कॅव्हिटी (दंतक्षय) - Cavities (Dental Caries) in Marathi

Dr Razi AhsanBDS,MDS

December 01, 2018

March 06, 2020

कॅव्हिटी
कॅव्हिटी

कॅव्हिटी (दंतक्षय) काय आहे?

दात आणि दातातील पोकळी एक खोलगट जागा असून ती दातांच्या वैकल्पिक डिमिनरिलायझेशन आणि रिमिनरीलायझेशन संरचनेमुळे निर्माण होते. कॅव्हिटी (दंतक्षय) बायोफिल्म-आधारित, साखर-आधारित रोग आहे जो  कोणत्याही वयात होऊ शकतो.

कॅव्हिटी (दंतक्षय), दुधाचे दात (प्राथमिक दात) आणि कायमचे दात (दुय्यम दात) या दोन्ही प्रकारात होऊ शकतात, परिणामी दाताचे रचनात्मक नुकसान होते.

जगभरातील 32% लोक कॅव्हिटी (दंतक्षय) द्वारे प्रभावित होतात, ज्यामुळे सामान्य सर्दीनंतर ह्याला दुसरा सर्वात सामान्य रोग मानल्या जाते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कॅव्हिटी (दंतक्षय) चे चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेतः

प्रारंभिक चिन्हांमध्ये खालील समाविष्ट आहेत

 • गरम आणि थंड अन्नाला संवेदनशीलता.
 • चावतांना वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे.
 • दातांचा रंग बदलणे.

उशीरा दिसणाऱ्या लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहेत

 • हिरड्यांवर सूज.
 • सतत असह्य वेदना.
 • रात्रीचा त्रास.
 • विचित्रपणे तुटलेला दात.

कधीकधी, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत आणि आपल्या दंतचिकित्सकाला आपल्या दातात कॅव्हिटी (दंतक्षय) आढळल्याचे आश्चर्य वाटू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

तोंडात उपस्थित असलेल्या बॅक्टेरियामुळे कॅव्हिटी (दंतक्षय) निर्माण होतो, जे सुक्रोज, इतर साखर आणि शुद्ध स्टार्चच्या उपस्थितीत दातांना चिटकते. हे जीवाणू ॲसिड तयार करतात आणि इनॅमल जो दाताचा सर्वात मजबूत थर आहे त्याला झीजवतात.

स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स आणि स्ट्रेप्टोकॉकस सोब्रिनस हे कॅव्हिटी (दंतक्षय) साठी जबाबदार मुख्य बॅक्टेरिया आहेत.

जेव्हा बाळाला झोपेच्या वेळी साखरयुक्त दूध दिले जाते तेव्हा नर्सिंग बॉटल कॅव्हिटी (दंतक्षय) होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • दंतचिकित्सक प्रथम तोंडातील कॅव्हिटी (दंतक्षय) चे परीक्षण करेल, म्हणजे दृश्य आणि स्पर्श तपासणी.
 • आवश्यक असल्यास,दृश्य तपासणीची खात्री करण्यासाठी दंतचिकित्सक रेडियोग्राफ घेऊ शकतात.
 • शेवटी, रुग्णाला जाणवत असलेली लक्षण आणि निष्कर्षांशी संबंध जोडल्यानंतर, दंतचिकित्सक उपचार योजना सूचित करू शकतात.
 • कॅव्हिटी (दंतक्षय )च्या प्रमाणावर अवलंबून, दंतचिकित्सक प्रक्रिया ठरवतात.
 1. प्रारंभिक उपचार - फ्लोरिडेटेड वॉर्निशचा उपयोग इनॅमलच्या रिमिनरीलायझेशनसाठी मदत करू शकतो.
 2. नंतरच्या टप्प्यात दात भरणे किंवा रूट कॅनलिंग उपचाराने पुनर्संचयित करणे आवश्यक आहे आणि दात गंभीरपणे खराब झाले असल्यास दंतचिकित्सक दात काढू शकतात.
 • दातांच्या संसर्गामध्ये जसे की दातावरील फोड आल्यास ताप येऊ शकतो.
 • पण, पौष्टिक आणि कमी प्रमाणात साखरयुक्त आहार घेणे व स्वत:ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

भिन्न निदान

 • सुरुवातीला, डेमिनरिलायझेशन दर्शविणारा पांढरा डाग दातावर विकसित होतो. पण, हे पांढरे डाग कधीकधी निसर्गतः अंतर्भूत असतात आणि या अवस्थेला डेंटल फ्लोरोसिस म्हणून ओळखले जाते.
 • दुखापती मुळे देखील दात खराब होऊ शकतात. म्हणून, दातांचे रंग बदलणे नेहमीच कॅव्हिटी (दंतक्षय) सूचित करीत नाही.
 • चहा आणि कॉफी मुळे खड्डे आणि तड्यासारखे डाग होऊ शकतात. म्हणून, उपचार योजना ठरविण्यापूर्वी एक दंतचिकित्सक पहिले पाहून तपासणी करेल.

उपचारांचा कालावधी उपचारांच्या लांबीनुसार बदलू शकतो. अलीकडील तांत्रिक प्रगतीसह, एकदाच बसून उपचार योजना देखील शक्य आहे. दंतोपचाराने क्वचितच त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा, वेदनाहीन अनुभव देण्यासाठी स्थानिक ॲनेस्थेसिया/भूल देऊन उपचार केले जातात. फ्लोराइड जेल वापरून किंवा फिलींग वापरून दात भरून कॅव्हिटी (दंतक्षय) चा उपचार केला जाऊ शकतो. जर ते खोल असेल तर ते स्वच्छ केले जाऊ शकते आणि दात कॅव्हरने झाकले जाऊ शकतात. ते गंभीर असल्यास, खराब झालेले दात काढणे आवश्यक असते.

कॅव्हिटी (दंतक्षय) टाळण्यासाठी घरगुती उपचार

 • दररोज दोनदा दात घासावेत.
 • फ्लोरिडेटेड टूथपेस्टचा वापर करावा.
 • दातांची नियमित तपासणी करावी.
 • माऊथवॉशचा वापर करावा.
 • दोन जेवणा दरम्यान खाणे कमी करावे.संदर्भ

 1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Tooth decay
 2. Yoon Lee. Diagnosis and Prevention Strategies for Dental Caries. J Lifestyle Med. 2013 Sep; 3(2): 107–109. PMID: 26064846
 3. Cologne, Germany [Internet]: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG). Tooth decay; 2006-.2006 Mar 17 [Updated 2017 Sep 21].
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tooth Decay
 5. National Health Portal [Internet] India; Oral Health

कॅव्हिटी (दंतक्षय) साठी औषधे

Medicines listed below are available for कॅव्हिटी (दंतक्षय). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.