डोक आणि मानेचा कर्करोग - Head and neck cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 10, 2018

July 31, 2020

डोक आणि मानेचा कर्करोग
डोक आणि मानेचा कर्करोग

डोक आणि मानेचा कर्करोग म्हणजे काय?

डोके आणि मान यात अनेक अवयवांचा समावेश असतो, ज्यामध्ये तोंड, नाक, मेंदू, लसिका ग्रंथी, साइनस, गळा आणि लिम्फ नोड यांचा समाविष्ट असतो. अशा प्रकारे, हे कर्करोगाचे 6 प्रकार सर्वात सामान्य आहे,जे जगात कर्करोग होण्यासाठी एकूण 6% जबाबदार आहेत. सर्वात जास्त प्रभावशील भाग हे तोंड असते, आणि वृद्ध पुरुषांना हा कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डोकं आणि मानाच्या भागात अनेक संरचना उपस्थित असल्यामुळे, या कर्करोगांचे चिन्हे आणि लक्षणे प्रभावित होणाऱ्या संरचनांवर अवलंबून असतात. तरीसुद्धा, काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे आहेत ज्यात हे दिसू शकतं:

 • गळ्यामध्ये गाठ येणे.
 • तीव्र खोकला.
 • वजन कमी होणे (> एकूण शरीराचे वजन 10%).
 • डिसफॅगिया (गिळताना त्रास होणे).
 • गळ्यात लिम्फ नोडची वाढ.  
 • डोकेदुखी.
 • चेहरा संवेदनाशून्य होणे.

त्याचे मुख्य कारणे काय आहेत?

उत्परिवर्तनामुळे आपल्या शरीरातील कोणत्याही पेशी कर्करोगात बदलू शकतात. हे उत्परिवर्तन अनेक घटकांमुळे होऊ शकते आणि त्यामुळे कारणे निश्चित करणे कठीण आहे. या जोखीम घटकांमध्ये हे असू शकतं:

 • तंबाखूचा वापर.
 • मद्यपान.
 • मजबूत कौटुंबिक इतिहास.
 • वयस्कर.
 • पुरुष लिंग.
 • पौष्टिकते मध्ये कमतरता.
 • धूळ, धातू कण आणि रेडिओधर्मी पदार्थांशी संसर्ग.
 • हानिकारक क्ष किरणांशी संसर्ग.

त्यांचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

योग्य वैद्यकीय तपासणीसह वैद्यकीय इतिहास सहसा निदान करण्यात मदत करते. तरीही, ट्यूमर-नोड-मेटास्टॅसिस (टीएनएम) स्टेजिंगचा वापर करून या कर्करोगाचे वर्गीकरण करण्यासाठी काही आक्रमक आणि गैर-आक्रमक तपासणी करणे आवश्यक आहेत.जे उपचार योजना ठरविण्यास महत्वाचे असते.

 • रक्त तपासणी - अंतर्निहित आजारांची स्थिती कमी करण्यासाठी सामान्य नियमित रक्त तपासणी आवश्यक आहे:
  • पूर्ण रक्त गणना (सीबीसी).
  • लिव्हर फंक्शन टेस्ट.
  • किडनी फंक्शन टेस्ट.
 • सीटी स्कॅन - डोके आणि मान यांच्या सीटी स्कॅनमुळे कर्करोगाच्या विस्ताराबद्दल कल्पना येते.
 • पीईटी स्कॅन - दूरस्थ अवयवांमध्ये झालेला विस्तार ठरवण्याकरिता पीईटी स्कॅन महत्त्वपूर्ण आहे.
 • एमआरआय स्कॅन - कर्करोगाच्या विस्ताराचा निर्णय घेण्यासाठी सीटी स्कॅनपेक्षा अधिक अचूक असते.  
 • फाइन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी (FNAC) - एकतर अल्ट्रासाऊंड मार्गदर्शित किंवा सीटी मार्गदर्शित,ज्यामुळे कर्करोगाच्या प्रकारावर तपशील देण्यासाठी कर्करोगाच्या ऊतीपासून बायोप्सी घेण्यास मदत होते.

इतर कर्करोगांसारखेच, या कर्करोगांचे उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, इम्यूनोथेरपी किंवा रेडिएशन थेरेपी किंवा या थेरपींचा एकत्रीकरण करण्यात येऊ शकते.

 • शस्त्रक्रिया - या कर्करोगांच्या उपचारापैकी हा एक मुख्य उपचार आहे. जिथे संपूर्ण प्रभावित संरचना काढली जाते किंवा कर्करोगाच्या पेशी शस्त्रक्रियाने काढून टाकल्या जातात.
 • केमोथेरपी - इम्यूनोथेरपीसह केमोथेरपी कर्करोगाच्या पेशींना मारण्यात मदत करते. काही प्रकरणांमध्ये, खालच्या पातळीच्या कॅन्सर मध्ये केमोथेरपी शस्त्रक्रियेपूर्वी दिली जाते आणि नंतर कर्करोगाच्या पेशी शस्त्रक्रिया करून काढून टाकल्या जातात.
 • रेडिएशन थेरपी - रेडिएशन थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी प्रभावित संरचनेचे विकिरण केले जाते.संदर्भ

 1. Emory Winship Cancer Institute. [Internet]. Georgia, United States; Head and Neck Cancer.
 2. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Head and neck cancer.
 3. National Comprehensive Cancer Network. [Internet]. Pennsylvania, United States; NCCN Guidelines for Detection, Prevention, & Risk Reduction..
 4. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Head and Neck Cancer—Patient Version.
 5. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Head and Neck Cancers

डोक आणि मानेचा कर्करोग साठी औषधे

डोक आणि मानेचा कर्करोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।