नैराश्य - Depression in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

January 26, 2019

March 06, 2020

नैराश्य
नैराश्य

सारांश

अवसाद जगभरातील सर्वसाधारण आरोग्यसमस्यांपैकी एक आहे. प्राचीन काळात अवसाद मेलिंकॉलिआ म्हणून ओळखली जात असे आणि ती एक सर्वज्ञात मानसिक आरोग्यसमस्या नव्हती. गेल्या काही दशकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे आजाराबद्दल जागरुकताही. अलीकडच्या काळात नैराश्याला फक्त प्रौढांनाच नव्हे,तर मुलांवरही परिणाम होतो. अवसादाचे प्रमाण वाढत असल्यामुळे या अवस्थेचे निदान व उपचार लवकरात लवकर करणें अगदी महत्त्वाचे झाले आहे.

वैद्यकीय दृष्टीने, अवसादाला मूडची समस्या मानले गेले आहे. अवसादाच्या लक्षणांमध्ये नकारात्मक विचार, समाजापासूम माघार आणि सतत दुःख यांचा समावेश आहे. अवसादाचे वर्गीकरण प्रसूतीपूर्व अवसाद (शिशुजन्मानंतरचे), डिस्थिमिया (स्थायी सौम्य अवसाद), हंगामी प्रभावी समस्या, आणि दुहेरी व्यक्तीमत्त्व याप्रकारे केले गेले आहे. वैद्यकीदृष्ट्या, अवसादात चार टप्पे असतात. विकार वाढल्याबरोबर रुग्णाच्या प्रभावीपणे कार्य करण्याच्या क्षमतेला बंधने येतात. अशा परिस्थितीत अनेक हस्तक्षेप पद्धती मदतीच्या असतात. मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञाकडून दर्जेदार साहाय्य मिळवणें हे अवसादासाठी अतिशय योग्य ठरते. अनेक स्व-काळजी बाबीही प्रभावी धोरण म्हणून कार्य करतात. मानसिक आरोग्य समस्यांबरोबर लक्षणीय  सामाजिक नकोशीही असल्याने, अवसाद असलेली व्यक्ती समस्येचे निराकरण व्यावसायिक साहाय्याशिवाय करवून घेणें खूप अवघड आहे. अवसादावरील वाढत्या जागरूकतामुळे लोकांनी त्याच्याशी एकट्याने झगडत राहण्याऐवजी कोणत्याही संकोचाविना पुढे येण्यास प्रोत्साहित केले जाईल.

नैराश्य ची लक्षणे - Symptoms of Depression in Marathi

अवसादाची विविध लक्षणे आहेत,जी इतरांना किंवा स्वतःलाही ओळखू येतात. तथापी, यापैकी काही लक्षणे उपस्थिती अवसादाच्या अस्तित्वाची पुष्टी करत नाहीत. हे लक्षणे भिन्न लोकांमध्ये वेगळ्या तीव्रतेची असू शकतात.

वर्तनातील लक्षणे:

  • छंदांमध्ये रस कमी होणें.
  • दैनंदिन जीवनाच्या कामांमध्ये मन न लागणें.
  • जवळच्या कुटुंबीयांशीही संवाद कमी होणें.
  • लक्ष केंद्रित करताना अडचण.
  • सतत विचलित होणे किंवा स्थिर राहणे किंवा कार्य पूर्ण करणे अशक्य होणें.
  • एकलकोंडेपण्याला प्राधान्य देणें.
  • काहीही आठवण्यास अडचण.
  • झोपी जाण्यात अडचण. (अधिक वाचा - अनिद्रेवरील उपचार)
  • अत्यधिक झोपणें.

शारीरिक लक्षणेः

  • कमी ऊर्जा.
  • सतत थकवा.
  • कमी बोलणें किंवा अत्यधिक हळू बोलणें.
  • भूक कमी होणें.
  • अत्यधिक झोपणें.
  • अचानक वजन कमी होणे (हे खाण्याच्या विकृतीचेही सूचक असू शकते).
  • डोकेदुखी.
  • स्पष्ट शारीरिक कारणाशिवाय पचनाच्या समस्या.
  • आकड्या किंवा अंगदुखी (अधिक वाचा – स्नायूंच्या आकड्या)

मानसिक लक्षणे:

  • सतत निराशा.
  • अत्यधिक दोषी वाटणें.
  • काळजी.
  • निराश किंवा अनुपयोगी वाटणे.
  • आत्महत्या किंवा स्वत:ला इजा पोचवण्याचा विचार येणें.
  • त्रस्त किंवा उत्तेजित वाटणें.
  • आनंददायी उपक्रमांमध्ये स्वारस्य कमी करणे.

नैराश्य चा उपचार - Treatment of Depression in Marathi

अवसादाच्या अनुभवत असलेल्या तीव्रतेच्या आधारे, खालील वेगवेगळ्या उपचारांचा क्रम केला जाऊ शकतो.

सौम्य अवसाद

सौम्य किंवा प्रारंभिक अवस्थेतील नैराश्यात व्यवस्थापन समाविष्ट आहे:

  • व्यायाम
    अवसादाच्या लक्षणांमध्ये सुधारणा करण्यासाठी नियमित व्यायाम खूप उपयोगी होऊ शकते. दैनिक व्यायाम केवळ मूड सुधारत नाही तर एक व्यक्ती सक्रिय राहण्यासही मदत करतो. सौम्य ते मध्यम अवसादाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे खूपच उपयोगी ठरते. चिकित्सक दररोज 30 मिनिट ते एक तास दररोज व्यायाम करण्याची शिफारस करू शकतात, ज्या आठवड्यात कमीतकमी तीन वेळा केले पाहिजे. वृद्ध लोकांसाठी 15 मिनिटे संध्याकाळी चालणे उपयुक्त ठरू शकते.
  • स्व-काळजी
    सौम्य अवसादाशी विशेषत:जीवनातील एखाद्या शोकप्रसंगाचे संबंध असल्यास,  सल्लागार स्वत: ची काळजी घेणयची शिफारस करु शकतात. स्वकाळजी मदत उपचाराचा एक भाग असल्याने एखाद्या व्यक्तीला एकटे नसल्याने, त्याच्या भावना आणि विचारांबद्दल त्याला अधिक बरे वाटू शकते.

सौम्य ते मध्यम अवसाद

जर अवसाद मध्यम असेल, तर विविध प्रकारच्या उपचारांची शिफारस केली जाते. संज्ञानात्मक वर्तणूक उपचार व्यक्तीच्या विचारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि व्यक्तीच्या विचारसरणीत बदल करण्यास आणि त्यांना अधिक सकारात्मक आणि आशावादी असण्यास मदत करण्यास प्रोत्साहित करते. समुपदेश हा मध्यम अवसादावर उपचार करण्याचाच एक मार्ग आहे. प्रत्येक समुपदेशन सत्र भावनात्मक उभारीसाठी एक माध्यम म्हणून कार्य करू शकतो,जे अवसाद हाताळण्यात रुग्णाला मोठ्या प्रमाणात मदत करू शकेल.

मध्यम ते गंभीर अवसाद

मध्यम ते गंभीर अवसादासाठी, उपचारांचे विविध क्रम आहेत जे उपयोगी होऊ शकतात, उदाः

  • एंटिडेप्रेसेंट
    एंटिडेप्रेसेंट औषधे  सामान्यतः गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतात. ही औषधे न केवळ चिंता कमी करतात, तर त्या व्यक्तीला आनंदी होण्यासाठी देखील मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारचे एंटिडेप्रेसेंट उपलब्ध आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे अवसाद हाताळतात. अवसाद असलेल्या लोकांच्या अनुभवाप्रमाणें, ही औषध खूप उपयोगी आहेत आणि त्वरित परिणाम देतात. तथापी, या औषधांचे काही दुष्परिणाम असू शकतात. यात बद्धकोष्ठता, चक्कर येणे, मळमळ, अस्वस्थता आणि त्वचेच्या खाजेचे समावेश असते. एंटिडेप्रेसेंटशी संबंधित प्रमुख सहप्रभाव म्हणजे माघाराची लक्षणे. जेव्हा एखादी व्यक्ती औषधे घेणें थांबवते, तेव्हा ही लक्षणे उद्भवू शकतात.
  • प्रतिक्रियात्मक उपचार
    सौम्य ते मध्यम अवसाद असलेल्या लोकांमध्ये संयोजन उपचार हे सर्वात उपयोगी उपचार ठरले आहे. ही पद्धत कॉग्निटिव्ह व्हर्वेट थेरेपी (सीबीटी) सह एंटिडेप्रेसेंट औषधोपचारांचा वापर करते.
  • मानसोपचार
    तीव्र अवसादाच्या बाबतीत, मनोवैज्ञानिक, मनोचिकित्सक आणि व्यावसायिक चिकित्सक असलेल्या मानसिक आरोग्यगटाचे साहाय्य घेतले जाते. याद्वारे औषधोपचार, विविध उपचारांवर चर्चा आणि कार्यक्षमतेने पुरेपूर काळजी घेण्यात मदत होते. मानसिक विकृतीसह गंभीर धोका असलेल्या लोकांना, ईसीटी (इलेक्ट्रोकोनव्हलसिव्ह थेरेपी) आणि मेंदू उत्तेजित करण्याच्या तंत्रज्ञानाची शिफारस केली जाऊ शकते.

अवसादासाठी व्यावसायिक मदत घेताना लक्षात ठेवण्यासाठी काही इतर महत्वाच्या गोष्टी आहेत:

  • थेरपिस्ट किंवा सल्लागाराशी सामायिक केलेली माहिती गोपनीय राहते. आपण सल्लागारांना  न घाबरता  वैयक्तिक माहिती सांगू शकतो आणि कोणत्याही इतर व्यक्तीशी सामायिक केली जात नाही.
  • व्यावसायिक मदत मिळविण्यासाठी संमती एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीस त्यांच्या संमतीविना कोणत्याही औषधे दिली जाऊ शकत नाही. मानसिक विकृतीच्या प्रकरणांमध्ये अपवाद असू शकतो.
  • मदत मिळवणा-या व्यक्तीचे कुटुंबीय बरे होण्यास मदत करू शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

जेव्हा एखादी व्यक्ती अवसाद आणि उपचारांच्या प्रक्रियेस सामोरे जात असेल, तेव्हा बर्र्याच कृती उपचार प्रक्रियेत मदत करू शकतात. शारीरिक आरोग्य रोगाच्या बाबतीत, औषधांचा वापर बर्याच काळापासून सुरू राहू शकतो, औषधोपचारांवर औषधावर अवलंबून राहणे चांगले मानले जात नाही.

कोणत्याही प्रकारचे उपचार व्यक्तीस समस्या आणि वर्तनाबद्दल स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने असतात. अवसादाला सकारात्मक प्रकारे सामना करण्यासाठी बरेच टप्पे आहेत:

  • स्वत: ला वेगळे करू नका.
  • उपचारातील प्रगतीबद्दल मित्रांशी आणि जवळच्या कौटुंबिक सदस्यांशी बोला.
  • चिकित्सकाशी प्रामाणिक रहा.
  • बरे करण्यासाठी स्वत: ला वेळ द्या.
  • छंद आणि व्यायाम यासारख्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा.
  • आपले अवसाद कलंक म्हणून पाहू नका.
  • प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. त्यांच्यातील साखर औषधामध्ये बाधा आणू शकते आणि आपल्या मनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते.
  • स्वत: च्या विचारांचे निरीक्षण करून पहा.
  • सर्वांसोबत आपले विचार व्यक्त करा.
  • आपल्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी  मद्य किंवा मादक पदार्थांचा अवलंब करू नका कारण हे उपचार नकारात्मक परिणाम करतील आणि शेवटी आपली परिस्थिती बिघडेल.
Badam Rogan Oil
₹539  ₹599  9% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. American Psychiatric Association [Internet] Washington, DC; Depression
  2. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Depression. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
  3. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Depression. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
  4. National Health Service [Internet]. UK; Depression

नैराश्य साठी औषधे

Medicines listed below are available for नैराश्य. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.