myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

इसोफेगल एट्रेसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला काय आहे?

हा इसोफेगसचा विकार आहे. इसोफेगस एक लांब ट्यूब आहे जी तोंडाला आणि पोटाला जोडते. इसोफेगल एट्रेसिया (ईए-EA) हा एक जन्मजात विकार आहे ज्यामध्ये इसोफेगल ट्यूबच्या विकासात व्यत्यय येतो आणि इसोफेगस दोन भागांमध्ये विभागला जातो. सामान्यतः, याची विभागणी एक तोंडाला जोडलेली वरची ट्यूब आणि इसोफेगसला जोडलेली खालची ट्यूब अशी होते.या वेगळ्या ट्यूब त्यांच्या टोकावर सीलबंद असतात जिथे त्या दोघांमधील जोड तुटतो ज्यामुळे वरील इसोफेगस ट्यूब मध्ये, जी खालच्या बाजूने बंद केलेलीअसते, लाळ जमा होण्यासारखी लक्षणे दिसून येतात

ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला (टीएफ-TF) सहसा नवजात बाळांमध्ये ईए (EA) सोबत दिसून येतो. टीएफ (TF) हा श्वसन नलिके सोबत (ट्रॅकी) इसोफेगसच्या असामान्य जोडणीचा दोष आहे. ट्रॅची (श्वासनलिका) ही सामान्यपणे इसोफेगसच्या खालच्या भागाशी जोडलेली असते, पण जोडणी वरच्या भागास किंवा इसोफेगसच्या दोन्ही भागांमध्ये आढळू शकते. ईए (EA) नसेल तरी देखील टीएफ (TF) होऊ शकते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जरी एखाद्या नवजात बाळापासून दुस-या बाळामध्ये लक्षणे वेगवेगळी असली, तरी ईए (EA) आणि टीएफचे (TF) सर्वसाधारणपणे दिसणारी चिन्हे आहेत:

 • खोकला येणे आणि अन्न खाऊ घालण्याचा प्रयत्न  केल्यास गळ्यात अडकणे.
 • जेवण भरवण्याचा प्रयत्न केला तर सायनोसिसमुळे त्वचा निळी होणे.
 • तोंडातून अनियंत्रित लाळ पडत राहणे.
 • वजन न वाढणे.
 • उलट्या.
 • असामान्य गोल पोट.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या परिस्थितीचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील जन्म दोष सामान्यतः ईए (EA) आणि टीएफशी (TF) संबंधित असतात:

 • व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट सारखे हृदय दोष.
 • पॉलिसीस्टिक किडनीसारखे मूत्रमार्गाचे दोष.
 • ट्रायसोमी 13, 18 किंवा 21.
 • मस्क्यूलोस्केलेटल विकार.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

छाती आणि पोटाचे एक्स-रे ह्या दोन्ही दोषांचे योग्य निदान करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत.

दोन्ही जन्म दोषांसाठी उपचार शस्त्रक्रिया आहे. बाळास भविष्यात इसोफॅगेल समस्या उद्भवू शकते, उदा., वण आलेले ऊतक (स्कार टिशू), ज्यासाठी बाळ मोठे झाल्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागते. इतर संबंधित समस्या ज्या बाळांमध्ये उद्भवू शकतात त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांनी नियंत्रित केल्या जाऊ शकतात.

 1. इसोफेगल एट्रेसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला साठी औषधे

इसोफेगल एट्रेसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला साठी औषधे

इसोफेगल एट्रेसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
GenotropinGenotropin 16 Iu Injection13866.7
HeadonHeadon 4 Iu Injection3200.18
HumatropeHumatrope 18 Iu Injection7838.0
SomastatSomastat 250 Mcg Injection570.0
SomastinSomastin 250 Mcg Injection343.75
SomatexSomatex 3 Mg Injection1698.42
SomatinSomatin 250 Mcg Injection495.0
ZomatorZomator 0.25 Mg Injection500.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...