myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

एएलएस (ॲ​मीट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस) काय आहे?

एएलएस, याला लाऊ गेहरिग रोग म्हणतात, हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. आणि कालांतराने हा गंभीर स्वरूप धारण करतो व रोग्याला अधिक दुर्बल करत जातो. हा रोग अशक्तपणाचे कारण बनतो, कारण यात मज्जातंतूच्या पेशी नष्ट होतात. रोगाची प्रारंभिक लक्षणे किरकोळ असली तरी पुढे जाऊन यामुळे अस्थिरता आणि श्वास घेण्यास असमर्थता असे त्रास होतात. आणि अखेरीस मृत्यू होतो.

एएलएसची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरुवातीला एएलएस ची लक्षणे फारच किरकोळ वाटू शकतात पण रोग कालांतराने वाढत जातो . समस्या हात किंवा पाय पासून सुरू होते आणि हळूहळू इतर शरीराचे भाग सुद्धा प्रभावित होतात. त्यामुळे चावायची, गिळायची, श्वास घेण्याची आणि बोलण्याची क्षमता कमी होते.याची सामान्य लक्षणे अशी आहेत:

एएलएसचे मुख्य कारणं काय आहेत?

नेमक्या कारणांबद्दल थोडीच  माहिती उपलब्ध आहे. 10 टक्के प्रकरणांत हे आनुवंशिक असते पण  उर्वरित प्रकरणांमागील कारणं अस्पष्ट आहेत. काही संभाव्य कारणांमध्ये अशी आहेत:

 • संशोधित किंवा उत्परिवर्तित जीनची संरचना.
 • ग्लूटामेटच्या पातळीमध्ये असंतुलन (एक असे रसायन जे मज्जातंतूंपासून स्नायूंपर्यंत संदेश पाठवते), ज्यामुळे पेशी विषारी बनतात.
 • मज्जातंतूच्या पेशींमध्ये ऑटोइम्यून क्रिया.
 • मज्जातंतूच्या पेशींमध्ये प्रोटिनच्या स्वरूपात प्रोटिन किंवा असामान्यता जमा होणे ज्यामुळे त्यांचा नाश होतो.
 • विषारी युद्धाच्या उत्पादनाच्या संपर्कात आल्यामुळे.
 • थकवणार्या शारीरिक ॲक्टिव्हिटी.

एएलएसचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

एएलएस, त्याच्या प्रारंभिक अवस्थेत, इतर न्यूरोलॉजिकल विकारांसारखाच वाटतो. इतर  शक्यता वगळण्यासाठी निदान करणे आवश्यक आहे. यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

 • इतर न्यूरोम्यस्क्यूलर स्थितींसाठी स्नायूंच्या ॲक्टिव्हिटीजची तपासणी करण्यासाठी ईएमजी किंवा इलेक्ट्रोमायोग्राम
 • मज्जातंतूच्या संसर्गाचीची चाचणी केली जाते ज्यामुळे नर्व्हचे नुकसान किंवा स्नायूजन्य रोगांचे निदान होते.
 • पाठीचा कणा किंवा हर्ननिएटेड डिस्कमधील ट्युमर तपासण्यासाठी एमआरआय.
 • बाकीच्या शक्यतांसाठी लघवी आणि रक्ताची तपासणी .
 • चाचणीसाठी सेरेब्रोस्पाइनल द्रवपदार्थ प्राप्त करण्यासाठी लंबर पंचर.
 • तपशीलवार विश्लेषणासाठी स्नायूची बायोप्सी.

एएलएस बरे होण्याचा कोणताही उपचार उपलब्ध नाही आहे. पण, व्यक्तीला अधिक आरामदायक वाटावे आणि रोगाच्या प्रसार कमी करण्यासाठी उपचार पद्धती आहेत. यात खालील समाविष्ट आहेत:

 • औषधोपचार 
  दोन मुख्य औषधे जी सामान्यतः सुचविल्या जातात:​
  • दैनिक कार्यक्रमांमधील अडथळा टाळण्यासाठी एड्राव्होन. याचे दुष्परिणाम ॲलर्जीक प्रतिक्रिया, श्वास न घेता येणे, किंवा सूज येणे.
  • रिलुझोल, जी ग्लूटामेट पातळी कमी करते आणि रोगचा प्रसार अडवते दिल्या जाते. साइड इफेक्ट्समध्ये यकृत फंक्शनची समस्या, पचनाच्या समस्या आणि चक्कर येणे, यांचा समावेश होतो.
  • क्रॅम्प्स, थकवा, निराशा, अनिद्रा, वेदना, बधकोष्टता आणि लस यासारख्या लक्षणांकरिता औषधोपचाराचा सल्ला दिला जाऊ शकतो.
 • सहायक उपचार
  हे व्यक्तीची स्थिती संतुलित करण्यासाठी आणि कार्यप्रणाली सुकर आणि नियंत्रित करण्यासाठी केले जातात. यात खालील गोष्टी समाविष्ट आहे:
  • खाणे, कपडे घालणे आणि अंगात शक्ती नसतानाही चालणे हे दैनंदिन कार्य करता यावेत यासाठी ऑक्युपेश्नल थेरपी .
  • श्वास घ्यायला मदत करण्यासाठी श्वासोच्छवासाची साधने, विशेषतः रात्री आणि झोपण्याच्या वेळी जेव्हा रोगाचा प्रभाव जास्त असतो.  श्वासोच्छवासाच्या मदतीसाठी शेवटी यांत्रीक मदतीची गरज भासू शकते.
  • वेदनेतून आराम, ,हालचाल आणि समायोजन यासाठी शारीरिक उपचार. हे व्यक्तिला व्हीलचेअर वापरवी लागत असेल तरी शरीराला अधिक मजबूत ठेवण्यास मदत करतात.
  • स्पष्ट व प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करण्यासाठी स्पीच थेरेपी.
  • सामाजिक आणि भावनिक आधार  कारण या रोगाशी व्यक्तीला एकट्याने झटणे अशक्य आहे.
 1. एएलएस (ॲमिओट्रोफिक लॅटरल स्लिरोसिस) साठी औषधे

एएलएस (ॲमिओट्रोफिक लॅटरल स्लिरोसिस) साठी औषधे

एएलएस (ॲमिओट्रोफिक लॅटरल स्लिरोसिस) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
AlbumedAlbumed Infusion2200.0
AminofusionAminofusion Infusion138.63
AminosterilAminosteril Infusion689.0
Aminoven InfantAminoven Infant Infusion460.0
AminowelAminowel Infusion359.52
KanzominKanzomin Infusion836.5
AravonAravon 1.5 Mg Injection510.0
CarevonCarevon 1.5 Mg Injection435.0
EdakemEdakem 1.5 Mg Injection473.0
EdarabidEdarabid 1.5 Mg Injection446.0
EdastarEdastar 1.5 Mg Injection520.0
EdavitEdavit 1.5 Mg Injection421.0
EdinovaEdinova 1.5 Mg Injection420.0
EdvoEdvo 1.5 Mg Injection418.0
EzycutEzycut 1.5 Mg Injection418.0
FrasedaFraseda 1.5 Mg Injection385.0
EdasureEdasure 1.5 Mg Injection374.0
Kabiven CentralKabiven Central Infusion3400.0
KabivenKabiven Peripheral Infusion3150.0
Kabiven PeripheralKabiven Peripheral Injection2995.0
HerminHermin Infusion464.15

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...