ब्लॅडर कॅन्सर - Bladder Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 28, 2018

March 06, 2020

ब्लॅडर कॅन्सर
ब्लॅडर कॅन्सर

ब्लॅडर कॅन्सर काय आहे?

ब्लॅडर कॅन्सर हा 50 ते 70 वर्षांच्या प्रौढांमध्ये आढळणारा सामान्य प्रकारचा कॅन्सर आहे. भारतात सामान्यतः निदान होणाऱ्या कॅन्सरमध्ये हा कॅन्सर सहाव्या क्रमांकावर आहे. ब्लॅडर कॅन्सर म्हणजे ब्लॅडर लाइनिंगच्या पेशींमध्ये होणारी असामान्य वाढ. तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरच्या केसेसपैकी अंदाजे 15% ब्लॅडर कॅन्सरच्या असतात. ब्लॅडर मधून ट्युमर काढल्यास (ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ ब्लॅडर कॅन्सर किंवा टीयुअरबीटी) जास्तीत जास्त ब्लॅडर कॅन्सरच्या रुग्णांच्या स्थितीत सुधारणा होते. तरीसुध्या 50% हून अधिक रुग्णांना कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता असते; आणि 20% रुग्णाच्या बाबतीत कॅन्सर ब्लॅडरच्या आसपासच्या पेशींमध्ये (मसल-इनवेसिव्ह ब्लॅडर कॅन्सर) पसरतो. कॅन्सरच्या ग्रेडनुसार टीयुआरबीटी, किमोथेरेपी आणि रेडिएशन थेरेपी हे सामान्यपणे करण्यात येणारे उपचार आहेत.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

खालील चिन्हे आणि लक्षणे आढळल्यास ब्लॅडर कॅन्सर असण्याची शक्यता आहे:

 • हेमटेरिया किंवा लघवीमध्ये रक्त जाणे, सहसा वेदनारहित. लघवीचा रंग गर्द किंवा भडक लाल असणे.
 • वारंवार लघवी होणे. अधिक वाचा: वारंवार मूत्रविसर्जनाचे उपचार
 • लघवी करण्याची अचानक इच्छा होणे.
 • लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.
 • पाठदुखी, हाड दुखणे, युरिनरी ब्लॅडरभोवती जेव्हा कॅन्सर पसरतो तेव्हा पायाला एडेमा किंवा सूज येते.
 • कॅन्सरच्या पुढच्या स्टेजमध्ये वजन कमी होते.

हेमटेरिया(लघवीमध्ये रक्तस्त्राव) होण्याची इतर कारणं:

याची मुख्य कारणं काय आहेत?

ब्लॅडर कॅन्सर होण्याचे मुख्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

 • तंबाखूचे सेवन.
 • पेन्ट्स,कपडे,रबर,प्लास्टिक्स इत्यादीसाठी वापरले जाणारे रसायनं जसे की अ‍ॅनालाइन रंग आणि बेंझिडाइनच्या संपर्कात खूप जास्त वेळ असणे.
 • आतड्यांच्या कॅन्सरसाठी केली जाणारी रेडिओथरेपी.
 • केमोथेरेपीमध्ये वापरण्यात केमोथेरेपीमध्ये वापरण्यात येणारी औषधं.
 • इतर कारणांमध्ये ब्लॅडरचा संसर्ग (स्किस्टोसोमायसिस), मधुमेह, दीर्घकालीन कॅथीटेरिएशन आणि वयाच्या 45 वर्षांपूर्वी मेनोपॉज येणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तपशीलवार वैद्यकीय पूर्वइतिहास आणि शारीरिक तपासण्याव्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सरचे निदान खालील तपासण्यांचा आधारे केले जाते:

 • सिस्टोस्कोपीने ब्लॅडर मधील ट्युमर बघता येतो.
 • सिस्टोस्कोपीच्या दरम्यान काढलेल्या ट्युमर असलेल्या पेशींचा मायक्रोस्कोपद्वारा कॅन्सरची स्थिती आणि ग्रेड जाणून घेता येतो.
 • कंप्युटेड टोमोग्राफी स्कॅन आणि मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंगद्वारे ट्युमरची सविस्तर इमेज दिसते.
 • इंट्राव्हेनस यूरोग्राम ब्लॅडरचा एक्स-रे घेतो तर डाय मूत्रमार्गात सोडून ट्यूमरचा शोध घेतला जातो.
 • लघवीच्या नमुन्याची मायक्रोस्कोप खाली चाचणी करून त्यामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत का ते शोधले जाते.
 • ट्युमर मार्कर चाचणी(ब्लॅडर ट्युमर ॲन्टीजेन) कॅन्सर पेशीद्वारे प्रथिनं किंवा ॲन्टीजेन्सचा स्त्राव सोडला जात आहे का याचा शोध घेतला जातो.

जर ब्लॅडर कॅन्सर, युरिनरी ब्लॅडरच्या इनरमोस्ट लाइनिंगपर्यंत जर मर्यादित असेल तर त्याला नॉन-मसल-इनव्हेसिव्ह ब्लॅडर कॅन्सर म्हटले जाते. जो कॅन्सर ब्लॅडरच्या खोल स्तरांपर्यत (मसल स्तरा, फॅट/चर्बी आणि कनेक्टिव्ह पेशी मार्गे) आणि आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पसरतो त्याला मसल-इनव्हेसिव्ह ब्लॅडर कॅन्सर म्हटले जाते. कॅन्सरच्या पसरण्याचे विश्लेषण करण्याण ग्रेडींगची मदत होते. हाय-ग्रेड कॅन्सर पसरण्याची शक्यता लो-ग्रेड कॅन्सरपेक्षा अधिक असते.

ब्लॅडर कॅन्सरच्या स्टेज आणि ग्रेडवर त्याचे उपचार अवलंबून असतात. साधारणपणे त्यामध्ये हे सामिल असताना:

 • टीयुअरबीटी.
 • कॅन्सर जर युरिनरी ब्लॅडरच्या वरच्या स्तरापर्यंत मर्यादित असेल तर शस्त्रक्रियेने त्याचा उपचार केला जातो. लो-ग्रेड-नॉन-मसल-इनव्हेसिव्ह कॅन्सर या शस्त्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देतो.
 • किमोथेरेपी: किमोथेरेपीचे औषध टीयुअरबीटी नंतर थेट ब्लॅडर मध्ये सोडण्यात येते ज्यामुळे कॅन्सर परत न होण्याची शक्यता वाढते. कॅन्सरच्या स्टेज आणि त्याच्या कमी ते मध्यम तीव्रतेनुसार डॉक्टर किमोथेरेपीचे उपचार करतात.
 • रेडिएशन थेरेपी: हाय-ग्रेडचे ब्लॅडर कॅन्सर जे साधारणतः पसरलेले असते त्यासाठी केमोथेरेपी सोबत रेडिएशन थेरेपी सुद्धा केली जाते.
 • इम्यूनोथेरपी: कॅन्सरच्या सुरवातीला उपचारासाठी टीयुअरबीटी नंतर बीसीजीचे सुधारित व्हॅक्सिन दिले जाते.
 • जर बीसीजी व्हॅक्सीनच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही तर थोडा भाग किंवा संपूर्ण युरिनरी ब्लॅडर शस्त्रक्रिया करुन काढण्यात येतो.संदर्भ

 1. Sanjeev Sharma. Diagnosis and Treatment of Bladder Cancer. Am Fam Physician. 2009 Oct 1;80(7):717-723. American Academy of Family Physicians
 2. National Health Service [Internet]. UK; Symptoms - Bladder cancer
 3. National Health Service [Internet]. UK; Bladder cancer
 4. National Cancer Institute. Bladder Cancer Symptoms, Tests, Prognosis, and Stages (PDQ®)–Patient Version. U.S. Department of Health and Human Services. [internet]
 5. Sudhir Rawal. Bladder cancer: A difficult problem?. Indian J Urol. 2008 Jan-Mar; 24(1): 60. PMID: 19468361

ब्लॅडर कॅन्सर साठी औषधे

Medicines listed below are available for ब्लॅडर कॅन्सर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.