पित्ताशयात खडे - Gallbladder Stones in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

April 25, 2019

March 06, 2020

पित्ताशयात खडे
पित्ताशयात खडे

पित्ताशयातील खडे म्हणजे काय?

शरीरातील उजव्या बाजूस असलेल्या उदर पोकळीला,जी पिअर सारखी असते, पिताशय म्हणतात. पित्ताशयात तयार होणारे कॅल्शियम आणि इतर मीठांचे कडक दगडासारख्या डिपॉझिट्सला पित्ताशयातील खडे किंवा कोलिथियासिस म्हणतात.

पित्ताशयातील खडे नलिकेत अडकून अडथळा निर्माण करतात कारण त्या मुळे वेदना होतात व इतर काही लक्षण दिसतात. कधी कधी, लक्षणे स्पष्ट होईपर्यंत  पित्ताशयातील खडे असल्याचे लक्षातही येत नाही.

याची मुख्य चिन्हे व लक्षणे काय आहेत?

पित्ताशयातील खड्यांची विशिष्ट लक्षणे नसतात. खूप काळ ते काही त्रासाशिवाय पित्ताशयात असतात. पण, कधी एखादा खडा नलिकेत अडकून अडथळा निर्माण होतो. त्या वेळी ही लक्षणे दिसून येतात

पित्ताशयातील खडे दोन प्रकारचे असतात.

  • कॉलेस्ट्रोलचे खडे.
  • पिंगमेंट स्टोन्स.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • पित्तात कॉलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढले असेल तर त्याचे खडे बनतात. पित्तातील अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलमुळे हे खडे कडक व न विरघळणारे असतात.
  • पित्तात बिलीरुबिन नावाचा पिगमेंट असतो. यकृतामधील काही विकारांमुळे किंवा रक्त पेशींच्या रोगामुळे बिलीरुबिन चे प्रमाण वाढते आणि खडे तयार होतात.
  • जर पित्ताशयाचे काम बरोबर होत नसेल व पित्ताशय रिकामे होत नसेल तर खडे तयार होतात.
  • मधुमेह, हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा आणि गभनिरोधक गोळया काही जोखमीचे घटक आहेत.        

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर रोगाची लक्षणे बघून त्यानुसार सल्ला देतात. सीटी स्कॅन किंवा. अल्ट्रासाउडने खडे बघितले जातात. यकृताचे काम बरोबर होत आहे का ते बघून यकृत व पित्ताशयातील खड्याचे निदान केले जाते. हे खडे नलिकेत अडकल्यामुळे अडथळा निर्माण होतो का ते पहाण्यासाठी विशेष रंगाचा प्रवाह नलिकेत सोडून तपासणी केली जाते. रक्त तपासणीतून संबंधीत कॉम्प्लिकेशन्स आणि संसर्ग झाला आहे का हे तपासले जाते.

पित्ताशयातील खड्यांचे रुग्णात काही लक्षणे दिसत नसतील तर उपचाराची आवश्यकता नसते. पुनरावृत्ती होणाऱ्या खड्यांपासून आराम मिळावा म्हणून शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढून टाकले जातात. पित्ताशय काढून टाकल्याने शारीरिक क्रियांवर  त्याचा काहीच परिणाम होत नाही. क्वचितच औषधांमुळे खडे विरघळून जातात. म्हणून औषधे शस्त्रक्रिये इतके प्रभावी नसतात. आणि या स्थितीत पुनरावृत्तीचे प्रमाण जास्त असते.



संदर्भ

  1. Abbas Sedaghat. Cholesterol Crystals and the Formation of Cholesterol Gallstones. Massachusetts Medical Society; England
  2. Grotemeyer et al. [Gallstones - Causes and Consequences].. Dtsch Med Wochenschr. 2016 Nov;141(23):1677-1682. PMID: 27855456
  3. Gabriel E Njeze. Gallstones. Niger J Surg. 2013 Jul-Dec; 19(2): 49–55. PMID: 24497751
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Gallstones
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Gallstones - discharge

पित्ताशयात खडे साठी औषधे

Medicines listed below are available for पित्ताशयात खडे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.