Chikungunya - Chikungunya in Marathi

Chikungunya
Chikungunya

सारांश

चिकनगुनिया हाआएडेसडासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. गेल्या दशकात आफ्रिका, आशिया, भारत, कॅरिबिअन आणि मध्य व दक्षिण अमेरिकेत चिकनगुनियाच्या प्रसारात लक्षणीय वाढ झाली आहे. चिकनगुनिया विषाणूची राखण करणाऱ्या मच्छराने चावा घेतलेली बहुतेक माणसं याची लक्षणे दर्शवितात. या लक्षणांमध्ये ताप आणि सांधेदुखीचा समावेश आहे जे गंभीर होऊ शकते. बहुतांश वेळा रुग्णाचे7-10 दिवसांच्या आत आजारातून बरे होणे सुरू होते. नवजात बालकांमध्ये आणि वृद्धांमध्ये आजार वेगाने वाढण्याचा धोका अधिक असतो. आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या स्थिर पाण्यामध्ये आएडेस डासाची पैदास होते आणि प्रसार होतो. म्हणून, आजाराचा धोका कमी करण्यासाठी, आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवणे महत्वाचे आहे. कूलर, फुलदाणी, शोभेचे पात्र किंवा मासे असलेल्या काचेच्या पेट्या यामधील पाणी काढून टाकावे आणि आठवड्यातून किमान 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने बदलावे जेणेकरून डासांची पैदास रोखतायेऊ शकेल. इतर निवारक उपायांमध्ये मच्छरदाण्या, डासावरोधक यंत्र, लेपन / मलम वापरणे आणि संरक्षणात्मक कपडे घालणे यांचा समावेश आहे. चिकनगुनियाला बरे करण्यासाठी औषध नाही आणि औषधोपचार करण्यासाठी कुठलीही लस नाही. म्हणून, उपचार,लक्षणे कमी करण्यावर केंद्रित करतात. चिकनगुनिया आणि डेंग्यूची लक्षणे सामान्यतः सारखीच असतात. दोन्हींमध्ये ताप येतो. म्हणूनएका आजाराने दुसऱ्याचाभ्रम होणे शक्य आहे. म्हणूनचउपचार सुरू करण्याआधी योग्य निदान होणे महत्वाचे आहे.योग्य मार्गाने उपचार आणि मुक्तता झाल्यास, लक्षणे सामान्यतः 2-3 आठवड्यांच्या आत कमी होतात. चिकनगुनियापासून होणारी जटिलता दुर्मिळ आहे आणि असुरक्षित समुदायांमध्ये चिकनगुनियाचा प्रकोप नियंत्रित करण्यासाठीची प्रतिबंधक धोरणे फार उपयोगाची होऊ शकतात.

Chikungunya symptoms

संक्रमित डासाच्या चाव्यानंतर 3-7 दिवसात चिकनगुनियाची लक्षणे दिसू लागतात. चिकनगुनियाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. बऱ्याचदा या आजारामुळे डेंग्यू तापाचा भ्रमहोऊ शकतो, विशेषत: अशा भागात जिथे डासाने होणारे विविध आजार आढळतात. असेही दिसून आले आहे की काही लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. तथापि, अशा घटना दुर्मिळ आहेत. चिकनगुनियाच्या प्रमुख लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • अचानक ताप येणे
  कमी ताप असून ते दोन दिवसापर्यंत टिकू शकतो. तापाने देखील एखाद्याला कंप आणि हुडहुडीचा अनुभव येऊ शकतो.
 • सांध्यांमधील तीव्र वेदना
  सकाळी तीव्र असलेल्या वेदना संध्याकाळच्या वेळी शारीरिक हालचाली वाढल्याने चिघळतात. काही लोक सौम्य शारीरिक वेदना अनुभवतात तर वयस्करांना सांधेदुखीच्या असह्य वेदना होऊ शकतात. काही लोकांमध्ये, सांधेदुखीच्या वेदना अनेक महिने टिकू शकतात परंतु हळूहळू तिची तीव्रता कमी होते.
 • स्नायू वेदना
  चिकनगुनियाच्या रुग्णामध्ये स्नायूच्या वेदना आणि सांध्यांतील वेदना ही सर्वात गंभीर लक्षणे आहेत.
 • इतर लक्षणांत समाविष्ट आहेत:

जर लक्षणे असह्य होतअसतील आणि रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.

Chikungunya treatment

चिकनगुनिया बरा करण्यासाठी कोणतीही विशिष्ट औषधे नाहीत. उपचारांमुळे वेदना आणि तापाच्या लक्षणांचे प्रमाण कमी होण्याला आणिलवकर बरे व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. चिकनगुनिया विरूद्ध निश्चित संरक्षण देण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. म्हणून,लक्षणांवर उपचार आहेत.

ताप आणि वेदनांपासून आराम देण्यासाठी पॅरासिटामोल घेता येते. एस्पिरिन आणि इतर बिगरस्टेरॉइड  दाहशामक औषधांसारखे (एनसेड्स) वेदनानाशक डॉक्टरांच्या परवानगीशिवाय घेतल्या जाऊ नये. कारण, ताप डेंगूमुळे असेल तर एस्पिरिन घेतल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

एखादी व्यक्ती इतर शारीरिक अवस्थांसठी औषधे घेत असल्यास, चिकनगुनियासाठी औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जीवनशैली व्यवस्थापन

घराची काळजी घेणे शक्य असल्यास, व्यक्ती पुढील गोष्टींची काळजी घेऊ शकते:

सामान्य देखभाल

 • भरपूर आराम करा. अधिक व्यायामाने स्नायूच्या वेदना वाढू शकतात आणि थकवा येऊ शकतो.
 • थोडे बरे वाटत असल्यास तुम्ही हलक्या हालचालींना प्रारंभ करू शकता ज्यामुळे सांध्यांतील ताठरपणा कमी होतो. म्हणून, थोडे चालण्याने वेदना कमी होण्यास मदत होते.
 • उबदार आणि आरामदायक वातावरणात आराम करण्याचा प्रयत्न करा. उष्ण वातावरणास टाळा कारण यामुळे सांध्यांतील वेदना आणखी चिघळू शकतात.
 • ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिवसात 4पेक्ष्या जास्त वेळा घेऊ नये.
 • वेदनानाशक टाळा.
 • जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी शीतदाबाचा वापर केला जाऊ शकतो. ते वेदना कमी करू शकतात.
 • चिकनगुनियाचे निदान झाल्यास, मच्छरदाण्यांमध्ये झोपा, जेणेकरून इतर डास आपणास चावे घेणार नाहित आणि विषाणू पसरण्याचे थांबेल. भरपूर पाणी प्यावे.

आहार

 • भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घ्यावे.तोंडाचे जलीकर्ण करण्यासाठी उकळलेळ्या पाण्यात मीठ मिसळून पिल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचे समतोल ठेवता येते. विशेषतः तुम्हाला पचनसमस्या असल्यास किंवा उलट्या होत असल्यास हे महत्वाचे आहे.
 • रस, ताक, नारळाचे पाणी आणि ताज्या भाजीचे रस यासारख्या द्रवपदार्थांमुळे आजार बरा होण्यास मदत होऊ शकते कारण त्यातून पोषक तत्त्वे मिळतात.
 • अशक्तपणा आणि थकवा टाळण्यासाठी नियमित वेळेत थोडेथोडे जेवण करणे आवश्यक आहे. प्रथिने आणि कॅलॉरीने समृद्ध असलेले पदार्थ ऊर्जा निर्मिती करण्यात मदत करतात. तथापि, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आणि साखरेपासून तयार केलेल्या पदार्थांपासून दूर रहा, कारण यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
 • तुमचे पोट स्वस्थ असल्यास सौम्य मसालेदार खाद्यपदार्थ घेण्याची परवानगी आहे. हे आहाराला रुचकर बनवते. तथापी खूप जास्त मसालेपदार्थ घातल्यास आम्लाचे संतुलन बिघडू शकते. (अधिक वाचा - गॅस्ट्रोसोफेजल रीफ्लक्स आजार उपचार)
 • C जीवनसत्वाने समृध्द फळे, रोगप्रतिकार यंत्रणेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारे म्हणून ओळखले गेले आहेत. म्हणून संत्रा, पेरू, गोड बटाटे, लिंबू आणि पपई यांसारखे फळ जलद मुक्ततेसाठी मदत करू शकतात.
 • चिकनगुनियामधून बरे होताना मद्य, कॉफी किंवा चहासारख्या पाणी शोषणाऱ्या द्रवपदार्थांपासून सावध रहा.

What is Chikungunya

चिकनगुनिया हा डसाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. 1952 मध्ये दक्षिणी तंजानिआमध्ये चिकनगुनियाचा पहिला प्रकोप नोंदवण्यात आला. चिकनगुनियामध्ये तीव्र वेदना होतात आणि ताप येतो. चिकनगुनियाची लक्षणे डेंग्यू आणि झिका (डासजन्य विषाणूंचाआजार) सारखीच आहेत, ज्यामुळे चिकनगुनियाचे चुकीचे निदान केले जाऊ शकते. या रोगापासून संरक्षण देण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. तथापि, डासाच्या चाव्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हेच सर्वोत्तम आहे. आएडेस डास जो चिकनगुनियाचा वाहक म्हणून काम करतो तो चिकनगुनियाने पिडीत झालेल्या व्यक्तीच्या रक्ताने संक्रमित होतो. हे डेंगू देखील पसरवू शकतात.संदर्भ

 1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Chikungunya.
 2. J. Erin Staples, Susan L. Hills, Ann M. Powers. Infectious Diseases Related to Travel. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services.
 3. Public Health England [Internet]; Published 25 April 2014: Chikungunya. Government of United Kingdom
 4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Chikungunya Virus
 5. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Guidelines on Clinical Management of Chikungunya Fever Guidelines on Clinical Management of Chikungunya ; October 2008
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Chikungunya virus