किडनी फेल होण्याची - Chronic Kidney Disease (CKD) in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 14, 2019

September 10, 2020

किडनी फेल होण्याची
किडनी फेल होण्याची

सारांश

मूत्रपिंडाचे घातक आजार (CKD) (क्रॉनिक रेनल डिसीझ) एक असे आजार आहे, ज्यामध्ये मूत्रपिंडाच्या कार्याची टप्प्याटप्प्याने हानी होते. याचे अर्थ असे की, आजारात वाढ झाल्याबरोबर, टप्प्याटप्प्याने मूत्रपिंडे सामान्य पद्धतीने रक्ताची छाननी करू शकणार नाहीत. सीकेडीची दोन सर्वांत सामान्य कारणे म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग. सुरवातीच्या टप्प्यामध्ये, कोणतीही विशेष लक्षणे नसतात. म्हणून, त्याचे निदान सामान्यपणें काही विशिष्ट रक्त व लघवी चाचण्यांद्वारे नियमित आरोग्य चाचणीदरम्यान होते. तरीही, मूत्रपिंडाचे कार्य उपचाराबरोबर अधिकच बिघडल्यास, किंवा सीकेडीचे निदान आधीच्या टप्प्यामध्ये न झाल्यास, व्यक्तीमध्ये टाच सुजणे, लघवीत रक्त, स्नायूच्या आकड्या, वारंवार लघवी लागणें आणि थोड्या हालचालीने श्वास जाण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. सीकेडीचे उपचार कारणावर आधारित आहे. औषधोपचारासह, जीवनशैलीचीही सीकेडीच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका असते. मूत्रपिंडाचे कार्य बिघडतच राहिल्याने, शेवटी रुग्णाला शेवटच्या टप्प्याचे मूत्रपिंडरोग( ईएसआरडी/ मूत्रपिंड निकामी होणें)  होऊ शकते, ज्यामध्ये डायलसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडते. सीकेडी असलेल्या दर 50मधील 1 व्यक्तीचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गुंतागुंती व अंततोगत्त्वा, मूत्रपिंड निकामी होणें टाळण्यासाठी वेळीच निदान व उपचाअर महत्त्वाचे आहे.

किडनी फेल होण्याची ची लक्षणे - Symptoms of Chronic Kidney Disease in Marathi

सीकेडीची लक्षणे याप्रमाणेः

सुरवातीची लक्षणे

सामान्यपणें, मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये लक्षणीय घट होऊनही मानवी शरीर यशस्वीपणें कार्य करते. म्हणून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये, सीकेडी सामान्यतः नोंद घेण्यासारखी लक्षणे दुखावत नाही. सीकेडीची सुरवातीची लक्षणे त्रोटक असतात. या लक्षणांमध्ये सामील आहे:

नियमित रक्त किंवा लघवी चाचणीमध्ये काही संभव समस्येचे निदान न झाल्यास, सीकेडीचे निदान सुरवातीच्या टप्प्यातही होऊ शकते. वेळी निदान आणि सीकेडीचे उपचार झाल्यास, आजाराची प्रगती अधिक होण्यास थांबवू शकतात.

नंतरच्या टप्प्याची लक्षणे

आधीच्या टप्प्यांमध्ये मूत्रपिंडाचे आजार पकडले न गेल्यास किंवा उपचार होऊनही आजारामध्ये बिघाड झाल्यास, पुढील लक्षणे विकसित होऊ शकतात:

  • मूत्रपिंडाच्या क्षतीमुळे झालेले रक्तातील कॅल्शिअम आणि फॉस्फोरस समतोळ बिघडल्यास हाडतील वेदना
  • जलसंचयामुळे हात, पाय आणि टाचांमध्ये शिथिलता किंवा सूज.
  • शरिरातील कचरा वाढल्याने अनोमिआ किंवा मासासारखे गंध येणें.
  • भूक कमी लागणें आणि वजन कमी होणें.
  • उलटी
  • वारंवार उचक्या
  • विशेषकरून रात्रीमध्ये, लघवीची वारंवारता वाढणें.
  • श्वास छोटे होणें.
  • थकवा
  • लघवी किंवा शौचेत रक्त येणें.
  • एकाग्रता किंवा विचारात अडचण
  • मसल क्रॅंप/स्पाझ्म.
  • सहज चीर पडणें.
  • पाणी पिण्याची वारंवार आवश्यकता
  • मासिक धर्म न होणें(एमॅनॉरिआ)
  • निद्रानाश
  • त्वचेचे रंग खूप हलके किंवा गडद होणें.
  • लैंगिक विकार.

सीकेडीच्या शेवटच्या टप्प्याला किडनी फेल्युर किंवा अंतिम टप्प्याचे मूत्रपिंडरोग म्हणतात, ज्याने अंततोगत्त्वा डायलसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडू शकते.

किडनी फेल होण्याची चा उपचार - Treatment of Chronic Kidney Disease in Marathi

सीकेडी पूर्णपणें बरा होत नाही आणि उपचाराचे लक्ष चालू लक्षणे कमी करून तीव्र होण्यापासून आजाराला थांबवणे असे असते. उपचार आजाराच्या तीव्रतेवर आधारित असते.

उपचाराची महत्त्वाचे घटक याप्रमाणें:

  • जीवनशैली परिवर्तन 
    महत्तम आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांद्वारे खालील बदलांचा सल्ला दिला जातो.:
    • धूम्रपान सोडणें.
    • संतुलित आणि निरोगी आहार घेणें.
    • दैनंदिन मिठाचे सेवन दररोज 6g पेक्षा कमी ठेवणें.
    • दररोज कमीत कमी 30 मिनिटे आणि आठवड्याला पाच दिवस व्यायाम करणें.
    • मद्यपान आठवड्याला 14 अल्कोहल एककापेक्षा कमी करणें.
    • वजन कमी करून तुमची उंची व वयाप्रमाणे निरोगी वजन राखणें.
    • स्वतंच्या मनाने औषध न घेणें.
  • औषधोपचार
    मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा अती कॉलेस्टरॉल यासारख्या निगडीत समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधे विहित केली जातात.
    • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी, निरोगी व संतुलित आहार घ्यावे, नियमित व्यायाम करावे आणि रक्तातील ग्लूकोझ आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित रक्त चाचणी करावी.
    • उच्च रक्तदाबासाठी, डॉक्टर एंजिओटेसिन परिवर्तक एंझायम(एसीई) इन्हिबिटर आणि सहप्रभावांच्या बाबतीत, एंजिओटेंसिन-II रिसेप्टर ब्लॉकर (एआरबी)  ही औषधे देऊ शकतात. उपचाराचे लक्ष रक्तदाब  140/90 mm/Hg पेक्षा खाली ठेवणें असे आहे.
    • कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्टॅटिन विहित केले जाऊ शकतात.
    • टाच व हातांतील सूज कमी करण्यासाठी, डाल्युरेटिक औषधे घेण्याचा आणि मीठ व द्रव्ये कमी करण्याचा सल्ला देतात.
    • खूप वेळ मूत्रपिंडाचे आजार असल्यामुळे रक्तक्षय झाल्याने, अधिक लाल रक्तपेशी निर्माण करण्यास साहाय्य व्हावे म्हणून, लौह पूरक तत्वे किंवा ‘एरिथ्रोपॉयटिन’ हार्मोन दिले जातील.
    • प्रगत सीकेडीसाठी डायलसिस आवश्यक असू शकते.
    • प्रगत सीकेडीमधील विस्तृत मूत्रपिंड हानी झाल्यास किंवा मूत्रपिंड निकामी पडल्यास, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्याची गरज पडू शकते.
  • समर्थनात्मक किंवा संरक्षणात्मक उपचार 
    डायलसिस किंवा प्रत्यारोपणाचा पर्याय न निवडल्यास किंवा ते तुमच्यासाठी योग्य नसल्यास, चिकित्सक तुम्हाला समर्थनात्मक उपचाराचा पर्याय देईल. समर्थनात्मक उपचाराचे लक्ष मूत्रपिंड निकामी होण्याच्या लक्षणांचे उपचार, आराम व नियंत्रण देणें असे असते आणि त्यामध्ये तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांसाठी मानसशास्रीय, वैद्यकीय व प्रायोगिक निगेचा समावेश असतो.

जीवनशैली व्यवस्थापन

काही सामान्य जीवनशैली बदल करून तुम्ही तुमचे मूत्रपिंड कार्यकारी स्थितीत ठेवू शकता, उदा.:

  • सोडिअम कमी असलेले आहार घेणें, विशेषकरून डबाबंद आहार टाळणें, कारण त्याच्यात अत्यधिक सोडिअम असतो.
  • दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. पोहणें व जलद चालणें शारीरिक सक्रियता ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. तरीही, यापूर्वी शारीरिकरीत्या सक्रीय नसल्यास, तुम्ही डॉक्टरांना तुमच्यासाठी योग्य असलेल्या व्यायामाबद्दल विचारावे.
  • ताजे फळ, भाज्या, संपूर्ण धान्ये, चवळी, त्वचा नसलेले टर्की किंवा कोंबडी, पातळ मांस, मासे आणि कमी वसा असलेले दूध किंवा चीझ यासारखे निरोगी आहार घ्या. साखर घातलेले पेय टाळा. कमी कॅलॉरीचे आहार घ्या व परिष्क़ृत वसा, ट्रांसफॅट, मीठ व साखर असलेले आहार टाळा.
  • निरोगी वजनाचे लक्ष धरा. लठ्ठपणा तुमच्या मूत्रपिंडासाठी कामाचा भार वाढवतो. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशिक्षित फिटनेसतज्ञ आणि आहारतज्ञाचा सल्ला घ्या.
  • भरपूर झोप घ्या आणि दर रात्रीसाठी  7 ते 8 तास झोपेचे लक्ष ठेवा. पुरेपूर झोप संवार्गीण शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे आणि याने तुमचे रक्तदाब व रक्तशर्करा नियंत्रणात राहतात.
  • धूम्रपान सोडा, कारण त्याने मूत्रपिंडाचे आजार अधिकच बिघडते. धूम्रपान कमी केल्याने तुमच्या रक्तदाबाचे लक्ष पूर्ण होऊ शकतात.
  • अत्यंत तणावाने रक्तदाब व रक्तशर्करा वाढत असल्यामुळे तणाव टाळणें महत्त्वाचे आहे. शांत संगीत ऐका, शांतचित्त शांतिमय गोष्टींवर लक्ष केंद्रित करा किंवा ध्यानधारणा करा, ज्याने तणावात मदत मिळेल.
  • औषधोपचाराचे काटकोर पालन करा आणि डॉक्टराच्या विहित केलेल्या वेळेत ते घ्या.


संदर्भ

  1. National Kidney Foundation [Internet] New York; About Chronic Kidney Disease
  2. National Health Service [Internet]. UK; Chronic kidney disease.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Chronic kidney disease
  4. Lameire N, Van Biesen W. The initiation of renal-replacement therapy--just-in-time delivery. N Engl J Med. 2010 Aug 12. 363(7):678-80. PMID: 20581421
  5. Jha. V., Garcia-Garcia. G., Iseki. K., et. al. Chronic kidney disease: Global dimension and perspectives. Lancet. Jul 20, 2013;382(9888):260-272. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/23727169. PMID: 23727169
  6. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Chronic Kidney Disease (CKD).
  7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Glomerular filtration rate
  8. Song E-Y, McClellan WM, McClellan A, et al. Effect of Community Characteristics on Familial Clustering of End-Stage Renal Disease. American Journal of Nephrology. 2009;30(6):499-504. doi:10.1159/000243716. PMID: 19797894
  9. National Health Service [Internet]. UK; Diabetes.
  10. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Managing Diabetes.

किडनी फेल होण्याची चे डॉक्टर

Dr. Anvesh Parmar Dr. Anvesh Parmar Nephrology
12 Years of Experience
DR. SUDHA C P DR. SUDHA C P Nephrology
36 Years of Experience
Dr. Mohammed A Rafey Dr. Mohammed A Rafey Nephrology
25 Years of Experience
Dr. Soundararajan Periyasamy Dr. Soundararajan Periyasamy Nephrology
30 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

किडनी फेल होण्याची साठी औषधे

Medicines listed below are available for किडनी फेल होण्याची. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.