myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

अल्टीट्युड सिकनेस काय आहे?

अल्टीट्युड सिकनेस किंवा उंचीची भीती/माउंटन सिकनेस हा आजार अधिक उंचीवर किंवा झटपट उंचीवर चढल्याने होतो. उंचीवर गेल्यावर हवेचा दाब कमी झाल्यामुळे शरीराला त्या वातावरणात स्थिर व्हायला वेळ लागतो. उंची 8000 फूटांच्या वर असल्यावर अल्टीट्युड सिकनेसची बाधा होण्याची शक्यता आहे.

अल्टिट्युड सिकनेसचे खालील प्रकार आहेत:

 • अक्यूट कालावधीसाठी माउंटन सिकनेस सामान्यता दिसून येते.
 • अधिक उंचीवर गेल्यावर होणारा फुफ्फुसांचा एडीमा, जो प्राणघातक ठरु शकतो.
 • तिन्ही प्रकारांपैकी अल्टीड्यूड सेरेब्रल एडीमा सर्वात घातक ठरु शकतो.

अल्टीट्युड सिकनेस ची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अल्टीड्यूड सिकनेस च्या प्रकारानुसार त्याची लक्षणे बदलतात.काहींना जनरल लक्षणे आढळून येतात तर ज्यांना फुफ्फुसांचा एडिमा असतो त्यांच्या फुफ्फुसांमध्ये द्रव साठण्याचे लक्षण आढळतात. ज्यांना सेरेब्रल ओडिमा असतो, त्यांच्या मेंदूत पाणी साठण्याचे लक्षण आढळून येतात.

काही साधारण लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

 •   डोकेदुखी आणि चक्कर येणे.
 •   मळमळ आणि / किंवा उलट्या.
 •   थकवा, श्वासोच्छवासासाठी त्रास होणे आणि भूक न लागणे.
 •    निद्रानाश.
 •    नखं आणि ओठ निळे पडणे.
 •    फिकट त्वचा.

सर्वसाधारण लक्षणे उंचीवर पोहचल्यावर दिसून येतात आणि शरीर वातावरणात स्थिर झाले की ओसरतात. तीव्र प्रकरणांमध्ये  खालील अनुभव येऊ शकतात:

 • भयंकर डोकेदुखी.
 • छातीत जळजळ.
 • चालताना समस्या.
 • भान हरपणे.
 • गुलाबी थुंकी असलेला भयंकर कफ.
 • कोमा.

अल्टीट्युड सिकनेस चे मुख्य कारणं काय आहेत?

अल्टीड्यूड सिकनेस चे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हवामानातील बदल जे व्यक्तीच्या शरीराला अनुकूल नसते. याशिवाय इतर घटक पुढीलप्रमाणे असू शकतात:

 •   खूप वेगाने चढणू.
 •   अल्टीड्यूड सिकनेस चा इतिहास.
 •   नवीन हवामानाशी जुळवून घेणे शक्य नसते.
 •   दारू किंवा औषधे वापरणे.
 •   हृदय, फुफ्फुस किंवा इतर प्रणालीगत विकारांचा इतिहास.

अल्टीट्युड सिकनेस चे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि प्राथमिक मदत असल्याने निदान करणे कठीण आहे. तरीही यापैकी एखादे किंवा जास्त लक्षणे अनुभवल्यास त्याची तीव्रता आणि वेळेनुसार ते जर ओसरले नाही तर अल्टिट्युड सिकनेस असल्याचे लक्षात येते. म्हणून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एक वैद्यकीय व्यवसायिक फुफ्फुसांमध्ये पाणी साठले आहे की नाही ते तपासतो.

निदानासाठी पुढील वैद्यकीय तपासण्यांमध्ये खालीपैकी काही चाचण्या कराव्यख लागू शकतात:

 •  ईसीजी.
 •  छातीचा एक्स-रे.
 •  रक्त तपासणी.

अल्टीट्युड सिकनेस ची तीव्रता अनुभवताना उपचार करणे जरा कठीण आहे.तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये काळजी घेणे अगदी आवश्यक आहे. काळजी करतांना खालील गोष्टींची काळजी केली जाऊ शकते:

 •  कृत्रिम ऑक्सिजनचा वापर करणे किंवा कमी उंचीवर उतरणे.   .
 •  उच्च रक्तदाब चे औषध.
 •  श्वासोच्छ्वास सुरळीत करण्यासाठी आणि कन्जेशनचा उपचार करण्यासाठी इनहेलर्स.
 •  फुफ्फुसात सुधारित रक्त प्रवाह करण्यासाठी औषध.
 •   माउंटन सिकनेससाठी औषधे, जी सामान्यत: सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिली जातात.
 1. अल्टिट्युड सिकनेस साठी औषधे

अल्टिट्युड सिकनेस साठी औषधे

अल्टिट्युड सिकनेस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
AcetamideAcetamide 250 Mg Tablet27.0
Ac Mox (Optica)Ac Mox Tablet42.0
ActamidActamid 250 mg Tablet32.0
AlboxAlbox 400 Mg Tablet10.0
AvvaAvva 250 Mg Tablet28.0
CapCap Sr Capsule43.0
DiamoxDIAMOX TABLET 10S43.0
GlumoxGlumox 250 Mg Tablet30.0
IoparIopar 250 Mg Capsule Sr44.0
P (Sunways)P 20 Mg Tablet31.0
AcemaxAcemax 250 Mg Tablet28.0
Bell ZolamideBell Zolamide 250 Mg Tablet35.0
At ZolAt Zol Tablet64.0
OptOpt Tablet5.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Hackett P, Roach RC. Altitude Sickness. High altitude cerebral oedema. hamb 2004; 5(2):136-146
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Acute mountain sickness
 3. Wiedman M, Tabin GC. High-altitude retinopathy and altitude illness.. Ophthalmology. 1999 Oct;106(10):1924-6; discussion 1927. PMID: 10519586
 4. The Institute for Altitude Medicine. Institute For Altitude Medicine. [internet]
 5. Union Internationale des Associations d’Alpinisme. A BRIEF GUIDE TO ALTITUDE SICKNESS. International Climbing and Mountaineering Federation. [internet]
और पढ़ें ...