myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत


इविंग सारकोमा काय आहे?

इविंग सारकोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो प्रामुख्याने हाडांना प्रभावित करतो. ऑस्टियोसारकोमा नंतर हा सर्वात सामान्यपणे उद्भवणारा हाडांचा कर्करोग आहे. बहुतांश लहान आणि किशोरवयीन मुले या रोगाने बाधित होतात. अमेरिकेत, प्रत्येक दशलक्ष व्यक्तिमागे 1 या प्रमाणात ह्या घटना बघायला मिळतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वेदना आणि द्रव संचय ही मुख्य लक्षणे आहेत.तसेच हाडांच्या फ्रॅक्चर ची शक्यता देखील असते. इतर लक्षणे खालील प्रमाणे आहेतः

 • कारणाशिवाय वाढलेले शरीराचे तापमान.
 • थकल्यासारखे वाटणे.
 • त्वचेखाली नोड्यूल किंवा गळकुंड, विशेषत: काख, हातपाय, छाती किंवा पोटाच्या भागात (पेल्व्हिक चा भाग).

याची मुख्य कारणं काय आहेत?

वास्तविक कारण अज्ञात आहे; पण, ते अनुवांशिकरित्या प्रसारित होते. हा एक अधिग्रहित आनुवांशिक दोष आहे. यात समाविष्ट असलेल्या दोन जीन्समध्ये या आहेत:

 •  22 व्या क्रमांकाच्या गूणसूत्रावर किंवा क्रोमोझोमवर  इडब्ल्यूएसआर1 (EWSR1).
 •  11व्या क्रमांकाच्या गुणसूत्रावर एफएलआय1 (FLI1).

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान पद्धतीत मुख्यतः हे समाविष्ट आहेत:

 • रुग्णाची पूर्णपणे तपासणी करणे आणि वैद्यकीय इतिहास घेणे.
 • इमेजिंग.
  • एमआरआय स्कॅन.
  • सीटी स्कॅन.
 • पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन.
 • अस्थिमज्जा:
  • अ‍ॅस्पिरेशन.
  • बायोप्सी.
 • सीरीअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन,एरिथ्रोसाइट सेडीमेंटेशन रेट यासारख्या रक्त चाचण्या करणे.

उपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत:

 • केमोथेरपी.
 • रेडिएशन थेरेपी.
 • शस्त्रक्रिया.

जर कर्करोगाची बर्याचदा पुनरावृत्ती होत असेल तर स्टेम सेल थेरपीचा वापर करणे सुचवले जाते.  इतर उपचारांमध्ये हे समाविष्ट असू शकतात:

 • मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा उपयोग.
 • अँटीजन-लक्षित इम्यूनोथेरपी.

जगण्याचा दर हा कर्करोगाच्या स्टेजवर अवलंबून असतो. इतर घटक जसे, ट्युमर चा आकार, लॅक्टेट डिहायड्रोजनेज (एलडीएच-LDH) पातळी, उपचारांवरील सहनशीलता आणि वय 10 वर्षांपेक्षा कमी असण्यावर अवलंबून असते.

उपचार व्यवस्थापित करण्यासाठी वेळापत्रकाचे पालन करणे सर्वोत्तम आहे.प्राथमिक उपचाराच्या टप्प्याचे मूल्यांकन करण्यासाठी 2 ते 3 महिन्यात सर्व चाचण्या परत करण्याचे सांगण्यात येऊ शकते. हे ट्युमर बऱ्याच वर्षांनंतर परत येऊ शकतात.

रुग्णाला भावनिक आधार देणे महत्वाचे आहे.

 1. इविंग सारकोमा साठी औषधे

इविंग सारकोमा साठी औषधे

इविंग सारकोमा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
IfomidmIfomid M 2 G Injection (1+3)775.0
Ipamide With MesnaIpamide With Mesna Injection408.1
Ifex MIfex M Injection359.25
Ifoxan + MesnaIfoxan + Mesna 200 Mg/1000 Mg Injection570.75
ActinocinActinocin 0.5 Mg Injection412.5
CosmegenCosmegen 500 Mcg Injection90.58
DacilonDacilon 0.5 Mg Injection445.0
CelofosCelofos 1000 Mg Injection414.28
HoloxanHoloxan 1 Gm Injection500.35
IfoparIfopar 1000 Mg Injection470.0
IpamideIpamide 2 Gm Injection687.35
IsoxanIsoxan 1 Gm Injection425.0
Soloxan With MesnaSoloxan With Mesna 2 Gm Injection678.98

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...