लोकल ॲनस्थेशिया (स्थानिक भूल देणे) - Local Anesthesia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 11, 2019

March 06, 2020

लोकल ॲनस्थेशिया
लोकल ॲनस्थेशिया

लोकल ॲनस्थेशिया (स्थानिक भूल देणे) म्हणजे काय?

लोकल ॲनस्थेशिया ही एक सामान्य वैद्यकीय प्रक्रिया आहे जी शरीरातील एखादा विशिष्ट भाग बधिर करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये पेरिफेरल नसांमध्ये रक्तप्रवाह थांबवला जातो किंवा नसांच्या शेवटी जाणीव तयार होणे थांबवले जाते ज्यामुळे बधिरत्वाची भावना तयार होते.

हे का केले जाते?

लोकल ॲनस्थेशिया तुमच्या शरीराचा छोटा भाग बधिर करण्यासाठी खालील कारणांमुळे वापरला जातो:

 • जेव्हा तुम्हाला जागेपणी, शांतपणे, त्रास होत असताना सहनशक्ती राखून वेदनविरहित शस्त्रक्रिया करावी लागते.
 • जेव्हा अल्सर, आघात किंवा बाळाच्या जन्मावेळी वेदनांपासून आराम द्यायचा असेल.
 • जेव्हा सहज सापडणाऱ्या नसा असतील तेव्हा लोकल ॲनस्थेटिक औषधाचे स्प्रे, मलम किंवा इंजेक्शन वापरले जातात.

याची गरज कोणाला असते?

लोकल ॲनस्थेशिया ची गरज त्या रुग्णांना असते ज्यांवर काही विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाणार असते जसे:

 • अक्कलदाढ किंवा खूप किडलेला दात काढणे किंवा कॅव्हिटीज.
 • मोतीबिंदूची शस्त्रक्रिया किंवा डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रियेचे प्रकार.
 • छोट्या शस्त्रक्रिया जसे चामखीळ किंवा मस काढण्याच्या शस्त्रक्रिया.
 • काही मोठ्या शस्त्रक्रिया जसे बायोप्सी अँजिओप्लास्टी.
 • काही शस्त्रक्रिया ज्यामध्ये  शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना जागे रहायचे असते जसे मेंदूच्या शस्त्रक्रिया.
 • जनरल ॲनस्थेशिया देऊन केलेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर च्या पोस्ट ऑपरेटिव्ह बरे होण्याच्या काळात.

हे कसे केले जाते?

लोकल ॲनस्थेशिया देण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत:

 • टॉपिकल लोकल ॲनस्थेशिया
  हा त्वचेचा जो भाग बधिर करायचा आहे तिथे लावला जातो. लोकल ॲनस्थेटिक हे जेल,क्रीम, स्प्रे किंवा पॅच सारखे वापरले जाते.
 • सब- क्युटेनियस लोकल ॲनस्थेशिया
  यात रुग्णाच्या त्वचेच्या वरच्या भाग व त्वचेच्या खालील भाग बधिर करण्यासाठी इंजेक्शन दिले जाते.
 • रिजनल ॲनस्थेशिया
  हा सगळ्यात जास्त सामान्य लोकल ॲनस्थेशिया चा प्रक्रार आहे. याचे पुढे खालील प्रकार आहेत:
  • एपिड्युल ॲनस्थेशिया
   मणक्याचे संरक्षण करणाऱ्या  द्रव असणारी पिशवीच्या आजूबाजूच्या भागात लोकल ॲनस्थेटिक इंजेक्ट केला जातो. हे मुख्यतः शरीराच्या किंवा मणक्याच्या खालील भागातील शस्त्रक्रिया करताना वापरले जाते.
  • स्पायनल ॲनस्थेशिया
   मणक्याला बधिर करण्यासाठी द्रव जन्य पिशवी मधून लोकल ॲनस्थेटिक दिले जाते.
  • परिफेरल नर्व्ह ब्लॉक
   लोकल ॲनस्थेटिक हे शिरेच्या मुख्य भागात दिले जाते ज्यामुळे ते शिरेच्या  सर्व भागांमध्ये पोहोचते व एकत्रित होते.  

 संदर्भ

 1. American Pregnancy Association. Local Anesthesia. [Internet]
 2. Department of Health. Local anaesthetic. The State of Queensland; [Internet]
 3. American Society of Anesthesiologists. Local Anesthesia. U.K; [Internet]
 4. Radiological Society of North America. Anesthesia Safety. America; [Internet]
 5. National Health Service [Internet]. UK; Local anaesthesia

लोकल ॲनस्थेशिया (स्थानिक भूल देणे) साठी औषधे

लोकल ॲनस्थेशिया (स्थानिक भूल देणे) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।