बुलिमिया नर्व्होसा - Bulimia Nervosa in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

बुलिमिया नर्व्होसा
बुलिमिया नर्व्होसा

बुलिमिया नर्व्होसा म्हणजे काय?

बुलिमिया नर्व्होसा, किंवा बींज इटिंग डिसऑर्डर, ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये बिंजिंग आणि पर्जिंग हे वारंवार होते. हे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सामान्य आहे परंतु किशोरवयीन मुलींमध्ये जास्त दिसून येते. अशा व्यक्तीला कोणत्याही वेळी खायला आवडते (आक्रमकपणे जास्त प्रमाणात अन्न अल्प कालावधीमध्ये खाणे), खाण्यावर नियंत्रण गमावणे, त्यानंतर अचानक लाजिरवाणे वाटणे, बिंजिंग आणि पर्जिंग च्या या कालावधीत हा एक चिन्हांकित मानसिक रोग आहे ज्यामध्ये स्वयं-प्रेरित उलट्या, वजन कमीचे औषधे वापरणे, लॅक्सेटिव्ह आणि डायरेक्टिक्स घेणे, अति व्यायाम, आणि उपवास करणे असे होते. कधीकधी, ही स्थिती देखील जीवघेणी असू शकते.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

मुख्य चिन्हं आणि लक्षणं खालील प्रमाणे आहेत:

  • अनियंत्रित खाणे, सार्वजनिक ठिकाणी खाण्याची इच्छा नसते.
  • शरीरचा आकार आणि वजन याबाबत अत्यंत गंभीर असणे.
  • मनःस्थिती, चिंता आणि निराशा.
  • जेवण केल्यानंतर वारंवार बाथरूम मध्ये जाणे.
  • उलट्याच्या वास.
  • अति व्यायाम.
  • लॅक्सेटिव्ह, डायरेक्टिक्स आणि वजन कमी करणाऱ्या औषधांचा वापर.
  • वजनात बदल, पण ती व्यक्ती साधारणतः सामान्य वजनाचे नियमन करेल. सहसा, डॉक्टर किंवा इतर व्यक्तींची समजूत आहे की बुलिमिया असलेल्या व्यक्तीचे वजन कमी असते, आणि यामुळे त्यांच्या बुलिमिया चे निदान होऊ शकत नाही किंवा खूप काळ ते लक्षात येत नाही.
  • बोटाच्या सांध्यांचे हाड घट्ट किंवा तीव्र असणे.
  • हात आणि पाय सुजणे.
  • दातांवर डाग पडणे आणि हिरड्यांचे नुकसान होणे.
  • जेवणाची अनिच्छा किंवा कडक डायटींग.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बुलिमियाचे मूळ कारण अजूनही माहीत नाही आहे. अनुवंशिकता, वैद्यकीय इतिहास, शरीराच्या वजनाबाबत आणि शरीराच्या आकाराबाबत चिंता असणे, कमी आत्मविश्वास असणे, मोहक आणि परिपूर्णता असलेले व्यक्तिमत्व, काळजी, आणि नैराश्य.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वरील चिन्हं आणि लक्षणं यावर आधारित, डॉक्टर बुलीमियाचे निदान करू शकतात.

  • खाण्याच्या सवयी, वजन कमी करण्याच्या पद्धती आणि शारीरिक लक्षणे अशा प्रश्नांवर आधारित.
  • प्राथमिक तपासणी, त्यात रक्त, मूत्र, आणि हृदयाच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम यांचा समावेश असतो.
  • डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॉड्युल - ५ ( डीएसएम) साधन याने निदानाची  पुष्टी करण्यासाठी.

मानसोपचारतज्ञ, डॉक्टर आणि आहारतज्ञ या व्यवसायिकांची टीम बुलिमिया चा उपचार करण्यासाठी आवश्यक आहे. मानसिक समुपदेशनाने उपचाराची सुरुवात केली जाऊ शकते, परंतु त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेवर आधारित,औषधं जसे की अँटी-डिप्रेसेंट दिले जाऊ शकतात. फ्लूक्सइटाईन हे एफडीए मान्य अँटी-डिप्रेसेंट आहे. इतर उपचारांमध्ये मासोपचार ज्यामध्ये संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी, कुटुंब आधारित उपचार, अंतरवायक्तिक उपचार, पोषणा चा अभ्यास आणि रुग्णालयात दाखल करणे.

बुलिमिया च्या उपचारामध्ये प्रामुख्याने वेळेवर जेवण करणे आणि आहाराला नियंत्रित न करणे महत्वाचे आहे. मदत करण्यासाठी काही ग्रुप्स उपलब्ध आहेत, जे जॉईन करण्याचा निर्णयरुग्णाचा असतो. उपचाराला जरी वेळ लागला तरी बुलिमिया पूर्ण बरा होऊ शकतो.



संदर्भ

  1. National Eating Disorders Association. Bulimia Nervosa. New York, United States. [internet].
  2. Help Guide international. Bulimia Nervosa. Santa Monica, California. [internet].
  3. National Health Service [Internet]. UK; Bulimia
  4. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood (KS); Assessment and Treatment of Bulimia Nervosa
  5. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood (KS); Treatment of Bulimia Nervosa

बुलिमिया नर्व्होसा साठी औषधे

Medicines listed below are available for बुलिमिया नर्व्होसा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.