myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

कॉस्टोकॉनड्रायटिस म्हणजे काय?

कॉस्टोकॉनड्रायटिस म्हणजे ब्रेस्टबोनला जोडलेल्या कार्टिलेज मध्ये सुज येणे. शेवटच्या दोन बरगड्या सोडून, इतर सर्व बरगड्या ब्रेस्टबोनला कार्टिलेजने जोडलेल्या असतात. या स्वयं-मर्यादित सुजेमुळे छातीत वेदना होतात, जे कॉस्टोकॉनड्रायटिसचे कॉमन लक्षण आहे.

कॉस्टोकॉनड्रायटिस खालील नावांनी देखील ओळखला जातो:

 • कॉस्टो-स्टर्नल सिन्ड्रोम.
 • पॅरास्टर्नल कॉन्ड्रोडायनिया.
 • ॲन्टिरियर चेस्ट व्हॉल सिन्ड्रोम.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वेदनांसह कॉस्टोकॉनड्रायटिस ची महत्त्वाची चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

 • ब्रेस्टबोनच्या डाव्या बाजूवर सहसा वेदना उद्भवतात.
 • वेदना तीक्ष्ण आणि अस्वस्थ करणाऱ्या असू शकतात.
 • दुखण्यासोबतच रुग्णाला दबाव पडल्यासारखे वाटू शकते.
 • खोल श्वास घेणे, खोकला, दगदग आणि वरील शरीराची हालचाल यामुळे वेदना तीव्र होतात.
 • एकापेक्षा जास्त बरगडी प्रभावित होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कॉस्टोकॉनड्रायटिस छातीच्या समोरच्या भिंतीत वेदना होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. सामान्यतः याचे कोणतेही मुलभूत कारण नसते. ज्या बरगड्या ब्रेस्टबोनला कार्टिलेजने जोडलेल्या असतात त्या सूजतात आणि कॉस्टोकॉनड्रायटिस होतो.

काही सामान्य कारणं अशी आहेत

 • छातीवर जखम किंवा आघात होणे.
 • अति-व्यायाम करणे किंवा खोकल्याचा गंभीर त्रास असणे.
 • संधिवाताचा त्रास असणे. (अधिक वाचा:संधिवात उपचार)
 • क्षयरोग आणि सिफिलीस सारखे संसर्ग ज्यामुळे बरगडीचे सांधे प्रभावित होतात.
 • फुफ्फुसे, स्तन किंवा थायरॉईड कॅन्सर छातीत स्थलांतरित होणे.

कॉस्टोकॉनड्रायटिस टिटेझ सिन्ड्रोमशी संबंधित आहे, ज्यामध्ये एकाच भागात वेदना होतात आणि त्या ठिकाणी सुज येते.

कॉस्टोकॉनड्रायटिसचा धोका 40 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना अधिक असतो. हा विकार पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त होतो.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

कॉस्टोकॉनड्रायटिसचे निदान वैद्यकीय इतिहास आणि बारगड्यांची शारीरिक तपासणी करून होते. तुमचे डॉक्टर तुम्हाला गंभीर खोकल्याचा त्रास आहे का किंवा तुम्ही कडक शारीरिक प्रशिक्षण करता का याबद्दल विचारपूस करतील. मुलभूत कारणे शोधण्यासाठी अॅन्टिरिअर चेस्ट एक्स-रे काढावा असू शकतो,तसेच पुढील कारणे तपासले जातात:

 • खांद्याचे सांधे किंवा छातीचे सांधे यामध्ये संधिवात.
 • संसर्ग किंवा निओप्लाझम यामुळे बरगडी जवळची कार्टिलेज नष्ट होणे.
 • फायब्रोमायल्जिया.
 • छातीच्या आतील भागात हर्पेस झोस्टर.

कॉस्टोकॉनड्रायटिसचे उपचार असे करतात

 • ॲनाल्जेसिक्स आणि ॲन्टी-इंफ्लेमेटरी औषधे.
 • त्रास गंभीर असल्यास आणि आवश्यक असल्यास लोकल अनॅस्थेटिक किंवा स्टिरॉइड इन्जेक्शन.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलके स्ट्रेचिंग व्यायाम.

स्वतःची-काळजी

 • उबदार किंवा गरम कॉम्प्रेस.
 • कोणतेही कडक शारीरिक क्रियाकलाप किंवा तणाव टाळणे.

(अधिक वाचा: सूज वाढवणार्‍या आजारांचा उपचार)

 1. कॉस्टोकॉनड्रायटिस साठी औषधे
 2. कॉस्टोकॉनड्रायटिस चे डॉक्टर
Dr. Deep Chakraborty

Dr. Deep Chakraborty

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Darsh Goyal

Dr. Darsh Goyal

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Vinay Vivek

Dr. Vinay Vivek

Orthopedics
6 वर्षों का अनुभव

Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

Orthopedics
26 वर्षों का अनुभव

कॉस्टोकॉनड्रायटिस साठी औषधे

कॉस्टोकॉनड्रायटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Brufen खरीदें
Combiflam खरीदें
Ibugesic Plus खरीदें
Tizapam खरीदें
Brufen MR खरीदें
Espra XN खरीदें
Lumbril खरीदें
Tizafen खरीदें
Endache खरीदें
Fenlong खरीदें
Ibuf P खरीदें
Ibugesic खरीदें
Ibuvon खरीदें
Ibuvon (Wockhardt) खरीदें
Icparil खरीदें
Maxofen खरीदें
Tricoff खरीदें
Acefen खरीदें
Adol Tablet खरीदें
Bruriff खरीदें
Emflam खरीदें
Fenlong (Skn) खरीदें
Flamar खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Costochondritis
 2. Healthdirect Australia. Costochondritis. Australian government: Department of Health
 3. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood (KS); Costochondritis: Diagnosis and Treatment
 4. Australian Family Physician. Musculoskeletal chest wall pain. Royal Australian College of General Practitioners. Victoria, Australia. [internet].
 5. Nidirect. Costochondritis. UK. [internet].
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें