myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

अंथरूण ओले करणे म्हणजे काय?

अंथरूण ओले करणे, ज्याला रात्रीच्या वेळेस असंतुलन किंवा नॉक्टर्नल एन्यूरेसिस असेही म्हणते जाते म्हणजे झोपेत लघवी असंतुलितपणे होणे आहे. वयाच्या 5 - 7 वर्षानंतर साधारणतः हे होत नाही.जगभरातील शालेय वयीन मुलांमध्ये हे सामान्य आहे. जरी लहान मुले व किशोरवयीन मुलांमध्ये हे आढळले जाते, तरी भारतात याची पुरेशी नोंद झालेली नाही. याचेजगभरातील प्रमाण 1.4% - 28% आहे. तर भारतात याचे प्रमाण 7.61% - 16.3% आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लहान मुले सहसा वयाच्या 5 वर्षापर्यंत टॉयलेटचा वापर शिकतात, पण मूत्राशयावर नियंत्रण मिळवण्याचे वय निश्चित नसते. काही मुलांना 5 ते 7 वर्षांच्या दरम्यान मूत्र नियंत्रणाच्या समस्या येऊ शकतात. खालील चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा:

 • 7 वर्षानंतर अंथरूण ओले करणे.
 • काही महिने अंथरूण ओले करणे बंद झाल्यावर परत अंथरूण ओले करणे.
 • लघवी करताना त्रास होणे, गुलाबी किंवा लाल लघवी होणे, खूप तहान लागणे, त्रासदायक मल किंवा घोरणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कारणे अस्पष्ट आहेत परंतु खालील संभाव्य कारणे असू शकतात:

 • लहान मूत्राशय: मूत्राशय कदाचित पूर्णपणे विकसित झाले नसेल.
 • मूत्राशय भरले आहे याची जाणीव न होणे: जर मूत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा हळूहळू विकसित होत असतील तर मूत्राशय भरले हे समजून मुल जागे होत नाही.
 • हार्मोनल असंतुलनः काही व्यक्तींमध्ये अँटिडाययुरेटिक हार्मोन (एडीएच) चे प्रमाण कमी असल्याने रात्री लघवी हळू तयार होते.
 • युरिनरी ट्रॅक इन्फेकशन: मुलांना संसर्ग झाल्यामुळे युरीन नियंत्रण करण्यात अडचण येणे. (अधिक वाचाः यूटीआय उपचार)
 • स्लिप ॲपनिया: टॉन्सिल्स किंवा ॲडिनॉइड्स सुजलेले किंवा लालसर असतील तर श्वास घ्यायला त्रास होणे.
 • मधुमेह: जर मुल आधी अंथरून ओले करत नव्हते तर हे मधुमेहा चे पहिले लक्षण असू शकते.
 • तीव्र बद्‍धकोष्ठ: दीर्घकाळ बद्‍धकोष्ठ असल्यास मूत्रपिंडांची कार्यप्रणाली खराब होऊ शकते ज्यामुळे लघवी आणि शौच दोन्ही चे नियंत्रण प्रभावीत होते.
 • तणाव: भीतीयुक्त तणावा मुळे सुद्धा अंथरून ओले होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

तुम्हाला मुलाच्या लघवीच्या नित्यक्रमाची नोंद करून ठेवण्यास सांगितले जाऊ शकते.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टीः

 • लघवीची वारंवारता.
 • शौचाची वारंवारता आणि स्थिरता.
 • झोपायच्या वेळेस घेतलेले द्रव्य.

या चाचण्या कराव्या लागू शकतात:

 • युरीन कल्चर आणि विश्लेषण: संसर्ग, मधुमेह, रक्त किंवा इतर कोणत्याही पदार्थांची तपासणी करायला.
 • रक्त तपासणी: ॲनिमिया, मधुमेह, मूत्रपिंडाच्या समस्या आणि इतर विकार तपासण्यासाठी.
 • मूत्राशयाचे अल्ट्रासाऊंड: लघवीनंतर मूत्राशयात किती युरीन शिल्लक आहे हे पाहण्यासाठी.
 • युरोडायनॅमिक टेस्ट: लघवी कशी साठवली जाते आणि तिचा प्रवाह कसा होतो ते तपासण्यासाठी.
 • सिस्टोस्कोपी: मूत्राशयात कॅमेरा घालून मूत्राशयाची स्थिती तपासण्यासाठी.

अंथरुण ओले करणे ही गंभीर समस्या नाही कारण मुलाच्या विकासाचा तो एक टप्पा आहे, पण मुलांना लज्जास्पद वाटून त्यांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी पालकांना असहाय्य वाटू शकते.

ताब्यात ठेवण्यासाठी:

 • पालक व मुलांना अंथरुण ओले करण्याबाबत माहिती देऊन आश्वासन देणे की हे बरे होऊ शकते.
 • डॉक्टर एडीएचशी सारखी औषधे लिहून देऊ शकतात जे एडीएच सारखाच परिणाम देतात शिवाय ते अँटीडिप्रेसंट देऊ शकतात जे मूत्राशयाला आराम देतात.

बिना औषाध्याच्या पद्धती: तुम्ही या वस्तू विकत घेऊ शकता:

 • डिस्पोजेबल किंवा पुन्हा वापरण्यायोग्य शोषक अंडरपँट्स.
 • अंथरुण ओले झाल्यावर वाजणारा अलार्म.

स्वत: ची काळजी घेण्यासाठी टिप्सः

 • दिवसा आपल्या मुलाला जास्त द्रव्य द्या आणि संध्याकाळी त्याची मात्रा कमी करा.
 • आपल्या मुलाला झोपायचा आधी लघवी करण्याची सवय लावा.
 • आपल्या मुलाला प्रत्येक वेळी प्रोत्साहित करा जेणेकरून त्याला/तिला आरामदायक वाटेल आणि आत्मविश्वास वाढेल.
 • जरी आपल्या मुलाने अंथरुण ओले केले तरी त्याला रागावू नका कारण असे केल्याने उद्दिष्ट गमावले जाते.
 • आपल्या मुलाला चादर साफ करण्यास मदत करण्यासाठी प्रोत्साहित करा, जेणेकरुन त्याला / तिला आरामदायक वाटेल.
 1. अंथरूण ओले करणे साठी औषधे
 2. अंथरूण ओले करणे चे डॉक्टर
Dr. Rajesh Gangrade

Dr. Rajesh Gangrade

Pediatrics
20 वर्षों का अनुभव

Dr. Yeeshu Singh Sudan

Dr. Yeeshu Singh Sudan

Pediatrics
14 वर्षों का अनुभव

Dr. Veena Raghunathan

Dr. Veena Raghunathan

Pediatrics
16 वर्षों का अनुभव

Dr. Sunit Chandra Singhi

Dr. Sunit Chandra Singhi

Pediatrics
49 वर्षों का अनुभव

अंथरूण ओले करणे साठी औषधे

अंथरूण ओले करणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
D Void खरीदें
Sycodep खरीदें
ADEL 28 Plevent Drop खरीदें
Minirin खरीदें
Toframine खरीदें
ADEL 29 Akutur Drop खरीदें
SBL Eschscholtzia californica Dilution खरीदें
Trikodep खरीदें
Trikodep Forte खरीदें
Tudep खरीदें
Anexidep खरीदें
Depik Forte खरीदें
Depik Plus खरीदें
ADEL 36 Pollon Drop खरीदें
Depsol Forte खरीदें
Depsol Plus खरीदें
Depsonil DZ खरीदें
Diamin Plus खरीदें
Eldep M खरीदें
SBL Dibonil Drops खरीदें
Elidep Forte खरीदें
Iminza ID खरीदें
Bjain Thyroidinum LM खरीदें
Kidep Dz खरीदें

References

 1. Reddy NM, Malve H, Nerli R, Venkatesh P, Agarwal I, Rege V. Nocturnal Enuresis in India: Are We Diagnosing and Managing Correctly?. 2017 Nov-Dec;27(6):417-426. PMID: 29217876
 2. Urology Care Foundation [Internet]. USA: American urological association; What Is Nocturnal Enuresis (Bedwetting)?
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bedwetting
 4. National sleep foundation. Bedwetting and Sleep. Washington, D.C., United States
 5. KidsHealth. Bedwetting. The Nemours Foundation. [internet].
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें