myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

डायपर रॅश म्हणजे काय?

डायपर रॅश, ज्याला डायपर डर्माटीटीस, असेही म्हणतात, म्हणजे बाळाच्या पार्श्वभागाच्या त्वचेवर लाल चट्टे येणे. डायपरचा वापर, स्वच्छता,  टॉयलेट प्रशिक्षण आणि मुलांचे संगोपन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे  जगभरतील या बद्दलच्या अहवालात फरक दिसून येतो. नवजात शिशूंमध्ये, याचे प्रमाण 7-35% आहे. जन्मानंतर एका आठवड्यातच हे होऊ शकते, पण जास्तीत जास्त संभावना 9-12 महिन्यात असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची मुख्य लक्षणं अशी आहेत:

 • त्वचा लाल दिसू शकते, मांड्या, ढुंगण किंवा जननेंद्रिय कोमल वाटू शकतात.
 • बाळं रडतो आणि अस्वस्थ होतो, डायपर ची जागा धुतांना चिडचिड करतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डायपर रॅश हे सामान्यतः डायपर चा योग्य वापर केल्याने होते. जसे की ,ओले डायपर खूप वेळ वापरणे किंवा डायपर वारंवार न बदलणे. अशा सवयींनमुळे त्वचा संवेदनशील होते. काही सामान्य कारणं अशी आहेत:

 • त्वचेवर डायपरचा खूप वेळ स्पर्श होत राहणे: ह्यामुळे बाळाची चिडचिड होते.
 • संसर्ग: जर खूप वेळ लघवी डायपरमध्ये राहून त्यात शोषली गेली, तर त्वचेचा पीएच वाढतो,ज्यामुळे बॅक्टरीया ची वाढ होते.
 • ॲलर्जी: काही डायपरचे साहित्य बाळाच्या त्वचेला संवेदनशील करतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

याचे निदान लाल चट्टे बघून आणि बाळाचे एकंदरीत वागणे बघून केले जाते. यासाठी काही विशेष चाचण्या आवश्यक नाही आणि याचे उपचार घरच्या घरीच केले जातात.

उपचार असे आहेत:

 • सौम्य स्टिरॉइडल क्रीम चा वापर.
  • अँटी-फंगल क्रीम.
  • टॉपिकल अँटिबायोटिक्स.
 • स्वतः काळजी घेण्यासाठी टिप्स:
  • डायपर ची जागा स्वच्छ, कोरडी ठेववी आणि हळू साफ करावी.
  • कपड्याचे डायपर ब्लिच मध्ये धुवावे किंवा पाण्यात 15 मिनिट उकळावे.
  • कपडे  धुण्याची पावडर पूर्णपणे निघावी म्हणून कपडे खळखळून धुवावे.
  • डायपरच्या जागेला हवा लागावी या करीत बाळाला काही वेळ डायपर शिवाय ठेवावे.
  • जिथे लाल चट्टे आले आहेत तिथे लोशन किंवा क्रीम लावावे.
  • सॅलिसायलेट्स, बेंझोइकसिड,कापूर, बोरिक सिड आणि फिनॉल असलेले उत्पादने वापरणे टाळावे.
  • बाळाला रोज कोमट पाण्याने आणि सुगंध रहित साबणाने आंघोळ घालावी.

डायपर रॅशचा उपचार करता येतो आणि व्यवस्थित काळजी घेतली तर ती लवकर बरी होते. पण, अधिक कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी योग्य स्वच्छता आणि साफसुधरेपणा ठेवणे आवश्यक आहे.

 1. डायपर रॅश साठी औषधे

डायपर रॅश साठी औषधे

डायपर रॅश के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
RashcareRashcare Cream25.0
Sunheal PureSunheal Pure Cream495.0
SufrateSufrate Cream50.0
AnomexAnomex Suppository54.0
CorectCorect Suppository66.0
PileumPileum Suppository60.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...