उष्णता - Heat Cramps in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 29, 2018

March 06, 2020

उष्णता
उष्णता

उष्णता म्हणजे काय?

उष्णतेमुळे स्नायूंच्या वेदना किंवा स्नायूंना आलेला आकुंचनाचा झटका म्हणून पहिले जाते जे सहसा हातात किंवा पायात होत असते. कधीकधी एखाद्या व्यक्तीला पोटाच्या क्षेत्रात उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. ही उष्णता जास्त काळ टिकते आणि ती खूप गंभीर असू शकते. उष्ण हवामानात शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या लोकांमध्ये उष्णतेचा त्रास नेहमी होतो.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?

उष्णतेच्या मुख्य लक्षणांमध्ये पाय, हात किंवा ओटीपोटाच्या क्षेत्रात तीक्ष्ण आणि तीव्र वेदनांचा अनुभव येणे.

बहुतेक प्रकरणात, त्या व्यक्तीला खूप घाम येतो आणि त्याला खूप तहान लागते.

बाळांना, लहान मुलांना आणि वृद्धांना उष्णता होण्याची जास्त शक्यता असते कारण त्यांचे शरीर चांगले नियमन करण्यास सक्षम नसते.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

उष्ण वातावरणात जास्त घाम येत असल्यामुळे उष्णतेचे मुख्य कारण निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइटकहे असंतुलन आहे. तीव्र शारीरिक क्रियांमुळे इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होते, यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात आणि वेदना होतात.

काही वैद्यकीय शोध सुचवतात की जेव्हा खूप जास्त शारीरिक कार्य होते आणि स्नायू खूप जास्त प्रमाणात थकतात, तेव्हा ते स्वतःमध्ये संकुचन नियंत्रित करण्याची क्षमता गमावू शकतात ज्यामुळे क्रॅम्प येऊ शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

लक्षणांबद्दल विचारून आणि वैयक्तिक क्रियेच्या पातळीबद्दल प्रश्न विचारून डॉक्टर उष्णतेचे निदान करु शकतील. निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन चे चिन्हे पाहण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी देखील करू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला उष्णता होत असेल तर लगेच त्यांनी :

  • कुठलेही शारीरिक कार्य करण्याचे थांबवले पाहिजे.
  • आराम करण्यासाठी थंड ठिकाण शोधले पाहिजे.
  • थंड शॉवर घेतला पाहिजे.
  • भरपूर प्रमाणात ज्युस आणि ओरल रिहायड्रेशन मीठ वापरले पाहिजे.
  • वेदना कमी करण्यासाठी दुखत असलेल्या स्नायूला हळुवारपणे मसाज द्या.

जर त्या व्यक्तीला उलट्या किंवा मळमळ होत असेल तर डॉक्टर इंट्राव्हेनस (आयव्ही-IV) द्रवपदार्थ प्रदान करतात. वेदना ठीक करण्यासाठी, डॉक्टर वेदनाशामक औषधोपचार पण सांगू शकतात.संदर्भ

  1. National weather service. Heat Cramps, Exhaustion, Stroke. National Weather Service. [internet].
  2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Warning Signs and Symptoms of Heat-Related Illness
  3. Alabama Department of Public Health. Heat-Related Illnesses. Alabama, United States. [internet].
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Heat Stress - Heat Related Illness
  5. National Health Portal. Heat-Related Illnesses and Heat waves. Centre for Health Informatics; National Institute of Health and Family Welfare