लिस्टरियोसिस - Listeriosis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 10, 2018

July 31, 2020

लिस्टरियोसिस
लिस्टरियोसिस

लिस्टरियोसिस म्हणजे काय?

लिस्टिरिओसिस हा लिस्टरिया मोनोसाइटोजेन्स मुळे होणारा अत्यंत गंभीर जिवाणूजन्य संसर्ग आहे. कधीकधी, या रोगास कारणीभूत जिवाणूंच्या नावामुळे याला 'लिस्टरिया' म्हटले जाते. याचा संसर्ग मूळतः अन्नपदार्थामुळे होतो, म्हणूनच जीवाणू प्रथम आतड्यांना प्रभावित करतात. याचा संसर्ग  सामान्यतः गर्भवती महिला आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो, जसे की:

  • ज्येष्ठ नागरिक (वय >= 65 वर्षे).
  • कर्करोग, मूत्रपिंड रोग किंवा मधुमेहा चा रुग्ण.
  • एचआयव्ही-संक्रमित किंवा एड्स रोगी.
  •  नवजात शिशू.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

आक्रमक लिस्टरियोसिसच्या बाबतीत, जिवाणूचा संसर्ग आंतच्या मर्यादेपलीकडे पसरतो आणि म्हणूनच संबंधित लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असतात.

गर्भवती महिला: माता होणाऱ्या स्त्रियांना ताप आणि फ्लू होऊ शकतो. आणि उपचार न केल्यास तिच्या  गर्भाच्या आरोग्यावर हानिकारक प्रभाव पडतो. गर्भपात आणि अकाली प्रसव होण्याचा धोका देखील वाढतो. (अधिक वाचा: गर्भावस्थेतील काळजी)

तर, प्रौढ रुग्णांमध्ये संक्रमणामुळे पुढील लक्षणे दिसू शकतात:

आक्रमक संसर्गाची लक्षणे 1- 4 आठवड्यात दिसू लागतात.

याची मुख्य कारणे काय आहेत?

लिस्टरिया बॅक्टेरियाचा दूषित अन्न हा सर्वात सामान्य स्रोत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्युएचओ) च्या म्हणण्यानुसार, हा संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु संभाव्यतः जीवघेणा आहे. खालील अन्न स्रोत याचे जिवाणू वाहक असू शकतात:

  • दीर्घकाळ कपाटात ठेवलेले अन्न.
  • कच्चे अन्न.
  • जिवाणूसहित दुधा पासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ.
  • मांस.
  • खाण्यास तयार थंड अन्न.
  • डेली मांस.

याशिवाय गर्भवती महिलांमध्ये, संसर्ग मातेपासून तिच्या गर्भातील मुलाला होऊ शकतो. उपचार न केल्यास संसर्ग सेप्सिस आणि मेनिंजायटीस सारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. लिस्टिरिओसिस हा मेंदूच्या नुकसानास आणि फोडास देखीलकारणीभूत ठरू शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रक्त तपासणीद्वारे जिवाणूंच्या संसर्गाची उपस्थिती निश्चित केली जाऊ शकते. मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅनचा उपयोग मेंदूच्या सेलचे नुकसान नाही झाले आहे हे निश्चित करण्यासाठी केला जातो. अँटीबायोटिक थेरपीचा संक्रमण आणि जिवाणूंच्या वाढीशी लढण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर त्याच लक्षणे कायम असतील आणि खालील कारणांमुळे जर तुमची रोगप्रतिकार प्रणाली कमकुवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • मधुमेह.
  • केमोथेरपी.
  • एड्स.

स्वच्छता आणि निरोगी खाण्याच्या सवयींमुळे ही परिस्थिती टाळता येऊ शकते. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये याचा समावेश होऊ शकतो:

  • जेवणाआधी हात धुणे.
  • फळे आणि भाज्या स्वयंपाकापूर्वी / वापरण्यापूर्वी धुणे.
  • समाप्तीच्या तारखेनंतरचे अन्न टाळणे.
  • कच्चे मांस आणि मासे टाळणे.
  • रेफ्रिजरेटरमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवलेले अन्न काढून टाकणे.
  • बॅक्टेरियल बिल्ड अप टाळण्यासाठी रेफ्रिजरेटर स्वच्छ करा व वारंवार त्याची जागा बदला.
  • कच्चे सीफूड आणि भाज्या शिजवलेल्या अन्नापासून वेगळे ठेवा.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Listeria (Listeriosis)
  2. U.S. Department of Health & Human Services. Bacteria and Viruses. Washington; [Internet]
  3. Douglas A. Drevets, Michael S. Bronze. Listeria monocytogenes : epidemiology, human disease, and mechanisms of brain invasion . FEMS Immunology & Medical Microbiology, Volume 53, Issue 2, July 2008, Pages 151–165
  4. Marler Clark. Everything You Never Wanted to Know About Listeria, But Need To. July 4, 2013
  5. National Health Service [Internet]. UK; Listeriosis