टाचेचे हाड वाढणे - Heel Spur in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 10, 2018

March 06, 2020

टाचेचे हाड वाढणे
टाचेचे हाड वाढणे

टाचेचे हाड वाढणे म्हणजे काय?

पायाच्या टाचाच्या अस्थीमध्ये असाधारण वाढीलाचं टाचेचे हाड वाढणे असे म्हटले जाते ज्यामुळे चालणे, उभे राहणे किंवा धावणे यात वेदना होतात. स्नायू, स्नायुबंध किंवा अस्थिबंध झालेल्या नुकसानी किंवा दुखापतीमुळे कॅल्शियमचा संचय होऊन ही वाढ होते, ज्यामुळे तुमच्या टाचेचे तणाव किंवा दबावापासून संरक्षण होते.

हे सामान्यतः मध्यम वयोगटातील प्रौढांपेक्षा मुलांमध्ये दिसून येते. हे पुरुष व स्त्रियांना वारंवार प्रभावित करते. भारतीय अभ्यासाच्या अनुसार, टाचांमध्ये वेदना असणा-या लोकांमध्ये टाचेचे हाड वाढणे ही घटना 59% असल्याचे आढळले आहे.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टाचांमध्ये वेदना हे प्राथमिक लक्षण आहे. पण वेदना देण्यासाठी टाचेचे हाड वाढणे हे क्वचितच जबाबदार असते. या हाडाच्या वाढीचे जवळच्या ऊतींवर दबाव पडल्यामुळे तुम्हाला वेदना जाणवू शकते. झोपेतून उठल्यानंतर सकाळचे पहिले पाऊले हे खूप तीव्र वेदनादायी असते, जी हळू हळू कमी होते. तुमच्या टाचांमध्ये सूज आणि कोमलता देखील असू शकते.

याची लक्षणे प्लांटर फॅसिटायटिसच्या प्रमाणेच असतात, संयोजक ऊतकांना दुखापत किंवा सूज होण्याची स्थिती, जी टाचांपासून पायाच्या बोटांपर्यंत वाढते.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

बहुतेक प्रकरणांमध्ये प्लांटर फॅसिटायटिस हे टाचे च्या हाड वाढण्याचे मुख्य कारण असते, प्लांटार फासियाला दुखापत झाल्यास, संयोजी ऊती ज्या आपल्या पायांची ताण देण्यापासून रक्षण करतात, त्याला बरे करण्यासाठी जास्त वेळ लागतो, लहान हाडांची रचना होत असतात. टाचेचे हाड वाढणेच्या इतर कारणे आहेत:

  • पायांच्या स्नायूंवर आणि अस्थिबंधांवर अतिरिक्त ताण.
  • ओव्हरस्ट्रेचिंग.
  • धावणे आणि उडी मारणे यासारख्या  अँथलीटमधील शारीरिक क्रिया.
  • दीर्घकाळ किंवा लांब काळ उभे राहणे.
  • सपाट हिल्स किंवा उच्च कमान असलेली व्यक्ती.
  • अस्थिर चालणे.
  • अयोग्य फिटिंग शूज घालणे.
  • जास्त वजन.
  • गर्भधारणा.
  • संधिवात आणि मधुमेह यांसारखा रोग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

जर तुम्हाला टाचेचे हाड वाढण्याची लक्षणे असतील तर, डॉक्टर प्रथम तुमच्या पायाचे परीक्षण करतील आणि कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय इतिहास घेतील. नंतर एक्स-रेची शिफारस केली जाईल. परंतु, एमआरआय आणि अल्ट्रासाऊंडसारख्या चाचण्या क्वचितच करायला सांगितले जातील.

दाह-विरोधी औषधांसारखे औषधे, वेदना कमी करण्यासाठी सुचवली आहे. टाचेचे हाड वाढणेच्या वेदना व्यवस्थापनात इतर स्व-काळजीचे पर्याय खालील प्रमाणे आहेत:

  • पुरेशी विश्रांती घेणे.
  • वेदनादायक टाचेवर बर्फाचा पॅक लावणे.
  • व्यवस्थित बसणारे बूट घालणे.
  • कडक पृष्ठावर अनवाणी चालायचे टाळणे.
  • स्नायूंना ताण पडेल असे व्यायाम करणे.
  • जास्त वजन असल्यास वजन कमी करणे.

नॉन - सर्जिकल पद्धतींसह वेदना राहत नसल्यास तर शस्त्रक्रिया हा अंतिम पर्याय आहे.



संदर्भ

  1. R. Kevin Lourdes, Ganesan G. Ram. Incidence of calcaneal spur in Indian population with heel pain. Volume 2; July-September 2016. [internet].
  2. National Health Service [Internet]. UK; Heel pain
  3. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Plantar Fasciitis and Bone Spurs.
  4. Health Link. Bone Spur. British Columbia. [internet].
  5. Healthdirect Australia. Heel spur. Australian government: Department of Health