व्हिटॅमिन ईची कमतरता - Vitamin E Deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 02, 2019

July 31, 2020

व्हिटॅमिन ईची कमतरता
व्हिटॅमिन ईची कमतरता

व्हिटॅमिन ईची कमतरता म्हणजे काय?

व्हिटॅमिन ईची कमतरता म्हणजे शरीरात व्हिटॅमिन ई कमी प्रमाणात असणे. व्हिटॅमिन ई हिरव्या पालेभाज्या, नटस  आणि बिया आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये आढळते. असे आढळून आले आहे की नवजात बालकांमध्ये व्हिटॅमिन ईची मात्रा कमी असते. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये कमी आणि गरोदरपणात जास्त आढळते. व्हिटॅमिन ईची कमतरता दुर्मिळ आहे कारण ते नेहमीच्या अन्न पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लहान मुलांमधील चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहे:

  • चालण्यात अडचण येणे.
  • समन्वयाचा अभाव.
  • स्नायू थकणे.
  • हिमोग्लोबिन कमी होणे.
  • प्रतिकार शक्ती कमकुवत असणे.

व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यामुळे अटॅक्सिया होऊ शकते, ज्यामुळे समन्वय आणि न्यूरोलॉजिकल समस्या होतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

असे दिसून आले आहे की अपर्याप्त आहारामुळे विशेषतः चरबी ची मात्रा कमी असल्याने व्हिटॅमिन ईच्या शोषणावर परिणाम होतो. कारण ह्या व्हिटॅमिनला अन्नपासून रक्तप्रवाहात शोषल्या जाण्यास बराच वेळ लागतो. या व्हिटॅमिनच्यख कमतरतेसाठी खालील घटक कारणीभूत आहेत:

असे आढळून आले आहे की विकसित देशांमध्ये, बहुतेक विकार जे चरबीच्या शोषणार परिणाम करतात त्यांमुळे व्हिटॅमिन ईची कमतरता होते. तर विकसनशील देशांमध्ये योग्य आहाराच्या कमतरतेमुळे हा रोग होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर शारीरिक तपासणी करतील आणि पूर्व इतिहास, तक्रारी किंवा आजारांबद्दल विचारतील. रक्त तपासणीद्वारे रक्तात व्हिटॅमिन ईच्या पातळीचे मूल्यांकन केले जाऊ शकते. रोगनिदानाची लक्षणे लॅब चाचणी अहवाल आणि सामान्य परीक्षा यावर आधारित आहे.

व्हिटॅमिन ई अनेक काम करते. चरबीमध्ये  विरघळणारे असल्यामुळे, व्हिटॅमिन ई युक्त आहार ,त्याचे शोषण वाढवते.उदाहरणार्थ नट्स ,बिया आणि सुका मेवा जसे बादाम. शिवाय व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स दिली जाऊ शकतात. अगदी नवजात बाळांसाठी कॅप्सुल्स उपलब्ध आहेत. हे समजणे महत्वाचे आहे की व्हिटॅमिन ई-समृध्द पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला कोणताही त्रास होत नाही पण अतिरिक्त सप्लिमेंट्स घेतल्यास गंभीर रक्तस्त्राव आणि यकृतासारख्या महत्वाच्या अवयवांना नुकसान होऊ शकते.



संदर्भ

  1. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Vitamin E.
  2. Kemnic TR, Coleman M. Vitamin E Deficiency. [Updated 2019 Feb 14]. In: Vitamin E Deficiency.. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  3. MSD mannual consumer version [internet].Vitamin E. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
  4. National Organization for Rare Disorders [Internet]; Ataxia with Vitamin E Deficiency.
  5. Saliha Rizvi et al. The Role of Vitamin E in Human Health and Some Diseases. Sultan Qaboos Univ Med J. 2014 May; 14(2): e157–e165. PMID: 24790736
  6. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Vitamin E. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vitamin E.

व्हिटॅमिन ईची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

व्हिटॅमिन ईची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for व्हिटॅमिन ईची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.