सेंट्रल प्रीकॉशियस प्यूबर्टी (सीपीपी) - Central Precocious Puberty (CPP) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 08, 2018

March 06, 2020

सेंट्रल प्रीकॉशियस प्यूबर्टी
सेंट्रल प्रीकॉशियस प्यूबर्टी

सेंट्रल प्रीकॉशियस प्यूबर्टी (सीपीपी-CPP) काय आहे?

सेंट्रल प्रीकॉशियस प्यूबर्टी (सीपीपी-CPP) ही एक अशी परिस्थिती आहे जी मुलांच्या लवकर तारुण्यात येण्याच्या लक्षणांद्वारे ओळखली जाते. मुलींमधे आठ वर्षापूर्वी आणि मुलांमधे नऊ वर्षापेक्षा आधी तारुण्याची चिन्हे दिसून लागली तर त्यांची सीपीपी(CPP) सारख्या अंतर्भूत परिस्थितींसाठी तपासणी केले पाहिजे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सीपीपी (CPP) ची चिन्हे आणि लक्षणे नैसर्गिक प्युबर्टी सारखीच असतात. पण, हे अगदी लहान वयात दिसून येतात. मुलींमध्ये प्युबर्टीची सामान्य लक्षणे अशी आहेत:

  • स्तनाचा विकास.
  • प्रथम मासिक पाळी.

मुलांमधे प्युबर्टीची सामान्य लक्षणं ही आहेत:

  • अंडकोष आणि जननेंद्रियात वाढ.
  • स्नायुंचा विकास.
  • आवाज डीप होणे.
  • उमळ्यात वाढ.
  • चेहऱ्यावर केस येणे.

मुली आणि मुलांमधील सामान्य लक्षणे ही आहेत:

  • मुरुम.
  • प्युबिक आणि शरीरावर केसं.
  • उमळ्यात वाढ.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सीपीपी(CPP) चे कारण अजून सापडले नाही. क्वचितच, काही परिस्थितीत सीपीपी (CPP) होऊ शकते. त्या ह्याप्रमाणे आहेतः

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

जर आपल्या मुलांमध्ये लहान वयात प्युबर्टीचे लक्षण आपल्या लक्षात येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर शारीरिक तपासणी करतील आणि स्थिती आणि त्याचे कारणं ठरवू शकतील:

  • हार्मोन ची उच्च पातळी तपासण्यासाठी मूत्र चाचणी आणि रक्त तपासणी करतात. हार्मोनची उच्च पातळी प्युबर्टी च्या सुरवातीची सूचना देते. हार्मोन ची पातळी डॉक्टरांना मध्य किंवा परिधीय, लहान वयातील प्युबेर्टीचे निदान करण्यात देखील मदत करते.
  • मेंदूतील कोणताही दोष ओळखण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय-MRI) आणि सीटी(CT) स्कॅनिंगचा उपयोग मेंदू स्कॅन करून केला जातो.मुलामधील हाडांची वाढ सामान्य आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञान वापरले जाते. एमआरआय(MRI) सीटी स्कॅन आणि एक्स-रे ची शिफारस सीपीपी(CPP) चे कारण शोधण्यासाठी केली जाते.
  • डेक्सा (DEXA) स्कॅन आणि पेल्विक अल्ट्रोनोग्राफीद्वारे हाडांचे वय निर्धारण यासारख्या इतर चाचण्या मुलींमध्ये सीपीपी(CPP) च्या निदानासाठी सांगितल्या जातात.

उपचार हे कोणत्या वयात प्युबेर्टीचे सुरुवात झाली आहे यावर अवलंबून असतात. जर सुरुवातीचे वय हे सामान्य वयाच्या जवळ असेल तर तर कोणत्याही उपचाराची गरज नसते.पण जर हे अगदी कामी वयात होत असेल तर खालील उपचार केले जाऊ शकतात:

  • गोनॅडोट्रोपीन सोडणाऱ्या प्रातिस्पर्धी हार्मोनचा वापर करुन दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांच्या प्रगतीस प्रतिबंध घालणे.
  • मुलींमधे मासिक पाळी थांबविण्याकरिता औषधं.
  • उद्भवलेल्या स्थितीच्या कारणांचा उपचार करणे.



संदर्भ

  1. American Academy of Family Physicians. Central Precocious Puberty. [Internet]
  2. Antoniazzi F, Zamboni G. Central precocious puberty: current treatment options.. Paediatr Drugs. 2004;6(4):211-31. PMID: 15339200
  3. Melinda Chen et al. Central Precocious Puberty: Update on Diagnosis and Treatment. Paediatr Drugs. Author manuscript; available in PMC 2018 Mar 27. PMID: 25911294
  4. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Study of Lupron Depot In The Treatment of Central Precocious Puberty
  5. National Organization for Rare Disorders. Precocious Puberty. [Internet]