आतडी असंयम - Bowel Incontinence in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 27, 2018

March 06, 2020

आतडी असंयम
आतडी असंयम

आतडी असंयम म्हणजे काय?

आतडी असंयम म्हणजे एखाद्या व्यक्तीला मल किंवा शौचावर नियंत्रण ठेवता येत नाही. ह्यामुळे आंत्र रिक्त अवांछितपणे किंवा अपघाताने होते. सामान्यपणे वृद्धांमध्ये, खासकरून महिलांमध्ये हे आढळते. हे प्रासंगिकतः होऊ शकते आणि याच्या तीव्रतेवर अवलंबून डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. या अनैच्छिक कृतीमुळे लाजिरवाणी परिस्थिती टाळायला सामाजात मिळणे मिसळणे बंद होऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

दोन प्रकारचे आंत्र असंतुलन असतात आणि प्रकारांवर आधारित लक्षणे भिन्न असतात.

  • उत्कट इच्छा आतडी असंयम
    शौच लागल्याचे समजते पण शौचालयाला पोहोचे पर्यंत धरु शकत नाही.
  • आंत्र मलविषयक आतडी असंयम
    या प्रकारात, मलच्या प्रवाहाच्या आधी आपल्याला कुठलीच जाणीव होत नाही.

उदरवायु (गॅस) पास करणे सांभाळण्यात अडचण येणे आणि शौचाच्या खूणांची किंवा डागांची उपस्थिति आंत्र असंतुलन संबंधित इतर लक्षणे आहेत.

याची मुख्य कारण काय आहेत?

आतडी असंयमाची कारणे पुढील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

तुमचे डॉक्टर लक्षणे आणि इतर वैद्यकीय परिस्थितीचा इतिहास घेतील त्यानंतर शारीरिक तपासणी करतील. स्थितीची वारंवारता आणि तीव्रता यावर आधारित डॉक्टर इतर डायग्नॉस्टिक चाचण्यांचा सल्ला देतील जसे ॲनोस्कोपी (गुदाच्या आत पाहण्यासाठी), ॲनोरेक्टल मॅनोमेट्री (गुदा स्नायूंमधील कोणतीही कमतरता ओळखण्यासाठी), अँडोॲनल अल्ट्रासोनोग्राफी, डेफिकोग्राफी (अवयवांची प्रतिमा काढून शरीराच्या गुदा, गुदाशय किंवा त्याच्या स्नायूंमधील कोणत्याही समस्या ओळखणे).

याचे उपचार पुढील प्रमाणे आहे:

  • आहार बदलणे, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आणि भरपूर पाणी पिणे.
  • जीवनशैलीतील बदल.
  • स्नायू मजबूत बनवण्यासाठी व्यायाम करणे.
  • प्रत्येक दिवशी एका विशिष्ट वेळी आंत्र हालचालीसाठी स्वत: ला प्रशिक्षित करणे.
  • अंतर्भूत कारणांसाठी औषधोपचार.
  • स्थितीची तीव्रता आणि कारणांवर अवलंबून शस्त्रक्रिया.



संदर्भ

  1. American Society of Colon and Rectal Surgeons [Internet] Columbus, Ohio; Fecal Incontinence.
  2. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Bowel incontinence
  3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Symptoms & Causes of Fecal Incontinence
  4. American College of Obstetricians and Gynecologists. Women's Health Care Physicians [internet], Washington, DC; Accidental Bowel Leakage
  5. American College of Obstetricians and Gynecologists. Women's Health Care Physicians [internet], Washington, DC; Accidental Bowel Leakage

आतडी असंयम साठी औषधे

Medicines listed below are available for आतडी असंयम. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.