myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

कँडीडाचा संसर्ग काय आहे?

कँडीडाचा संसर्ग हा सर्वात सामान्य फंगल संसर्ग आहे जो शरीराच्या अनेक भागांना प्रभावित करू शकतो. कधी कधी,कँडिडामुळे सिस्टेमिक इन्फेक्शन (संपूर्ण शरीरावर होणारे) सुद्धा होऊ शकते, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. कँडीडाच्या संसर्गाचे तीन प्रमुख प्रकार आहेत:

 • अन्न नलिकेचे, घशाचे आणि तोंडाचे संसर्ग.
 • जननेंद्रियाचे कँडीडा संसर्ग (अधिक वाचा: व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन चे उपचार)
 • इनव्हेसिव्ह कँडीडा संसर्ग. कँडीडाच्या 20 पेक्षा जास्त प्रजाती आहेत ज्यात कँडीडा ॲल्बिकन्स हे संसर्गाचे सर्वात सामान्य कारण आहेत.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शरीराच्या कोणत्या भागात संसर्ग झाला आहे त्यानुसार कँडीडा संसर्गाची लक्षणे बदलतात. कँडिडिआसिसची काही कॉमन चिन्हे खाली दिल्याप्रमाणे आहेत:

 • हेअर फॉलिकल्स चा संसर्ग जो पुरळा सारखा दिसतो.
 • त्वचेवर लालसर,खाज सुटणारी रॅश.
 • जननेंद्रिय,तोंड,स्तनांच्या खाली, स्किन फोल्ड्स आणि शरीराच्या इतर भागात रॅशेस.

याची मुख्य कारणं काय आहेत?

त्वचेच्या कँडीडाचा संसर्ग हा व्यापक आहे आणि शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो, तरी मुख्यतः जे भाग ओलसर राहतात तिथे आणि स्किन फोल्ड्सवर जास्त होतो. त्वचेच्या संसर्गाची कारणं पुढीलप्रमाणे आहेत:

सामान्यतः कँडिडा काख आणि मांडीवर परिणाम करत असला, तरी नखं आणि तोंडयाच्या कोपऱ्यांवर सुद्धा होऊ शकतो. व्हजायनल आणि तोंडाचा कँडिडिआसिस अँटीबायोटिक थेरपी मुळे होतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे जसे कि एचआयव्ही संसर्गाचे रुग्ण यांमध्ये सुद्धा हा विकार दिसून येतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कँडीडाच्या संसर्गाचे उपचार करण्यासाठी प्रभावित त्वचा खरवडून काढली जाते आणि त्यात सूक्ष्मजीव आहेत का याचे परीक्षण केले जाते. कँडिडिआसिस झाल्यास त्या व्क्तीची ब्लड शुगर पातळी तपासायला हवी. उच्च ब्लड शुगर पातळी असल्यास बुरशीस खाद्य मिळते आणि ती पसरत जाते.

कोणत्याही कँडीडाच्या संसर्गाचा उपचार पुढीलप्रमाणे केला जाऊ शकतो:

 • योग्य स्वास्थ्य आणि स्वच्छता ठेवणे ही उपचारांसाठी प्राथमिक आवश्यकता आहे.
 • आपल्या त्वचेच्या ओलसर भागामध्ये शोषक पावडरचा वापर केल्यामुळे कॅंडिडिआसिस टाळता येतो तसेच उपचार करता येतो.
 • आपल्या त्वचेला सूर्यप्रकाशात लागू द्यावा.
 • आपल्या ब्लड शुगर ची पातळी ताब्यात ठेवावी.
 • आपले डॉक्टर टॉपीकल अँटीफंगल क्रीम आणि मलम लिहून देऊ शकतात जे उपचारास मदत करतील.
 • गंभीर कँडिडिआसिसच्या झाल्यास, डॉक्टर ओरल अँटीफंगल थेरपी देखील निर्धारित करू शकतात.
 1. कँडिडाचा संसर्ग साठी औषधे
 2. कँडिडाचा संसर्ग चे डॉक्टर
Dr. Neha Gupta

Dr. Neha Gupta

संक्रामक रोग

Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

कँडिडाचा संसर्ग साठी औषधे

कँडिडाचा संसर्ग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
CanditralCANDITRAL 100MG CAPSULE 4S57
SyntranSyntran 100 Mg Capsule157
SyscanSYSCAN 100MG CAPSULE 4S88
Candiforce CapsuleCandiforce 100 Capsule38
OnitrazONITRAZ 100MG CAPSULE 10S156
DermizoleDermizole 2% Cream0
Clenol LbClenol Lb 100 Mg/100 Mg Tablet55
Candid GoldCANDID GOLD 30GM CREAM59
Propyderm NfPROPYDERM NF CREAM 5GM60
WofunginWofungin 50 Mg Injection11030
PlitePlite Cream0
Onitraz ForteOnitraz Forte Capsule145
FungitopFungitop 2% Cream0
PropyzolePropyzole Cream0
CanciginCancigin 50 Mg Injection7992
Q CanQ Can 150 Mg Capsule9
PanitraPanitra 200 Mg Capsule0
MicogelMicogel Cream17
Imidil C VagImidil C Vag Suppository59
Propyzole EPropyzole E Cream0
CapofinCapofin 50 Mg Injection7880
ReocanReocan 150 Mg Tablet23
SiditraSiditra 100 Mg Capsule26
MiconelMiconel Gel0
Tinilact ClTinilact Cl Soft Gelatin Capsule135

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Candida infection of the skin
 2. Oral Cancer foundation. Candida Infection. Newport Beach, California. [internet].
 3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Candidiasis
 4. The Primary Care Dermatology Society. Candidal infection . Rickmansworth, England. [internet].
 5. National Center for Advancing Translational Sciences [internet]: US Department of Health and Human Services; Systemic candidiasis
और पढ़ें ...