डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस - Dermatitis Herpetiformis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

December 01, 2018

March 06, 2020

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस काय आहे?

डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस (डीएच) हा त्वचेवर रॅश सह येणारा फोड असतो, जो ग्लूटेन पोटात गेल्यामुळे होतो. याला दहरिंग रोग म्हणून देखील ओळखले जाते आणि आतड्याच्या बाहेरील सेलिआक रोगा चा प्रादुर्भाव असतो. ही एक ऑटोम्युन्यून स्थिती आहे आणि डीएच असलेल्या बऱ्याच व्यक्तींमध्ये ग्लूटेन-सेन्सेटिव्ह एन्टेरोपॅथी असते. सेलिआक रोग असणा-याला डीएच पूर्वस्थितीत असतो. भारताच्या उत्तरेकडील भागात इतर भागपेक्षा हा रोग जास्त सामान्य आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

समाविष्ट लक्षणे:

 • शरीराच्या दोन्ही बाजूंना टेंगूळ किंवा फोड येणे.
 • लहान पुळ्यांचा गुच्छ.
 • दाताच्या इनॅमलचे विकाय.

डीएच प्रामुख्याने खालील गटांच्या लोकांवर परिणाम करते:

 • 15-40 वर्षे वयोगटातील श्वेतवर्णीय.
 • बहुतेक पुरुषांना प्रभावित करते.
 • 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिला.
 • ज्यांना अनुवांशिकपणे रोगाची लागण झाली आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डीएचचे मुख्य कारण त्वचेच्या टिश्यूंमध्ये असलेला इम्युनोग्लोबुलिन 'A' चा संग्रह होय, ज्यामुळे व्रण तयार होतात. डीएच असलेल्यांना हायपोथायरॉईडीझम होण्याची शक्यता असते. कॉम्प्लिकेशनमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डीएच मुख्यतः निदान खालीलप्रकारे केले जाते:

 • त्वचेची बायोप्सी.
 • पौष्टिक कमतरतेची स्क्रीनिंग.
 • रक्त तपासणी.
 • लहान आतड्याची बायोप्सी.

रुग्णाच्या सहनशीलतेवर आधारित डीएचचा सल्फोन किंवा सल्फा औषधांद्वारे उपचार केला जातो. काही स्टिरॉइड्स वापरण्याची देखील आवश्यकता भासू शकते.

स्वत:ची काळजी घेण्यासाठी टिप्सः

 • ग्लूटेन-युक्त अन्न टाळावे.
 • रोगाची वाढ आणि ड्रग्सच्या प्रभावीपणाची तपासणी करण्यासाठी आपल्या डॉक्टरांकडून वरचेवर तपासणी करावी.
 • खाद्यान्न उत्पादनांची लेबल वाचावी आणि ते ग्लूटेन मुक्त असल्याचे सुनिश्चित करावे.
 • मांस, दुग्धजन्य पदार्थ, फळे, आणि भाज्यांसारख्या पदार्थांचा खाण्यात समावेश करावा.
 • अन्नधान्य, द्राक्षे, शेंगा, बिया आणि कंद इतर सुरक्षित पर्याय आहेत.

डीएच ही ग्लूटेन-प्रेरित स्थिती आहे, जिच्यावर ग्लूटेन टाळून प्रतिबंध आणि उपचार केला जाऊ शकतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ग्लूटेनमुक्त आहार घेवून त्यांच्या स्थितीत सुधारणा आल्याचे दिसून येते. त्यामुळे, डीएच व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत योग्य बदल घडवून आणला पाहिजे.संदर्भ

 1. Emiliano Antiga, Marzia Caproni. The diagnosis and treatment of dermatitis herpetiformis. Clin Cosmet Investig Dermatol. 2015; 8: 257–265. PMID: 25999753
 2. Gluten Intolerance Group. DERMATITIS HERPETIFORMIS. [Internet]
 3. Association Management Software. DERMATITIS HERPETIFORMIS. Kirksville, Missouri; [Internet]
 4. National Organization for Rare Disorders. Dermatitis Herpetiformis. National Organisation for Rare Disorder; [Internet]
 5. Amanda Oakley. DermNet New Zealand. Dermatitis herpetiformis. United Kingdom, February 2016.

डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस साठी औषधे

डर्मटायटिस हर्पेटिफॉर्मिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹26.08

20% छूट + 5% कैशबैक


₹0.0

20% छूट + 5% कैशबैक


₹245.63

20% छूट + 5% कैशबैक


₹84.0

20% छूट + 5% कैशबैक


₹79.1

20% छूट + 5% कैशबैक


₹65.0

20% छूट + 5% कैशबैक


₹12.84

20% छूट + 5% कैशबैक


₹55.53

20% छूट + 5% कैशबैक


₹13.1

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 125 entries