डोळ्यामध्ये अ‍ॅलर्जी - Eye Allergies in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

December 08, 2018

July 31, 2020

डोळ्यामध्ये अ‍ॅलर्जी
डोळ्यामध्ये अ‍ॅलर्जी

डोळ्यांमध्ये अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

धूळ, परागकण, बुरशी यासारख्या ॲलर्जीक घटकांमुळे होणाऱ्या इंफ्लमेशनमुळे डोळ्यांना सूज आणि लालसरपणा येतो. याला ॲलरजन्स असे म्हणतात. डोळ्यांमधील ॲलर्जीला इतरही काही गोष्टी कारणीभूत असतात जसे की दमा, हे फिव्हर, ॲलर्जिक स्किन (जसे की गजकर्ण इ.). डोळयांमधील ॲलर्जी लहान मुले तसेच तरुणांमध्ये जास्त दिसून येते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ॲलरजन्सच्या संपर्कात आल्यामुळे रक्तात हिस्टामाईन नावाचे रासायनिक द्रव्य सोडले जाते ज्यामुळे डोळ्यांमध्ये ॲलर्जी होते. ह्याची लक्षणे बरेच दिवस टिकतात किंवा हवामानातील बदलांमुळे परत परत होऊ शकतात आणि ते असंसर्गजन्य असतात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

डोळे ॲलरजन्सच्या संपर्कात आल्यास त्या ॲलरजन्सना शरीराबाहेर काढण्यासाठी शरीर इम्युन रिअ‍ॅक्शन देते. ॲलरजन्स अनेक प्रकारचे असतात:

  • धूळ.
  • परागकण.
  • हवेतील प्रदूषण, धूर इत्यादी.
  • पाळीव प्राण्यांचे केस, डॅन्डर इत्यादी.
  • बुरशी.
  • तीव्र वासाचे परफ्यूम्स, रंग इत्यादी.
  • फूड प्रीजर्व्हेटिव्हज.
  • कीटक दंश.
  • दुर्मिळ केसेसमध्ये, काही वेळेस गंभीर प्रकारच्या डोळ्यामधील ॲलर्जीमुळे दृष्टी जाऊ शकते. ह्याला व्हर्नल कंजंक्टिवायटीस असे म्हणतात, हे मुलांमध्ये दिसून येते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

खाली दिलेल्या पर्यायांच्या आधाराने डॉक्टर्स डोळ्यामधील ॲलर्जीचे निदान करतात:

  • लक्षणे कधीपासून दिसू लागली आहेत ते लक्षात घेतले जाते.
  • स्लीट लॅम्पच्या मदतीने डोळे तपासले जातात.
  • रक्तातील IgE ची पातळी तपासली जाते.
  • त्वचेची ॲलर्जी टेस्ट केली जाते.
  • डोळ्यात जमणार्‍या चिपडामध्ये पांढर्‍या पेशी आहेत का हे शोधण्यासाठी त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.

डोळ्यामधील ॲलर्जीचे उपचार पुढीलप्रमाणे आहेत:

  • स्वत: करता येण्यासारखे उपाय
    • ॲलरजन्सपासून शक्यतो लांब रहावे.
    • डोळे चोळू नयेत.
    • डोळे लालसर झाल्यास किंवा डोळ्याला खाज येत असेल तर कॉनटॅक्ट लेंसेस वापरू नयेत.
    • परागाकणांपासून बचाव करण्यासाठी वारा सुटला असताना डोळ्यांवर सनग्लासेस वापरावेत.
    • दमटपणामुळे बुरशीची वाढ होण्यास मदत होते यामुळे घरात दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
    • शक्यतो प्रदूषण, धूळ, धूर यापासून लांब राहावे.
    • माइट्समुळे डोळ्यामधे ॲलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे अंथरूण पांघरूणे स्वच्छ ठेवावीत.
    • पाळीव प्राण्यांच्या फार जवळ जाऊ नये.
    • ॲलर्जीक रिअ‍ॅक्शन झाली आहे असे वाटल्यास त्वरित डोळे धुवावेत ज्यामुळे ॲलरजन्स निघून जातात.
  • डोळ्यामधील ॲलर्जीसाठी डॉक्टरांकडून सर्वसाधारणपणे सुचवली जाणारी औषधे:
    • टॅब्लेट स्वरुपातील अँटी हिस्टामाईन्स आणि डोळ्यात घालण्याच्या ड्रॉप्समुळे डोळ्याची खाज आणि चुरचुर कमी होते.
    • डोळ्यातील ॲलर्जीमध्ये होणारा दाह कमी करण्यासाठी मास्ट सेल स्टॅबिलायजर्ससारखी औषधे वापरली जातात.
    • डोळ्याची सूज आणि लालसर पणा कमी करण्यासाठी डिकंजेस्टंट आय ड्रॉप्स वापरले जातात.
    • कृत्रिम टियर आय ड्रॉप्समुळे डोळे ओलसर राहण्यास आणि डोळ्यातील ॲलरजन्स निघून जाण्यास मदत होते.
    • कॉर्टिकोस्टेरोइड आय ड्रॉप्समुळे तीव्र स्वरूपाचा दाह कमी होण्यास मदत होते.
    • इम्युनोथेरपी इंजेक्शन्समुळे एखाद्या विशिष्ट ॲलरजन्सच्या विरुद्ध इम्युनिटी वाढण्यास आणि त्यामुळे ॲलर्जी टाळण्यास मदत होते.



संदर्भ

  1. British Medical Journal. Allergic eye disease. BMJ Publishing Group. [internet].
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Allergic conjunctivitis
  3. American academy of ophthalmology. What Are Eye Allergies?. California, United States. [internet].
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Conjunctivitis (Pink Eye)
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vernal conjunctivitis

डोळ्यामध्ये अ‍ॅलर्जी साठी औषधे

Medicines listed below are available for डोळ्यामध्ये अ‍ॅलर्जी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.