त्यांना उत्स्फुर्त निर्णय घेण्यापासून प्रतिबंधित करतात.
  • आहार आणि व्यायाम
    शरीराला आणि मनाला चपळ आणि सकारात्मक ठेवण्यात मदत करण्यासाठी आणि कायम निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • उद्दिष्टे ठरविणे
    यथार्थवादी, प्राप्त करण्यासयोग्य उद्दीष्टांची निश्चिती केल्यास सिद्धिची भावना येते आणि तणाव देखील कमी होतो. सुरुवातीस उद्दिष्टांची निश्चिती करण्यासाठी आणि प्राथमिकता ठरवण्यासाठी बाह्य सहाय्याची आवश्यकता असू शकते परंतु कालांतराने लोक त्यांची स्वतःची क्षमता अधिक स्पष्टपणे पाहू शकतील आणि स्वत: उद्दिष्टे निर्धारित करतील.
Badam Rogan Oil
₹399  ₹599  33% OFF
BUY NOW

तणाव काय आहे - What is Stress in Marathi

'तणाव'हा शब्द नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिला गेला असला तरीही, खरेतर शरीराची ही एक नैसर्गिक प्रतीकार करण्याची प्रक्रिया आहे. तणाव कधीकधी चांगले परिणाम देऊ शकतो, ज्यांत कामगिरीतील सुधारणा, परिणामांचे नाविन्यपूर्ण असणे आणि उत्तम सांघिक कार्ये समाविष्ट आहेत. जेव्हा खूप जास्त तणाव असतो आणि तो अयोग्यपणे हाताळला जातो तेव्हा तो आपल्या विचारांवर आणि भावनांवर परिणाम करतो, ज्यामुळे आपण मानसिक संतूलन गमावतो.

तणाव म्हणजे काय?

ताणाला सामान्यतः'लढा किंवा पळा'प्रतिसाद म्हटले जाते. ही धोक्याच्या परिस्थितीला मिळत असलेली शरिरीक प्रतिक्रिया आहे. तणाव असा मार्ग आहे ज्याद्वारे शरीर आपले रक्षण करते आणि येणारी आव्हाने हाताळण्यास मदत करते. हे आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास, प्रेरित करण्यास आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन करण्यास मदत करू शकते. विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढल्यासतणाव मानसिक आघात करतो आणि आपल्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर आणि आपल्या नातेसंबंधावर परिणाम होतो.



संदर्भ

  1. Selye, H. (1950, June 17). Stress and the general adaptation syndrome. British Medical Journal, 1(4667), 1383-1392. PMID: 15426759.
  2. American Psychological Association [internet] St. NE, Washington, DC. Stress.
  3. Anxiety and Depression Association of America [internet] Silver Spring, Maryland, United States. Physical Activity Reduces Stress.
  4. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; 5 Things You Should Know About Stress. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
  5. Noble RE. Diagnosis of stress. Metabolism. 2002 Jun;51(6 Suppl 1):37-9. PMID: 12040539
  6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Stress at work

तणाव साठी औषधे

Medicines listed below are available for तणाव. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.