मूत्रपिंडातील असंतुलन - Urinary Incontinence in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

May 02, 2019

July 31, 2020

मूत्रपिंडातील असंतुलन
मूत्रपिंडातील असंतुलन

मूत्रपिंडातील असंतुलन म्हणजे काय?

मूत्र किंवा मूत्राशयावर नियंत्रण कमी होणे ज्यामुळे मूत्र बाहेर निघते त्याला मूत्रपिंडातील असंतुलन म्हणतात.हे बरेचदा वृद्ध लोकांना होते, विशेषत: महिलांमध्ये. वाढत्या वयाबरोबर मूत्रपिंडातील असंतुलनाचा धोका देखील वाढतो. जेव्हा मूत्राशयाचे स्नायू मूत्र प्रवाह नियंत्रित करण्यास असक्षम होतात तेव्हा असे होते. याचे वेगवेगळे प्रकार आहेत - तणाव, आग्रह, ओव्हरफ्लो, मिक्स, फंक्शन आणि संपूर्ण असंतुलन.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

  • वारंवार मूत्रविसर्जन.
  • अंथरुणात लघवी होणे.
  • ओटीपोटावर दबाव जाणवणे.
  • हसताना किंवा खोकलताना मूत्र बाहेर पडणे.
  • थेंब थेंब मूत्र पडणे.
  • वॉशरूम वापरल्यानंतरही  मूत्रपिंड अपूर्ण रिकामे झाल्यासारखे वाटणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • मूत्रपिंडातील असंतुलनाची अनेक कारणे आहेत जसे:
  • मूत्राशयाच्या आतील भागात जळजळ होणे.
  • स्ट्रोक.
  • प्रोस्टेटची प्रतिबद्धता.
  • मूत्रपिंड किंवा मुतखडा.
  • बद्‍धकोष्ठता.
  • मूत्राशयावर दाब निर्माण करणारा ट्यूमर.
  •  दारू.
  • मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय).
  • सिडेटिव्ह्ज.
  • झोपेच्या गोळ्या.
  • स्नायू शिथिल करणारी औषधे.
  • वजन उचलणे.
  • मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा नसांचा विकार.
  • शस्त्रक्रिया किंवा बाहेरील आघाता  दरम्यान मूत्रमार्गात मूत्राशयावर नियंत्रण करणाऱ्या नसांना दुखापत.
  • निराशा किंवा चिंता.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तपशीलवार इतिहास घेतल्यानंतर डॉक्टर संभाव्य असामान्यतेसाठी शारीरिक तपासणी करतात. शिवाय पुढील काही चाचण्या केल्या जातात:

  • युरीन अ‍ॅनालिसिस - मायक्रोस्कोपिक आणि कल्चर.
  • पोस्ट व्हॉइड रेसिड्युअल (पीव्हीआर) चाचणी - लघवी केल्यानंतर मूत्राशयात किती मूत्र शिल्लक राहते हे समजण्यात मदत होते.
  • ऑटोमिम्यून अँटीबॉडीज, इत्यादिंसाठी रक्त तपासणी.
  • सिस्टोग्राम - हा मूत्राशयाच्या एक्स-रे चा प्रकार आहे.
  • पेल्व्हिक अल्ट्रासाऊंड.
  • युरोडायनामिक चाचणी - मूत्राशय आणि मूत्रपिंडाचे स्नायू किती दबाव सहन करू शकतात हे तपासण्यासाठी.
  • सिस्टोस्कोपी.

निदानानंतर, रुग्णांना विविध पद्धतींने उपचार दिले जातात जसे:

  • मूत्र गोळा करण्यासाठी मूत्र ड्रेनेज पिशव्या वापरल्या जाऊ शकतात.
  • पॅड, पँटी लायनर्स, प्रौढ डायपर यासारखी शोषक उत्पादने देखील वापरली जाऊ शकतात.
  • मूत्राच्या गळतीमुळे त्वचेवर होणारा लालसरपणा आणि पुरळ कमी करण्यासाठी अँटीमायक्रोबियल क्लीन्झरचा वापर केला जाऊ शकतो.
  • इंटरमिटंट कॅथीटेरायझेशन - युरीथ्रामध्ये घातलेल्या कॅथेटरद्वारे मूत्र गोळा केले जाते. कॅथेटर मूत्रपिंडात ठेवलेली लवचिक ट्यूब असते. ते टेफ्लॉन किंवा सिलिकॉन कोटिंगसह लॅटेक्सचे बनलेले असतात.एकदा कॅथेटर घातले की, फुगा फुगतो ज्यामुळे कॅथेटर बाहेर पडत नाही.
  • कंडोम किंवा टेक्सास कॅथेरेटर म्हणून ओळखली जाणारी बाह्य एकत्रिकरण प्रणाली पुरुषांमध्ये जानेंद्रियावर लावली जातात.
  • बेडसाइड कमोड्स किंवा कमोड सीट्स, बेड पॅन आणि युरिनल्स, शौचालयासाठी हे पर्याय वापरता येतात.
  • केगेल सारख्या पेल्विक स्नायूच्या व्यायामामुळे देखील मदत मिळू शकते.
  • वेळेचे समायोजन - या पद्धतीमध्ये, लघवीसाठी एक निश्चित शेड्यूल असतो, ज्यामुळे मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
  • बायोफिडबॅक - व्यक्तीस शरीराच्या सिग्नलबद्दल जागरूक करण्यात मदत करते. हे मूत्राशय आणि मूत्रमार्गांच्या स्नायूंवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यात मदत करते.
  • कॅफीन, अल्कोहोल आणि तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणे.



संदर्भ

  1. National Association for Continence. URINARY INCONTINENCE OVERVIEW. USA [Internet]
  2. National Institute on Aging [internet]: US Department of Health and Human Services; Urinary Incontinence in Older Adults
  3. Urology Care Foundation [Internet]. American Urological Association; What is Urinary Incontinence?
  4. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Urinary incontinence.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Urinary Incontinence

मूत्रपिंडातील असंतुलन साठी औषधे

Medicines listed below are available for मूत्रपिंडातील असंतुलन. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.