फ्रॅक्चर्ड बोट - Fractured Finger in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

फ्रॅक्चर्ड बोट
फ्रॅक्चर्ड बोट

फ्रॅक्चर्ड बोट म्हणजे काय?

फ्रॅक्चर्ड बोट हे फलांजेस मधील (बोटांच्या हाडांमधील) जखम असते. ही अगदी सामान्यपणे होणारी खेळातील जखम असून ती एखाद्याचे दिवसाचे नियोजन व कामे बिघडवू शकते. वेळीच इलाज न केल्यास त्याचे परिणाम दिसून येतात.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

फ्रॅक्चर्ड बोट ची सामान्य लक्षणे व कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • जखमेच्या जागी लालपणा, जळजळ व सूज येणे.
  • दुखणे.
  • स्पर्श केल्यावर दुखणे.
  • आकार बदल.
  • बोट हलवताना त्रास होणे.
  • फ्रॅक्चर च्या ठिकाणी रक्त साकळणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

फ्रॅक्चर्ड बोट होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • खेळामध्ये झालेली जखम हे फ्रॅक्चर्ड बोट होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
  • दैनंदिन जीवनात देखील जसे दार लावताना किंवा होते भिंतीवर आपटल्यास फ्रॅक्चर्ड बोट होऊ शकते.
  • अवजड यंत्रांवर काम करताना, करवत चालवताना किंवा ड्रीलींग मशीन वर काम करताना फ्रॅक्चर्ड बोट होऊ शकतात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

फ्रॅक्चर्ड बोट चे निदान करताना खालील गोष्टी केल्या जातात:

  • जखमेसंबंधीत काळजीपूर्वक घेतलेला वैद्यकीय इतिहास,ज्यात जखमेचा प्रकार, वेळ, लक्षणे व आधीच्या जखमेचा इतिहास डॉक्टर कडून घेतला जातो.
  • शारीरिक चाचणीमध्ये फ्रॅक्चर ची जागा, तुटलेल्या हाडांची संख्या व बोटाच्या हालचाली विचारात घेतल्या जातात.
  • सांध्यांची स्थिरता व जागा विचारात घेतली जाते.
  • निरीक्षणामध्ये हाताच्या तळव्याची व बोटांची एक्स-रे चाचणी अंटरोपोस्टेरिअर, लॅटरल व ऑब्लिक व्ह्यू मधून घेतली जाते.

स्थितीचे उपचार खालीलप्रमाणे:

  • फ्रॅक्चर्ड बोट झाल्याच्या उपचारांमध्ये फ्रॅक्चर फ्रागमेंट्स बोटाबरोबर त्याच्या आकारानुसार जोडली जातात व ते बोट इतर बोटांना तात्पुरते जोडले जाते जेणेकरून त्याला लवकर आराम मिळावा व ताण, दुखणे कमी व्हावे. बोटाला किती आधार देण्याची गरज आहे, ते डॉक्टर जखम पाहून मग ठरवतात.
  • बोटाच्या हालचाली पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला दिला जातो.
  • उपचार हे सामान्यपणे 3 आठवड्यांसाठी दिले जातात व त्यात ॲनालजेसिक्स व थंड दाब यांचा समावेश असतो.
  • तीव्र स्थितींमध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते. जागेवरील फ्रॅक्चर धरुन ठेवण्यासाठी काही साधन लागू शकतात. या मध्ये जैविक साम्य असलेल्या पिन, स्क्रु चा समावेश असू शकतो.



संदर्भ

  1. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont, Illinois. Finger Fractures.
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hand fracture: Aftercare
  3. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood, Kansas; Common Finger Fractures and Dislocations
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Finger Injuries and Disorders
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Bone fractures