लाइकन प्लॅनस - Lichen Planus in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 13, 2018

March 06, 2020

लाइकन प्लॅनस
लाइकन प्लॅनस

लाइकन प्लॅनस म्हणजे काय?

लाइकन प्लॅनस हा एक त्वचारोग आहे ज्यामध्ये दीर्घ काळापर्यंत सूज राहते. खाज व चमकणारे लाल व निळसर डाग किंवा जखम हे या त्वचारोगाचे वैशिष्ट्य आहे. याचा परिणाम मौखिक कीड तसेच तोंडावर आणि ओठांवर पांढरे व करडे डाग या स्वरूपात होतो.

एलपी हा एक खूप क्वचित आढळणारा स्वप्रतिरक्षित आजार असून तो साधारण जननेंद्रिये, डोक्याची त्वचा, नख, डोळे तसेच अन्ननलिकेच्या भागात होतो. लागण झालेल्या अवयवांच्या भागात हा हळूहळू दिसू लागतो.

या आजाराची स्थिती ही वृक्ष आणि खडकांवर वाढणाऱ्या लाइकन समान असते. या जखमा पुढे वाढत चालणाऱ्या सपाट व स्केली असतात. या आजाराचे अचूक निदान झाले नाही तर त्याचे रुपांतर फंगल (बुरशी) प्रकारात होते. या त्वचारोगास परिणाम होणाऱ्या शारीरिक अवयवानुसार विविध नावे देण्यात आली आहेत.

  • क्युटेनस एलपी - त्वचा.
  • ओरल एलपी - तोंड आणि ओठ.
  • पेनाइल किंवा व्हलवर एलपी - जननेंद्रिये.
  • लाइकन प्लॅनोपिलारीस - डोक्याची त्वचा.
  • ऑटिक एलपी - कान.

या त्वचारोगाच्या अत्यंत वाढीव स्वरूपास ‘इरोझिव्ह लाइकन प्लॅनस’ असे म्हणतात. याचा त्रास दीर्घ काळापर्यंत होतो.परिणामी तोंड व जननेंद्रियांच्या भागात अल्सर उद्भवतो ज्यामुळे रोजच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळा निर्माण होतो. दुर्लक्ष झाल्यास त्याचे रुपांतर कर्करोगाच्या पेशी तयार होण्यात होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

एलपीची पुढील मुख्य लक्षणे आहेत:

  • हात, पाय आणि शरीरावर चमकणारे लाल निळसर डाग.
  • हिरड्या, गाल आणि जिभेवर पांढरे चट्टे.
  • तोंडातील अल्सर.
  • जेवताना तोंडात भाजल्यासारखे आणि दंश झाल्याप्रमाणे जाणवणे.
  • डोक्याच्या त्वचेवरील केसं जाणे.
  • जननेंद्रियांवर (स्त्री- पुरुष) दुखणारे पॅचेस.
  • बारिक आणि राठ नखं.
  • हिरड्यांवर छिद्र पडणे.
  • क्वचित पुरळं येणे.

विविध भागावर होणाऱ्या परिणामानुसार पुढीलप्रमाणे लक्षणे बदलतात. ती अशी आहेत:

  • पायांवर वाढत जाणाऱ्या बोचक आणि ओल्या जखमा.
  • त्वचेची दुखापत ठिक होताना डाग पडणे.
  • त्वचेची आट्रॉफी.
  • घाम न येणे.
  • हायपरपिगमेंटेशन किंवा हायपोपिगमेंटेशन.

वरील सर्व बाबी लक्षात घेता हा आजार साध्य किंवा असाध्य स्वरूपाचा असू शकतो.

याची मुख्य कारण काय आहेत?

एलपी आजाराचे मूळ कारण अद्याप सापडले नसले तरीही ऑटोइम्युनिटी हे अंतर्निहित कारण समजले जाते. असे समजले जाते की औषधे, ॲलर्जन्स, इन्फेकशियस एजन्ट्स आणि जखमांमुळे रोगप्रतिकारक्षमतेवर प्रभाव पडून त्याचा परिणाम त्वचेच्या पेशींवर होऊ शकतो आणि त्यातून लाइकन प्लॅनस होऊ शकतो. परिणामतः त्वचा खराब होऊ शकते. काही उदाहरणांमध्ये रुग्णाच्या आनुवंशिक पार्श्वभूमीवरुन आजाराची संवेदनशीलता ओळखली जाते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या आजाराचे निदान त्वचेची प्रत्यक्ष तपासणी आणि म्युकस मेम्ब्रेनची तपासणी क्वालिफाईड मेडिकल प्रोफेशनल्स कडून केली जाते. रोगाच्या व्यवस्थापनावर परिणाम करणाऱ्या इतर समान दोषांना स्किन बायोप्सी प्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते. याचसोबत हेपॅटायटीस  या विषाणूची चाचणीही केली जाते.

त्याचप्रमाणे अंतर्निहित ॲलर्जन्स ची ओळख आणि उपचाराची सुरुवातही केली जाऊ शकते.

उपचारपद्धतीमध्ये पुढील पद्धतींचा समावेश होतो:

  • रोगप्रतिकारक्षमतेच्या आधारे एलपी हा सहा ते नऊ महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या बरा होऊ शकतो.
  • लक्षणे कमी करण्यासाठी क्रीम्स आणि लोशन्स चा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वापर होऊ शकतो.
  • वाढत जाणाऱ्या आजारास नियंत्रणात आणण्यासाठी स्टेरॉइड्स आणि फोटो थेरपीचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • तोंडातील एलपी च्या दुखण्यापासून माऊथवॉश, गुळणा आणि जेल ने आराम मिळतो.  
  • इरोसिव्ह एलपी पासून आराम मिळण्यासाठी पद्धतशीर कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू करण्यात आली आहे.
  • अंतिमतः इतर पद्धतींसोबतच इम्युनोसस्प्रेसिव्ह मेडिकेशन्स जसे की मायकोफिनोलेट, अझिथ्रोपाइने,आणि मेथोट्रॉक्सेट यांचा उपयोग केला जातो.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Lichen planus
  2. National Organization for Rare Disorders. Lichen Planus. [Internet]
  3. American Academy of Dermatology. LICHEN PLANUS: SIGNS AND SYMPTOMS. [Internet]
  4. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Lichen planus
  5. Arnold DL, Krishnamurthy K. Lichen Planus. Lichen Planus. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.

लाइकन प्लॅनस साठी औषधे

Medicines listed below are available for लाइकन प्लॅनस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.