जसे की तुम्हाला माहीतच आहे, भारतावर नैसर्गिक कृपा आहे आणि ही जनश्रुती आणि पर्यायी उपचारपद्धतींची भूमी आहे. या लेखामध्ये, आपण सफेद मुसळीसारख्या एक अशा नैसर्गिक दुर्लभ वनस्पतीबद्दल माहिती घेऊन त्यावर प्रकाश टाकणार आहोत.

सफेद मुसळी एक दुर्लभ भारतीय वनस्पती आहे, जी जगात कुठेही आढळत नाही, पण भारतीय जंगलांमध्ये बेफाम आढळते. सोन्याहून पिवळे हे की आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे, संशोधक सफेद मुसळीचे अधिकाधिक आयुर्वेदिक फायदे शोधण्यास समर्थ आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात या वनस्पतीची मागणी वाढत आहे, पण त्याच्या अनेक फायद्यांमुळे सर्वात महत्त्वाचे हे की ते पुरुष लैंगिक आरोग्यसंबंधी समस्यांसाठी खूप लाभकारक आहे. आयुर्वेदामध्ये, सफेद मुसळी त्याच्या शक्तिशाली आरोग्य फायद्यांसाठी आणि एक उत्कॄष्ट एडेप्टोजेन (तणावरोधी वनस्पती) म्हणून ओळखली जाते. वास्तविक, तिला आयुर्वेदिक वैद्यांद्वारे “पांढरे सोने “ किंवा दिव्य औषधी असे म्हटले जाते. आयुर्वेदिक वैद्यांचा इशारा आहे की सफेद मुसळीमध्ये विआग्रासारखेच पुरुषांच्या लैंगिक समस्या सुधारण्याची क्षमता आहे. तसेच, त्याचे कोणतेही सहप्रभाव नाही कारण ते व्यावसायिकरीत्या उपलब्ध रासायनिक पूरक तत्त्वे उदा. विआग्रामध्येही आढळते.

सफेद मुसळी अशा पद्धतीने न केवळ भारत तर संपूर्ण जगामध्ये विआग्रासारख्या व्यावसायिक औषधांना नैसर्गिक पर्याय म्हणून प्रसिद्धी पावत आहे. ऐतिहासिकरीत्या सफेद मुसळीचे अनेक वर्षांचे इतिहास आहे, पण सफेद मुसळीचे प्रथम उल्लेख जुने भारतीय ग्रंथ “राजनिघंटु”मध्ये आढळते, जी आयुर्वेदिक औषधिकोष (विशिष्ट वनस्पतींबद्दल संपूर्ण माहिती, विशेषकरून तिच्या उपचारात्मक गुणधर्मांबद्दल माहिती असलेली पुस्तक आहे.

भारतातील ही सामान्य जंगली वंनस्पती असली, तरी कंदमुळांची अविविकी कापाकापी आणि पीक काढल्यामुळे तिचे अस्तित्व संवेदनशीलतेच्या भोवर्र्यात सापडले आहे. आययुसीएन ( आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ) याने या वनस्पतीला गंभीररीत्या धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या सूचीमध्ये टाकले जाते म्हणजेच या वनस्पतीचे संगोपन न झाल्यास, ती लवकरच लोप पावू शकते. पण दुःखाची गोष्ट ही की, असे धोके असूनही, सतत वाढती वैश्विक मागणी आणि नवीन वैज्ञानिक प्रगतींमुळे सफेद मुसळी कॅश क्रॉप म्हणून शेतांमध्ये नांदत राहिली आहे.

सफेद मुसळीबद्दल काही मूळभूत तथ्य:

  • जीवंशास्त्रीय नांव: क्लोरोफाइटम बॉरिव्हिलिनिअम किंवा एस्पेरेगस एड्सेंडेंस
  • कुटुंब: लिलेसेस
  • सामान्य नावे: सफेद मुसळी , व्हाइट मुसळी, इंडिअन स्पायडर प्लांट
  • संस्कृत नांव: मुसळी
  • वापरले जाणारे भाग: मूळ आणि बिया
  • स्थानिक क्षेत्र आणी भौगोलिक वितरण: सफेद मुसळी भारतातील स्थानिक आहे, म्हणजेच ती केवळ भारतात आढळते. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान भारतातील सफेद मुसळीचे मुख्य उत्पादक आहेत.
  • तासीर: वात आणि पित्त दोषांना शांत करते, पण कफ वाढवते
  1. सफेद मुसळीचे आरोग्य फायदे - Health benefits of Safed Musli in Marathi
  2. सफेद मुसळी रोप आणि ते कसे वापरले जाते - White musli plant and how it is used in Marathi
  3. सफेद मुसळीची मात्रा - Safed musli dosage in Marathi
  4. सफेद मुसळीचे सहप्रभाव - Safed musli side effects in Marathi

सफेद मुसळीचे मूळ रूप एडेप्टोजेन आणि एफ्रोडिझिअक असे आहे, म्हणजेचे तिच्यामुळे तणाव निघण्यास मदत होते आणि लैंगिक उत्साह आणि कार्य सुधारण्यात खूप चांगले आहे. पण, त्याचे काही पोषक फायदेही आहेत, सर्वांगीण आरोग्य राखून ठेवण्यासाठी ती नेमकी योग्य वनस्पती आहे. चला, आपण सफेद मुसळीचे काही प्रसिद्ध फायदे जाणून घेऊ या:

  • लैंगिक इच्छा सुधारते: सफेद मुसळी पारंपरिक औषधीमध्ये एक सुप्रसिद्ध एफ्रोडिझिअक आहे. अभ्यास सुचवतात की शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तर वाढते, जे महिला आणि पुरुष दोघांमध्ये चांगली लैंगिक इच्छा जे महिला आणि पुरुष दोघांमध्ये चांगली लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी जवाबदार असलेले हार्मोन आहे. .
  • शुक्राणूंची संख्या वाढते: संशोधन अभ्यास दर्शवतात की पांढरी मुसळी घेतल्याने अज्ञात पद्धतीने शुक्राणूंची संख्या, वीर्य पातळी आणि टेस्टोस्टोरोन वाढते. वास्तविक, सफेद मुसळी आयुर्वेदामध्ये वाजिकर्ण पद्धतीत वापरली जाते, ज्याने लैंगिक ऊर्जा वाढते आणि निरोगी संततीची सुनिश्चिती होते.
  • स्तंभनदोषामध्ये सुधार करते: हे निर्धारित झाले आहे की सफेद मुळी पुरुषांच्या जननेंद्रियाला रक्ताभिसरण वाढवते आणि शरिरातील विशिष्ट चयापचय मार्गिकेवर नियंत्रण आणते. याने न केवळ स्तंभनदोष सुधारतो, तर स्तंभन दीर्घकाळ राखून ठेवण्यातही मदत होते.
  • वेळेपूर्व वीर्यपतनाचे प्रबंधन: तणाव नष्ट करणारी वनस्पती आणि प्रभावी एफ्रोडिझिअक म्हणून, सफेद मुसळी वेळेपूर्वी वीर्यपतनाच्या काही प्रमुख कारणांचे प्रबंधन करते. ती न केवळ शरिराला पोषण देते आणि दोषांमध्ये संतुलन आणते, तर त्यामुळे लैंगिक कार्यही सुधारतो.
  • महिलांच्या आरोग्यासाठी लाभकारक: सफेद मुसळी एक प्रभावी एडप्टोजेन आहे, ते तणाव कमी करतो आणि महिलांमधील लैंगिक ऊर्जा सुधारते. त्यामुळे हार्मोन असंतुलनचे नियामन होते आणि रजोनिवृत्तेच्या चक्राचेही नियामन होते.
  • मधुमेहाच्या प्रबंधनामध्ये लाभकारक: भारतातील अभ्यासांचा दावा आहे की सफेद मुसळी एक उत्कृष्ट मधुमेहरोधी वनस्पती आहे. तथापी, आयुर्वेदिक वैद्यांनुसार, मात्रा हाइपोग्लाइसेमिक कार्यामध्ये ( रक्तशर्करा कमी करणारे) महत्वाची भूमिका बजावते. अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणें चांगले असते.
  • हृदयाला मित्रवत अशी वनस्पती: सफेद मुसळीमध्ये शक्तिशाली हाइपोपिडेमिक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. त्याने खराब कॉलेस्टरॉल कमी होते आणि चांगले कॉलेस्टरॉल वाढते, ज्याने एथेरोस्क्लेरोसिस, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या कार्डीओव्हॅस्कुलर समस्यांचा धोका कमी होतो.
  • संधिवाताच्या लक्षणांमधून आराम मिळते: दाहशामक पदार्थ असल्याने, सफेद मुसळीमुळे सांधांची वेदना आणि संधिवाताशी संबंद्ध सुजेतून आराम मिळते. आयुर्वेदाप्रमाणें, सफेद मुसळी सांध्यांमधील सायनॉव्हिअल फ्लुइड वाढते, ज्याने तुमच्या हाडांना आवश्यक समर्थन मिळते आणि झीज कमी होते.
  • संगोपक मातांसाठी चांगले: सफेद मुसळीमुळे संगोपक मातांमध्ये स्तनातील दुधाचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. त्याने त्यांच्या शरिराचे पोषण होते, शिशुजन्मानंतरच्या कमतरता टळतात आणि शिशुजन्मानंतरचे आरोग्य पुनर्स्थापित होते.
  • वजन वाढण्यास वाव मिळतो: सफेद मुसळी एक पोषक आणि तणाव मुक्त करणारी वनस्पती आहे, ज्यामुळे शरीरसौष्ठव पूरकतत्वांचे महत्वाचे भाग बनते. त्याने स्नायूनिर्मिती आणि तंतूची दुरुस्ती होते, ज्याने वजनवाढ सुलभ होते.
  • प्रतिकार कार्याला चालना मिळते: शास्त्रीयरीत्या सिद्ध झाले आहे की सफेद मुसळी एक उत्कृष्ट इम्युनोमॉड्युलेटर ( प्रतिकारक्षमतेमध्ये सुधार करणारी) आहे. म्हणजेच ती सर्वांगीण प्रतिकार कार्याला सुधारते, ज्याने तुम्ही रोग आणि संक्रमणांपासून मुक्त राहता. मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात?
  • त्वचा मऊ आणि लवचिक करते: संशोधन अभ्यासांनुसार, सफेद मुसळीमधील पॉलिसॅक्राइड्स त्वचेचे आरोग्यास वाव देतात. वनस्पतीचे त्वचेवर आर्द्रताकारक आणि पोषक प्रभाव होते, ज्याने तुम्ही तरुण आणि ताजेतवाने दिसता.

सफेद मुसळी लैंगिक इच्छा सुधारते - Safed musli improves libido in Marathi

आजच्या पिढीमधील तणावपूर्ण आणि द्रुतगतीच्या जीवनशैलींमुळे महिला आणि पुरुष दोघांमधील लैंगिक इच्छेची क्षती होणें सुलभ झाले आहे. कार्य करण्यासाठी भरपूर गोष्टी असतात आणि तुम्हाला माहीत होण्यापूर्वीच तणाव खूप अधिक होतो. लक्षणीय अभ्यासांचा दावा आहे की लैंगिक क्षमता कमी होणें जाणून केलेल्या निवडीपेक्षा एक मानसिक समस्या बनते. तथापी, तणाव हे एकमेव कारण नव्हे, कमी लैंगिक क्षमता असल्याने शरिरातील लैंगिक हार्मोंचे असंतुलनही होऊ शकतो. दिवसाच्या धाकधुकीत थकून गेलेल्या लोकांपैकी तुम्ही एक असल्यास किंवा लैंगिक हार्मोनच्या शरीरशास्त्रीय असंतुलनाचा त्रास तुम्हाला असल्यास, सफेद मुसळी तुमच्यासाठी आदर्श वनस्पती होऊ शकते. निम्न कामेच्छेवरील उपचारासाठी सफेद मुसळी एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी आहे. महिलांमध्ये कामेच्छा सुधारण्यात ती तेवढी प्रसिद्ध नसली, तरी दोन्ही लिंगांमध्ये एकप्रकारेच ती काम करते. संशोधनामध्ये, असे सुचवले जाते की या मुळाच्या वापराने शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तर वाढण्यावर थेट प्रभाव होतो, जे महिला आणि पुरुषांमधील कामेच्छेसाठी जवाबदार घटकांपैकी एक आहे.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

सफेद मुसळी शुक्राणूंची संख्या वाढवते - Safed musli increases sperm count in Marathi

आयुर्वेदामध्ये, सफेद मुसळी पुरुषांच्या सर्वांगीण लैंगिक आरोग्याचे सुधार आणि प्रबंधनासाठी ख्यातनाम आहे. ती आयुर्वेदाच्या वाजीकरण चिकित्सेमध्ये वापरली जाणारी प्रमुख वनस्पती असून, ही पद्धती आयुर्वेदामध्ये न केवळ लैंगिक शक्ती तर संततीचे आरोग्य आणि गुणवत्ता निश्चित करण्यातही खूप साहाय्य करते.

आधुनिक विज्ञानाला या आश्चर्याची माहिती खूप वेळ नसेल, पण पाश्चात्य औषधीय व्यवस्थाही मानवी शरिरावरील जैवरसायनिक आणि शरीरशास्त्रीय प्रभावांची चांगली माहिती आहे. सफेद मुसळीच्या जल घुलनशील सारावर घेतलेल्या हल्लीच्या अभ्यासामध्ये, शुक्राणूंची संख्या, वीर्यपातळी आणि टेस्टोस्टोरोन वाढवण्यात त्याचे लक्षणीय प्रभाव दिसून आले आहे. तथापी, त्याच्या वास्तविक कार्यपद्धतीबद्दल बरीचशी माहिती नाही. हे सुचवले जाते की सफेद मुसळीमध्ये रासायनिक यौगिके असतात, जे पुरुषांमधील सर्वांगीण लैंगिक आरोग्य सुधरण्यात एक संप्रेरक म्हणून कार्य करते.

स्तंभनदोषासाठी सफेद मुसळी - Safed musli for erectile dysfunction in Marathi

सफेद मुसळीचे वापर पुरुषांमधील स्तंभनदोषावर उपचार करण्यात खूप प्रभावी मानली जाते. आयुर्वेदाप्रमाणें, ती न केवळ स्तंभनदोषासाठी चांगली आहे, तर खूप वेळ स्तंभन राखून ठेवण्यातही मदत करते. असा विश्वास आहे की शरिरातील विशिष्ट मार्गिकेचे नियंत्रण करण्याद्वारे (रो किनेझ 2) ती असे करते, जी इतर वेळा जननेंद्रियाला रक्ताभिसरण कमी करते. तरी, शरिरावर त्याचे कार्य आणि भूमिकेच्या अधिक विस्तृत यंत्रणा प्राप्त करण्यासाठी अभ्यास प्रगतीपथावर आहेत.

सफेद मुसळीचे महिलांसाठी फायदे - Safed musli benefits for women in Marathi

पुरुषी लैंगिक आणि शरीरशास्त्रीय कार्यांसाठी सफेद मुसळीबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे, पण ती संपूर्णपणें पुरुषावर लक्षित वनस्पती नव्हे. नियमितपणें सफेद मुसळी घेतल्याने महिलांनाही काही उपयोगी लाभ होतात. मग, ती एक शक्तिशाली एडेप्टोजेन आहे ज्याचे अर्थ ती तणाव कमी करते, जी पुरुषांसारखी महिलांमध्येही एक समस्या आहे. आणि शेवटी, सफेद मुसळीमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात, जे शरिराची ताकद वाढवण्यासाठी खूप लाभकारक आहे. सफेद मुसळी खाल्याने लवकर वयवाढ होण्याची शक्यता कमी होते आणी एकूण शरिराची स्थिती सुधारते. सफेद मुसळी खूप चांगली हार्मोन नियामकही आहे, त्याने एस्ट्रोजेनसारख्या महिला हार्मोनमध्येही संतुलन निर्माण होते. ही वनस्पती नियमित वापरल्याने महिलांचे मासिक धर्म ही नियामित होण्याचे दिसून आले आहे.

मधुमेहासाठी सफेद मुसळी - Safed musli for diabetes in Marathi

भारतात सफेद मुसळीवर झालेल्या हल्लीच्या अभ्यासांचा दावा आहे की सफेद मुसळी प्रकार 2 मधुमेहापासून ग्रस्त असलेल्या लोकांना खूप लाभप्रद आहे. तरी, आयुर्वेदिक वैद्यांनुसार, लोकांनी योग्य मात्रेत घेतल्यानेच सफेद मुसळी प्रभावी होते. ते घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हृदय आणि कॉलेस्टरॉलसाठी सफेद मुसळीचे फायदे - Safed musli benefits for heart and cholesterol in Marathi

सफेद मुसळीमुळे उच्च घनत्त्वाची वसा ( चांगली वसा) वाढून शरिरातील कमी घनत्वाच्या वसेचे प्रमाण कमी होते. . उच्च घनत्वाची वसामुळे यकॄत शरिरातील कॉलेस्टरॉल काढून टाकते आणि शरिरातील सर्वांगीण कॉलेस्टरॉल कमी होते. यामुळे, प्लाक ( आर्टरीमधील वसा संचय) बनण्याची शक्यता कमी होते आणि हृदयाच्या समस्या आणि हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका खूप कमी होतो.

 (अधिक वाचा: अधिक कॉलेस्टरॉलवर उपचार)

वेळेपूर्वी वीर्यपतनावरील उपचारासाठी सफेद मुसळी - Safed muslii for the treatment of premature ejaculation in Marathi

 वेळेपूर्वी वीर्यपतन एक परिस्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्ती अधिक वेळ स्तंभन राखून ठेवण्यात सक्षम होत नाही आणि योनीमध्ये प्रवेश होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर लगेच वीर्यपात होतो. या परिस्थितीचे वास्तविक कारण माहीत नसले, तरी असा अंदाज आहे की तणाव, अशक्तता आणि हार्मोन असंतुलन किंवा कामेच्छा कमी असणेंसुद्धा या परिस्थितीला जवाबदार असतात. तरी, सफेद मुसळी एफ्रोडिझिअक असल्याने न केवल टेस्टोस्टोरोनचे (पुरुष लैंगिक हार्मोन) स्तर वाढवते, तर तणावनाशक म्हणून ही कार्य करते आणि त्यामुळे तुम्हाला स्तंभन आणि नंतर वीर्यपतन प्राप्त करता येते. आयुर्वेदिक वैद्य म्हणतात की स्तंभनदोष शरिरातील वात आणि पित्त दोषांच्या असंतुलनामुळे निर्माण होतो. सफेद मुसळी या दोन दोषांमध्ये संतुलन आणून शांत करते, यामुळे स्तंभनदोषाच्या समस्या सोडवल्या जातात.

संधिवातासाठी सफेद मुसळी - Safed musli for arthritis in Marathi

सफेद मुसळी एक प्रख्यात दाहशामक वनस्पती आहे आणि त्याच्या लाभांसाठी आयुर्वेदामध्ये वापरले जात आहे. संधिवात असलेल्या रुग्णांमध्ये सांध्यांचे दाह कमी करण्यात ती खूप प्रभावी अशी आढळून आली आहे. आयुर्वेदामध्ये, सफेद मुसळीने संधिवातातील रुग्णांमधील सिनोव्हिअल फ्लुइड (सांध्यांतील तरळ पदार्थ) वाढते, असा विश्वास आहे. अशाप्रकारे, सांध्यांना अधिक स्निग्धता मिळते आणि या सांध्यांमधील झीज कमी होते. संधिवातरोधी उपचारामध्ये या वनस्पतीला सामील करण्यासाठी लक्षणीय संशोधन सुरू आहे.

स्तनपान देणार्र्या मातांसाठी सफेद मुसळीचे फायदे - Safed musli benefits for breastfeeding mothers in Marathi

सफेद मुसळी एक प्रख्यात गॅलॅक्टोगॉग आहे, म्हणजेच स्तनपान करवणार्र्या मातांमध्ये दूध उत्पादन वाढवण्यात मदत करते. तसेच, त्याचे पोषक प्रभाव नवीन मातांची शिशुजन्मानंतरच्या कमतरतांना हाताळून चांगले आरोग्य प्रदान करतात. तरीही, तुम्ही आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेऊनच सफेद मुसळी घेतली पाहिजे.

 (अधिक वाचा: स्तनापान देणार्र्या मातांचे आहार)

वजनवाढीसाठी सफेद मुसळी - Safed musli for weight gain in Marathi

सफेद मुसळीच्या पोषक आणि एडेप्टोजेनिक गुणधर्म त्याला वजन वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट प्राकृतिक पर्याय बनवतात. वास्तविक पाहता, अनेक शरीरसौष्ठव पूरक तत्वांमध्ये सफेद मुसळी त्याची घटक असली पाहिजे. आयुर्वेदिक वैद्य पोषक आणि शरीरसौष्ठव पैलूंचा आनंद घेण्यासाठी 2-3 महिने नियमित सफेद मुसळी घेण्याचा सल्ला देतात. तसेच, ती प्रतिकारप्रणालीसाठी खूप चांगली आहे, म्हणजेच तुमच्या शरिराला संक्रमण विरुद्ध लढण्यास त्वरित आणि अधिक प्रभावीपणें मदत करतात व तंतूना झालेल्या क्षतीची दुरुस्ती करतात.

 (अधिक वाचा: वजन वाढण्यासाठी आहार तालिका)

प्रतिकारप्रणालीसाठी सफेद मुसळीचे फायदे - Safed musli benefits for immune system in Marathi

तुम्हाला संक्रमणे सहज जडतात का? सर्वांत सामान्य संक्रमणांविरुद्ध अधिक शक्तिशाली नसल्यामुळे तुम्ही सतत तुमच्या शरिराला शिव्या देता का? हे तुमच्या शरिराच्या अशक्त प्रतिकारप्रणालीमुळे असू शकते. जसे की तुम्हाला माहीतच आहे, शरिराची प्रतिकारप्रणाली रोगांविरुद्ध सुरक्षेची प्रमुख ओळ असते. तिच्यामुळे तुमच्या शरिरांचे संक्रमणाविरुद्ध रक्षण होते, पण अशक्त किंवा हळू झालेल्या प्रतिकारप्रणालीने तुम्ही एक निरोगी शरिराच्या आवश्यकतांची पूर्तता करू शकत नाही. चांगली बातमी ही की उपाय खूप लांब नाही. सफेद मुसळीमुळे शरिराची सर्वांगीण प्रतिकार प्रतिक्रिया सुधारते आणि तुम्हाला सहज नवीन संक्रमणे जडत नाहीत. अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की सफेद मुसळीच्या एथनॉलिक सार खूप प्रभावी इम्युनोमॉड्युलेटर आहेत, म्हणजेच सफेद मुसळी विविध रोगांविरुद्ध शरिराचे प्रतिकार प्रतिसाद सुधारण्यास मदत करते. त्याच अभ्यासामध्ये, असा दावा केला गेला होता की सफेद मुसळी न केवळ सामान्य प्रतिकारामध्ये सुधारणा करण्यास मदत करते, तर रोगकारक पदार्थ नष्ट करण्याची प्रतिकारप्रणालीची क्षमताही सुधारते.

 (अधिक वाचा: प्रतिकारास चालना देणारे अन्न)

त्वचेसाठी सफेद मुसळीचे फायदे - Safed musli benefits for skin in Marathi

सफेद मुसळीमध्ये विशिष्ट पॉलिसॅक्राइड असल्याचे सांगितले जाते, ज्यांचे त्वचेवर संप्रेरक प्रभाव होते. भारतात झालेल्या एका संशोधनाचा दावा आहे की सफेद मुसळी शरिरातील काही चयापचय प्रतिक्रियांना सक्रिय करते, जे त्वचेतील आर्द्रता सामग्री सुधारते आणि त्वचेला मऊ आणि स्वच्छ बनवते. तरीही, त्वचेत सुधार करण्याच्या कोणत्याही रूपामध्ये सफेद मुसळी वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेतला पाहिजे.

  • सफेद मुसळी सर्वांत सामान्य म्हणजे पूडाच्या रूपात घेतली जाते. तिला गरज आणि आयुर्वेदिक वैद्यकीय सूचनेप्रमाणें काढा ( खोकला आणि सामान्य पडशासाठी घेतले जाणारे आयुर्वेदिक पेय) नावाच्या मिश्रणात तयार केले जाऊ शकते किंवा दूध, मध किंवा इतर वनस्पतींसह घेतले जाते.
  • त्वरित उपाय म्हणून सफेद मुसळी पावर कॅप्स्युल आणि टॅबलेट बाजारात उपलब्ध आहेत.
  • ती मातांच्या शिशुजन्मानंतरच्या आहारातील महत्त्वाचे भाग आहे आणि लाडूच्या रूपात नवीन मातांन दिली जाते.
  • केरळामधील पारंपरिक उपचारकर्ते तिला हेअरलाइन फ्रेक्चर ( अगदी साधे अस्थिभंग) याच्या त्वरित उपचारासाठी सफेद मुसळीच्या मुळाचे पेस्ट म्हणून वापरले जाते.
  • सफेद मुसळीचे पूड दूध आणि मधाबरोबर मिसळले जाते आणि पेस्टच्या रूपात त्वचेवर लावले जाते, ज्याला त्वचेची संरचना आणि रंग सुधारले जाण्याचे (स्किन व्हाइटनिंग) सांगितले जाते .
  • ते एक सामान्य आयुर्वेदिक औषध “मुसली पाक” याचे महत्त्वाचे भाग आहे, ज्याचे वापर लैंगिक विकारांच्या उपचारात केले जाते.
  • या वनस्पतीची पाने देशाच्या अनेक भागांमध्ये खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात.

सफेद मुसळीला ओळखणें:

सफेद मुसळी एक बारमाही वनस्पती आहे ( दर वर्षी तिला परत परत रोपावे लागत नाही) जिची पाने थेट भूमीतून उगतात. या पानांची संरचना सबलेंसेलोट (मधील भागामध्ये रुंद आणि शेवटी अरुंद असते, भाल्याच्या टोकाप्रमाणें असते) आणि थर समानरूपी असतो. मूळ शंकुआकाराचे असतात आणि त्यामध्ये ट्यूबर असतात (जाड आणि मांसळ मूळ जिथे अन्न रोपात साठवले जाते उदा. बटाटा एक ट्युबर आहे) . सफेद मुसळी रोप भूमीपासून 1. 5 फीटपर्यंत वाढते, तर त्याचे मूळ भूमीतून दहा इंचांपर्यंत जाऊ शकते. एकल रोपामध्ये 5-30 ट्युबरपर्यंत काहीही असू शकते. सफेद मुसळीच्या रोपाला लहान पांढरी फुले लागतात, जे पर्यायाने समूहामध्ये पिकतात. सफेद मुसळी रोपाला जुलैच्या महिन्यात साधारणपणें फुले लागतात. बिया लहान आणि काळी असतात, ज्या कांद्याच्या बियांसारख्या असतात आणि कोणीय किनारी असतात.

सफेद मुसळी पूडाची नियत मात्रा प्रति दिन रिकाम्या पोटी 1-2 चहाचे चमचे अशी आहे. तरी, आयुर्वेदिक वैद्यांप्रमाणें, सफेद मुसळीची मात्रा आणि वापर व्यक्तीचे वय, लिंग आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असली पाहिजे. म्हणून, कोणत्याही स्वरूपात सफेद मुसळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. सफेद मुसळी हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये घेतलेले उत्तम आहे, कारण मुळांपासून अधिक शरीर ताप निर्माण होऊन त्या गरम होतात.

काळ्या मुसळीबरोबर समान प्रमाणामध्ये शतावरी, अश्वगंधा आणि सलेप घेतली जाते, आदर्शरीत्या 1 चमचा रात्रीत घेतली जाऊ शकते. काळी मुसळी रात्रीत घेणें महिलांमधील श्वेतप्रदरासाठी ( योनीमध्ये पांढरे-पिवळे गळती होणें याचे वैशिष्ट्य आहे) प्रभावी मानली जाते. तसेच, 1:1 अनुपातामध्ये दुधात मिश्रीसह घेतल्याने सामान्य थकव्यासाठी ते बरे मानले जाते.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹599  ₹850  29% OFF
BUY NOW
  • सफेद मुसळीचे ज्ञात सहप्रभाव नाहीत, पण नियमित वापरल्याने वजन वाढू शकतो. म्हणून लठ्ठ व्यक्तींनी आर्युवेदिक वैद्याचा सल्ला न घेता सफेद मुसळी घेऊ नये.
  • तसेच, सफेद मुसळी पचण्यास खूप सोपी नाही, म्हणून अधिक वेळ अपर्याप्त मात्रेत घेतल्याने काही पचनात्मक गैरसोय उद्भवू शकते. ज्ञात यकृताचे रोग असलेल्या लोकांनी सफेद मुसळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा नेहमी सल्ला घेतला पाहिजे.
  • गरोदर महिलांनी आहारामध्ये सफेद मुसळी घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, कारण त्याचे प्रभाव आणि प्रतिक्रिया अजूनही अज्ञात आहेत आणि संशोधन प्रगतीपथावर आहे. तरीही, स्तनपान देणार्र्या माता सुरक्षितपणें डॉक्टरांचा सल्ल्याने सफेद मुसळी घेऊ शकतात.
  • सफेद मुसळी काही औषधांबरोबर घेतल्याने त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करू शकते. म्हणून, तुम्हाला आधीच काही औषधे विहित केलेली असल्यास, सफेद मुसळीची पूरक तत्त्वे घेण्यापूर्वी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.

Medicines / Products that contain Safed Musli

संदर्भ

  1. Sudipta Kumar Rath, Asit Kumar Panja. Clinical evaluation of root tubers of Shweta Musali (Chlorophytum borivilianum L.) and its effect on semen and testosterone. Ayu. 2013 Jul-Sep; 34(3): 273–275. PMID: 24501522
  2. P. K. Dalal, Adarsh Tripathi, S. K. Gupta. Vajikarana: Treatment of sexual dysfunctions based on Indian concepts. Indian J Psychiatry. 2013 Jan; 55(Suppl 2): S273–S276. PMID: 23858267
  3. Mayank Thakur, Shilpi Bhargava, V. K. Dixit. Immunomodulatory Activity of Chlorophytum borivilianum Sant. F. Evid Based Complement Alternat Med. 2007 Dec; 4(4): 419–423. PMID: 18227908
  4. Kenjale RD, Shah RK, Sathaye SS. Anti-stress and anti-oxidant effects of roots of Chlorophytum borivilianum (Santa Pau & Fernandes).. Indian J Exp Biol. 2007 Nov;45(11):974-9. PMID: 18072542
  5. Kenjale R, Shah R, Sathaye S. Effects of Chlorophytum borivilianum on sexual behaviour and sperm count in male rats.. Phytother Res. 2008 Jun;22(6):796-801. PMID: 18412148
  6. P Gayathri, S Saroja. PA03.14. Antidiabetic and antioxidant potential of Chlorophytum borivillianum (Safed musli) in type 2 diabetics. Anc Sci Life. 2013 Jan; 32(Suppl 2): S83.
  7. Goswami SK. Screening for Rho-kinase 2 inhibitory potential of Indian medicinal plants used in management of erectile dysfunction.. J Ethnopharmacol. 2012 Dec 18;144(3):483-9. PMID: 23043981
Read on app