कॅन्कर फोड - Canker Sores in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 29, 2018

March 06, 2020

कॅन्कर फोड
कॅन्कर फोड

कॅन्कर फोड म्हणजे काय?

कॅन्कर फोड म्हणजे छोटे व्रण किंवा फोडं जे हिरड्यांच्या मुळाशी टिशूंमध्ये बनतात.याला ॲफथस अल्सर्स देखील म्हणतात, हे संसर्गजन्य नसतात, पण वेदनादायी असू शकतात आणि खाणे आणि बोलणे यासारख्या मूलभूत कार्यांमध्ये खूप अडचणी निर्माण करु शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कॅन्कर फोड सामान्यत: जीभेच्या खाली, ओठांच्या किंवा गालच्या आत किंवा हिरड्यांच्या मुळाशी बनतात. ते अंडाकृती आकाराचे, दुधाळ-पिवळसर रंगाचे असून यांना लाल कोपरे असतात. कॅन्कर फोडांभोवती झिणझिण्या येऊ शकतात किंवा जळजळ वाटू शकते. विविध प्रकारच्या कॅन्कर फोडांची लक्षणें अशी आहेत:

लहान फोडं

 • खूप लहान.
 • अंडाकृती आकार.
 • आठवड्याभरात, कुठलेही डाग मागे न ठेवता तसेच बरे होतात.

मोठी फोडं

 • मोठे आणि खोल.
 • स्पष्टपणे दिसतात.
 • खूप वेदनादायक.
 • बरे होण्यासाठी अनेक आठवडे लागतात आणि बरेचदा मोठे डाग सोडून जातात.

 हर्पिटीफॉर्म फोडं

 • सूक्ष्म असतात.
 • मोठ्या समूहात बनतात जे एकत्र येऊन मोठे अल्सर तयार करतात.
 • एका पंधरवड्यात डाग न सोडता बरे होतात.

 याची मुख्य कारणं काय आहेत?

विविध कारणांमुळे कॅन्कर फोडं होऊ शकतात, सहसा विविध कारणे एकत्रितपणे सुद्धा कारणीभूत असतात.

 • गाल चावल्यामुळे दुखापत.
 • खूप वेळ, दाबून आणि जोराने दात घासल्यामुळे.
 • टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरिल सल्फेट असणे.
 • काही खाद्य पदार्थांची संवेदनशीलता असणे जसे की खूप तेलकट, मसालेदार,ॲसिडिक किंवा असे पदार्थ ज्यात दुग्ध उत्पादने किंवा नट्स असतात.
 • झिंक, व्हिटॅमिन बी12, किंवा फोलिक ॲसिडची कमतरता.
 • अल्सर उत्पन्न करणारे बॅक्टरीया असणे.
 • महिलांमध्ये हार्मोनल बदल.
 • ताण.
 • सेलियाक, इंफ्लेमेटरी बोउल डिसीज, बेहसेट्स डिसीज किंवा एचआयव्ही संसर्ग / एड्स सारखे रोग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कॅन्कर फोडांचे निदान करण्यासाठी तोंडाचे आणि अल्सरचे परीक्षण पुरेसे आहे. या समस्येमागे इतर काही कारणे आहेत असे वाटल्यास, किंवा जखम बराच काळ टिकत असल्यास डॉक्टर काही चाचण्या सांगू शकतात.

उपचारांचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, आणि डॉक्टर सामान्यत: पुढीलप्रमाणे सल्ला देतात:

 • सूज आणि वेदना शमण्यासाठी डेक्सामिथासोनने गुळण्या करणे.
 • हायड्रोजन पेरॉक्साईड, फ्लुओसाइनोनाइड किंवा बेन्झोकेन असलेले विशिष्ट मलम किंवा जेल लावणे.
 • कारणांवर अवलंबून तोंडी औषधे.
 • फोडांना जाळणे किंवा नष्ट करणे.
 • कमतरतेसाठी सप्लिमेंट्स जसे की व्हिटॅमिन बी 12, फॉलेट किंवा झिंक.
 • मसाले, डेअरी, नट्स, तेलकट अन्न किंवा आम्ल पदार्थांचे सेवन टाळणे आणि कमी पोषक घटकांच्या वाढीसाठी आहारात योग्य बदल करणे.
 • तोंडाची स्वच्छता बाळगणे.
 • तणावापासून दूर राहणे.  

  (अधिक वाचा: तोंडाच्या अल्सरचे उपचार)संदर्भ

 1. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood (KS); Canker Sores
 2. Mouth healthy. [internet]. American dental association. Canker Sores.
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Canker Sores
 4. Health Link. Canker Sores. British Columbia. [internet].
 5. Healthdirect Australia. Mouth sores and ulcers. Australian government: Department of Health. [internet].

कॅन्कर फोड साठी औषधे

कॅन्कर फोड के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।