myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

लिव्हर ट्रांसप्लांट(यकृत प्रत्यारोपण) म्हणजे काय?

यकृत प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये रुग्णाचे निकामी यकृत, जे कोणत्याही औषध व उपाचाराने बरे होत नाही ते संपूर्णपणे किंवा अंशतः काढले जाते व त्याजागी नवीन व निरोगी यकृताचे प्रत्यारोपण केले जाते.

हे का केले जाते?

अशी बरीच लक्षणे आहेत, ज्यामुळे यकृताचा निकामीपणा दिसतो व ज्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:-

विशिष्ट लक्षणे पुढीलप्रमाणे:-

 • आतड्यातील रक्तस्त्राव- रक्तप्रवाहातून अमोनिया व बीलरुबिन काढून टाकण्यासाठी यकृत जबाबदार असते. जर यकृत निकामी झाले तर यकृतातील रक्त पेशी चे कवच पातळ होते व अवयव निरुपयोगी पदार्थ काढून टाकण्यास अयशस्वी ठरते. या पातळ व छोट्या रक्तपेशी रक्तप्रवाहामध्ये टिकून राहू शकत नाहीत त्यामुळे शेवटी त्या तुटतात व आतड्याच्या आतील नलिकेत रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव खूप धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो.
 • द्रव्य पदार्थ धरून ठेवणे- यकृताचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्तप्रवाहातील काही द्रव परत शोषून घेणे. यकृताचे निकामी होणे हे अल्ब्युमिन व इतर प्रोटीन चे उत्पादन कमी होते ज्यामुळे ओन्कॉटिक दाबामध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाहातून द्रवाचे नुकसान कमी होतो. ही द्रव्ये नंतर शरीराच्या इतर भागात जाऊन स्थिरावतात ज्यामुळे हायड्रोथ्रॉक्स (छाती) किंवा पेडल (पाय) होऊ शकतो. हे शरीराला हानिकारक नसले तरी शरीराच्या बाहेर टाकणे आवश्यक असते.
 • कावीळ- यकृत निकामी झाल्यावर ते रक्तप्रवाहामधून काही मेटाबोलिक घटक काढून टाकू शकत नाही. बिलरुबीन हा असाच एक घटक आहे जो कमी झालेल्या हिमोग्लोबिन पासून तयार होतो आणि जेव्हा बिलरुबिन चे प्रमाण वाढते तेव्हा शरीर पिवळे पडू लागते. ह्या स्थितीला कावीळ म्हणले जाते व ह्यामध्ये जास्त ताप व मळमळ होते.

याची गरज कोणाला असते?

यकृत प्रत्यारोपण हे यकृत निकामी झाल्यावर अगदी शेवटचा उपाय म्हणून केले जाते, जेव्हा कोणतेही औषध परिणाम करत नाही. यकृत निकामी होण्याची काही सामान्य कारणे पुढीलप्रमाणे:-

 • सिरोसिस-विविध आजारांमुळे यकृताची क्षमता कमी होत जाते व सिरोसिस मध्ये अकार्यक्षमता येते.
 • बिलियरी अट्रेशिया- ही अतिशय दुर्मिळ स्थिती नवजात बालकांमध्ये व लहान मुलांमध्ये दिसून येते ज्यामध्ये यकृत व छोट्या आतड्यामध्ये असणारी नलिका बंद होते व तत्काळ यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे ठरते.

इतर स्थिती:-

 • यकृताचा कर्करोग किंवा ट्युमर
 • अनियंत्रित दारूचे सेवन
 • काही अनुवांशिक आजार

हे कसे केले जाते?

यकृत प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते.

यकृत प्रत्यारोपण हे रुग्णाच्या यकृताच्या स्थितीवर अवलंबून असते. आरोग्यदायी यकृत सामान्यपणे अवयव बॅंकेतून मिळवले जाते, जिथे मृत्यूनंतर नोंदणीकृत दात्यांचे यकृत ठेवले जाते. काही बाबतीत, रुग्णाचे नातेवाईक पैशासाठी किंवा स्वेच्छेने यकृताचा काही भाग दान करतात.

सर्वप्रथम निकामी झालेले यकृत रुग्णाच्या शरीरातून काढून टाकले जाते आणि जेव्हा रक्त प्रवाह स्थिर होतो तेव्हा योग्य स्थितीमधील यकृत शरीरात बसवले जाते. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने 5-6 तास चालते व यात खूप काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये रुग्णाला विशेष वैद्यकीय मदत पुरवली जाते ज्यामुळे बाहेरील अवयव स्वीकारण्यास शरीर समर्थ होते.

यशस्वी प्रत्यारोपणाचे प्रमाण सगळ्यात जास्त असले तरी त्यांनतर रुग्णाला योग्य काळजी व लक्ष देणे आवश्यक असते.

 

 1. लिव्हर ट्रांसप्लांट(यकृत प्रत्यारोपण) साठी औषधे

लिव्हर ट्रांसप्लांट(यकृत प्रत्यारोपण) साठी औषधे

लिव्हर ट्रांसप्लांट(यकृत प्रत्यारोपण) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Sandimmun NeoralSANDIMMUN NEORAL 100MG CAPSULE 50S5049
SandimmunSANDIMMUNE NEORAL 25MG TABLET 5S0
PsoridPSORID 100MG CAPSULE404
TacrografTACROGRAF 5MG CAPSULE 10S0
EczridEczrid 0.3% Ointment168
ConsiralConsiral 100 Mg Capsule472
ImografImograf 0.03% W/W Ointment136
CyclodropCYCLODROP EYE DROPS 5ML329
KivitroKivitro 0.03 Mg Ointment102
CyrinCyrin 100 Mg Capsule0
OlixOlix 0.1% Ointment216
ImudropsIMUDROPS DROP 0.5ML 12S356
OlmisOlmis 0.03% W/W Ointment96
Imudrops DsImudrops Ds 0.5 Ml Eye Drop196
TacosealTacoseal 0.1%W/W Ointment81
ImusporinImusporin 100 Mg Capsule0
TacrodermTacroderm 0.03% Ointment77
NeoralNeoral 100 Mg Capsule0
TacrojonTacrojon 0.1% Ointment260
OncycloOncyclo 100 Mg Oral Suspension3968
TacrokidTacrokid 0.03% Ointment88
TacromTacrom 0.03% Ointment75
TacromentTacroment 0.03% Ointment96
TacropexTacropex 1 Mg Ointment239
TacrotopicTacrotopic 0.03% Ointment96

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. University of California. Liver Transplant. Department of Surgery; [Internet]
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Liver Transplantation
 3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Definition & Facts of Liver Transplant
 4. American Liver Foundation. Liver Transplant. [Internet]
 5. Caroline C Jadlowiec, Timucin Taner. Liver transplantation: Current status and challenges. World J Gastroenterol. 2016 May 14; 22(18): 4438–4445. PMID: 27182155
और पढ़ें ...