अलोपेशिया - Alopecia in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

November 26, 2018

September 09, 2020

अलोपेशिया
अलोपेशिया

अलोपेशिया काय आहे?

प्रत्येक व्यक्तीचे -दोन्ही स्त्री आणि पुरुष- यांचे दररोज काही प्रमाणात जवळपास शंभर केस गळतात. काही केसगळती गंभीरपण असू शकते.अलोपेशियाच्या परिस्थिती मध्ये सामान्य प्रमाणापेक्षा ही अधिक केसगळती होते. अलोपेशिया मध्ये तुम्ही खालील गोष्टींचे निरीक्षण केले पाहिजे:

  • अलोपेशिया ॲरियाटा मध्ये टाळूवरील केस शक्यता गोलाकार पॅच मध्ये गळून जातात.
  • अलोपेशिया टोटॅलिस मध्ये टाळूवरील संपूर्ण केस गळतात.
  • अलोपेशिया युनिव्हरसलिस मध्ये सर्व अंगावरचे केस गळतात.

ळणार्‍या केसांची परत वाढण्याची वृत्ती असते पण ते परत गळतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अलोपेशियाच्या वेगवेगळ्या प्रकारात त्याची वेगवेगळी लक्षणे दिसतात जसे की :

  • अलोपेशिया ॲरियाटा मध्ये टाळूवरील केस गोलाकार किंवा नाण्याच्या आकारात केस गळतात. सकाळी उठल्यावर तुमच्या उशीवर तुम्हाला खूप गळलेले केस दिसतील. पॅचेसचा आकार जरी निरनिराळा असला तरी काही ठिकाणी केस विरळ होताना दिसतील. टाळू वरुन केस गळणे हे खूप सामान्य आहे पण अलोपेशिया मध्ये पापण्या, भुवया किंवा दाढीतले पण केस गळताना अढळून येतात. अजून एक दुर्मिळ वैशिष्ट्ये असे आहे की टाळूच्या मागील भागातले केस पण गळतात.
  • अलोपेशिया टोटॅलिस मध्ये टाळू वरील संपूर्ण केस गळून टक्कल पडल्याचे अढळून येते.
  • अलोपेशिया युनिव्हरसलिस मध्ये तर संपूर्ण शरीरावरील केस गळल्याचे अढळून येते.
  • काही वेळेस अलोपेशियामुळे नखांवर देखील परिणाम होऊ शकतो जसे की ते अस्पष्ट, ठिसूळ, खरबरीत किंवा त्यात फटी आढळू शकतात. नखातील समस्या ही अलोपेशियाचे पहिले चिन्हे असू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अलोपेशिया हा अनुवांशिक असून तो स्वयंप्रतिरोधक रोग म्हणून वर्गीकृत करण्यात येतो. याचा अर्थ असा की शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली केसावर आक्रमण करायला सुरुवात करते. परिणामी मोठ्या प्रमाणात केस गळती होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

अलोपेशियाचे निदान त्वचारोगतज्ञाकडे केले जाते. निदान करण्यासाठी निरनिराळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात जसे की:

  • स्वयंप्रतिरोधक आजार आहेत का हे तपासण्यासाठी रक्ताची तपासणी करण्यात येऊ शकते.
  • काही केस मुळापासून काढून घेऊन त्याची तपासणी करण्यात येऊ शकते.
  • अलोपेशियाचे निदान करण्यासाठी त्वचेची बायोप्सी करण्यात येऊ शकते.

अलोपेशियासाठी नक्की निदान नाही आहे. केस वाढीसाठी सहसा केस स्वतःचा आपला वेळ घेतात. काहीवेळेस केस लवकर वाढतात. केसाच्या लवकर वाढीसाठी त्वचारोगतज्ञ यापैकी काही उपाय सांगू शकतात:

  •  रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्स दिले जाते. ते क्रिम किंवा लोशनच्या रुपात त्या जागेवर लावायला दिला जाऊ शकते किंवा त्या जागेवर इंजेक्शनच्या रुपात दिले जाते. गोळ्यासुद्धा उपलब्ध आहेत पण त्याच्या दुष्परिणामामुळे त्या देण्याचे टाळले जाते.
  • ॲन्थरालिन हे एक औषध आहे जे प्रतिकार शक्ती साठी वापरले जाते. ते गुणकारी औषध असून ते संक्रमित क्षेत्रात लावून तासभर ठेवून मग धुवून टाकावे लागते.
  • मिनोक्सिडील चे मुख्य कार्य केस वाढीचे असल्यामुळे ते टाळूवर, दाढीवर किंवा भुवयांवर लावता येते. ते पुरुष, महिला व मुलांसाठी सुरक्षित असून दिवसातून दोनदा लावता येते.
  • डायफेनसायप्रोन हे ओषध टक्कल पडलेल्या भागांवर लावायला वापरले जाते. ते लावल्यावर काही प्रक्रीया होऊन प्रतिकारशक्ती पांढर्‍यापेशींना त्या जागेवर क्रियशील व्हायला पाठवते. या प्रक्रियेमध्ये केसाची मुळे कार्यशील केली जातात ज्यामुळे ते केस गळती टाळू शकतात.



संदर्भ

  1. National Institutes of Health; National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Alopecia Areata.
  2. National Institutes of Health; National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Alopecia Areata.
  3. National Institutes of Health; National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Alopecia Areata.
  4. C. Herbert Pratt et al. [internet]. Nat Rev Dis Primers. Author manuscript; available in PMC 2017 Aug 28. PMID: 28300084
  5. National Institute of Health and Family Welfare. Alopecia (hair loss). Government of India. [internet]
  6. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; ALOPECIA AREATA: DIAGNOSIS AND TREATMENT
  7. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; ALOPECIA AREATA: SIGNS AND SYMPTOMS
  8. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; ALOPECIA AREATA: OVERVIEW

अलोपेशिया चे डॉक्टर

Dr. Rohan Das Dr. Rohan Das Trichology
3 Years of Experience
Dr. Nadim Dr. Nadim Trichology
7 Years of Experience
Dr. Sanjeev Yadav Dr. Sanjeev Yadav Trichology
7 Years of Experience
Dr. Swadesh Soni Dr. Swadesh Soni Trichology
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

Find Trichologist in cities

  1. Trichologist in Jaipur

अलोपेशिया साठी औषधे

Medicines listed below are available for अलोपेशिया. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.