विसरभोळेपणा (ॲम्नेशिया) - Amnesia in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 21, 2018

March 06, 2020

विसरभोळेपणा
विसरभोळेपणा

विसरभोळेपणा (ॲम्नेशिया) काय काय आहे?

आपल्या सर्वांनाच गोष्टींचा विसरून पडतो, आपण गोंधळतो किंवा काही वेळा चुकीच्या गोष्टी लक्षात राहतात. हे सर्व खूप कॉमन आहे. हे कदाचित खूप माहिती लक्षात ठेवण्याच्या प्रयत्नात, तणाव, व्यत्यय किंवा इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते. जेव्हा वैद्यकीय स्थितीमुळे हे होते तेव्हा तथ्ये, अनुभव आणि माहिती यासारख्या गोष्टींचा विसर पडतो आणि याला ॲम्नेशिया म्हणून ओळखले जाते.

ॲम्नेशियाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ॲम्नेशियानी पीडित लोक स्वत: बद्दल आणि त्यांच्या सभोवतालबद्दल जागरूक असतात, पण नवीन माहिती लक्षात ठेऊ शकत नाही. मुख्य प्रकारचे अम्नेशियामध्ये ही लक्षणांचा पाहिली जाऊ शकतात:

 • अँटेरोग्रेड ॲम्नेशिया
  या प्रकारच्या अम्नेशियामध्ये, नवीन माहिती प्रोसेस करण्यात आणि ती परत आठवण्यात अडचण येते.
 • रेट्रोग्रेड ॲम्नेशिया
  भूतकाळातील अनुभव आणि माहिती आठवणे कठिण होते.

आणखी काही लक्षणे अशी आहेत:

 • दिशाभूल होणे.
 • चुकीच्या आठवणी, म्हणजे, आठवणी खोट्या असतात पण त्या खरे असल्यासारख्या वाटतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

स्मृती हे मेंदूचे कार्य आहे. मेंदूचा कोणताही भाग, विशेषत: थॅलामस, हिप्पोकॅम्पस किंवा इतर संबंधित भाग, जे आठवणी आणि भावनांसाठी जबाबदार असतात, त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे अम्नेशिया होतो. याची काही कारणे याप्रकारे आहेत:

ॲम्नेशियाचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ॲम्नेशियाच्या निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे. असे करुन इतर विकार जसे डिमेंशिया किंवा अल्झायमर वगळले जाऊ शकतात. तपसणीच्या पद्धतीत खालील समाविष्ट आहेत:

 • स्मृती भ्रंश, त्याचा प्रसाय, ट्रिगर्स, कौटुंबिक इतिहास, अमली पदार्थाचा गैरवापर, अपघात आणि वैद्यकीय  समस्या, कर्करोग किंवा नैराश्याचे स्वरूप तपासण्यासाठी विस्तृत वैद्यकीय इतिहास तपासला जातो. व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम झाल्याने, कन्सल्टेशन दरम्यान जवळचे कौटुंबिक सदस्य किंवा मित्रांना सामील व्हावे लागू शकते.
 • प्रतिक्रिया, संतुलन, संवेदनात्मक प्रक्रिया , तंत्रिकेचे आणि मेंदूचे कार्य तपासायला शारीरिक तपासणी.
 • दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मृती भ्रंशा साठी चाचणी, निर्णय, विचार आणि सामान्य माहितीच्या प्रक्रियेसाठी चाचणी.
 • संसर्ग, दौरे आणि मेंदूच्या नुकसानाची चाचणी.

जवळजवळ सर्व बाबतीत,ॲम्नेशिया अपरिवर्तनीय आहे किंवा केवळ अंशतः परिवर्तनीय असतो. संपूर्ण उपचार शक्य नाही म्हणून स्थितीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वारंवार नियुक्त उपचार पद्धती खाली दिल्या आहेत:

 • ऑक्युपेश्नल थेरपी जी व्यक्तीस नवीन माहिती हाताळण्यात मदत करण्यासाठी धोरणे विकसित करते आणि विद्यमान माहिती आणि अनुभव राखण्यासाठी आठवणींचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते.
 • ॲम्नेशियाने ग्रस्त झालेल्या लोकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिकवणे ज्यामुळे त्यांना त्यांची दिनचर्या अधिक व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते. यात फोन, गॅझेट्स आणि ऑर्गनायझर्सचा वापर समाविष्ट आहे.
 • पोषणविषयक गरजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि इतर सर्व काही गरजांसाठी औषध वापरून आपण आणखी त्रास टाळू शकतो.संदर्भ

 1. American Occupational Therapy Association. Dementia and the Role of Occupational Therapy. [internet]
 2. D Owen et al. Postgrad Med J. 2007 Apr; 83(978): 236–239. PMID: 17403949
 3. Department of Health & Human Services, Amnesia. State Government of Victoria, Australia. [internet]
 4. Richard J. Allen. Classic and recent advances in understanding amnesia. Version 1. F1000Res. 2018; 7: 331. PMID: 29623196
 5. Health On The Ne. Amnesia. [internet]

विसरभोळेपणा (ॲम्नेशिया) चे डॉक्टर

Dr. Hemanth Kumar Dr. Hemanth Kumar Neurology
3 वर्षों का अनुभव
Dr. Deepak Chandra Prakash Dr. Deepak Chandra Prakash Neurology
10 वर्षों का अनुभव
Dr Madan Mohan Gupta Dr Madan Mohan Gupta Neurology
7 वर्षों का अनुभव
Dr. Virender K Sheorain Dr. Virender K Sheorain Neurology
19 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

विसरभोळेपणा (ॲम्नेशिया) साठी औषधे

विसरभोळेपणा (ॲम्नेशिया) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।