कमी कामेच्छा/लो लिबिडो - Low Libido in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

कमी कामेच्छा/लो लिबिडो
कमी कामेच्छा/लो लिबिडो

कमी कामेच्छा/लो लिबिडो म्हणजे काय?

लिबीडो म्हणजे लैंगिक इच्छा किंवा ड्राईव्ह. कमी कामेच्छा ही एक समस्या आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही आढळते. याला लैंगिक इच्छाशक्तीची कमतरता किंवा कमी सेक्स ड्राइव्ह म्हणून समजावून सांगितले जाऊ शकते.जरी जास्त किंवा कमीचे काही निर्धारित प्रमाण नसले तरी तुम्हाला आपल्या जोडीदाराबरोबर संबंध बनवणे कठिण झाल्याने कामेच्छा कमी झाल्याचे समजते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

विविध लक्षणे कमी कामेच्छा दर्शवितात; यापैकी सर्वात सामान्य म्हणजे:

 • लैंगिक विचार आणि कल्पनांचा अभाव.
 • लैंगिक स्वरुपाच्या क्रियाकलापांमध्ये स्वारस्य नसणे, ज्यात सहवास, प्रेम आणि फॉलो प्ले आणि अगदी हस्तमैथुन देखील समाविष्ट आहेत.
 • लैंगिक इच्छेचा अभाव.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कमी झालेल्या कामेच्छासाठी कारणीभूत अनेक घटक असू शकतात. हे खालील प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात:

 • वय - लैंगिक हार्मोन पातळीमध्ये घट झाल्याने पुरुष आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल घडतात म्हणून लैंगिक हार्मोन्सचा स्तर कमी होतो. त्याचप्रमाणे, दोन्ही लिंगांना प्रभावित करणाऱ्या इतर समस्यांमध्ये प्रतिबंधित गतिशीलता, आरोग्य समस्या आणि वय-संबंधित परिस्थितींचा समावेश आहे.
 • लैंगिक समस्या - हे नर व मादी दोघांनाही होऊ शकते आणि लैंगिक कामाच्या मार्गात येऊ शकतात. या परिस्थितीत रक्ताभिसरण समस्येचा, असामान्य योनीचे डिसफंक्शन, समागम किंवा संभोगात अक्षम होणे किंवा सेक्स दरम्यान वेदना समाविष्ट असू शकते.
 • नातेसंबंध समस्या - भागीदारांमधील समस्यांमुळे बरेचदा लैंगिक रूची नसल्यामुळे संभोगाची इच्छा कमी होते. विश्वास, संवाद आणि परिचितता या काही समस्यांमुळे लैंगिक नात्यावर प्रभाव पडतो.
 • भावनिक आणि मानसिक समस्या - तणाव, थकवा, निराशा आणि चिंता यासारख्या अवस्था मनाच्या स्थितीवर परिणाम करू शकतात आणि कामेच्छा आणि शारीरिक अंतर्भावनेची इच्छा कमी करू शकतात.
 • आरोग्य समस्या - शारीरिक आजारांवर कामेच्छावर काही विशिष्ट प्रभाव असू शकतो. हृदयविकाराची समस्या, कर्करोग, थायरॉईड आणि मधुमेह ही फक्त काही आजार आहेत ज्यामुळे कामेच्छा कमी होतात आणि लैंगिक जीवन प्रभावित होते.
 • औषधोपचार आणि उपचार - औषधे, अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन कामेच्छेत बदलू आणू शकताण आणि लैंगिक इच्छा कमी करू शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला लैंगिक उर्जा किंवा इच्छेच्या कमतरतेमुळे चिंता होत असेल तेव्हा निदान सुरू होते. जेव्हा ही चिंता, समस्या होते तेव्हा प्राथमिक निदान पूर्ण झालेले असते. डॉक्टर सामान्यत: आरोग्यविषयक स्थिती आणि औषधे तपासतात आणि मूळ कारणाची खात्री करण्याआधी वैयक्तिक भावनात्मक आणि मानसिक स्थिती देखील पाहतात. ही एक गुंतागुंतीची स्थिती असल्याने, एकाकारणावर पोहोचणे काहीसे अवघड असू शकते.

उपचार कारणांवर अवलंबून असताण. डॉक्टर्स सामान्यत: सुधारित किंवा स्वस्थ जीवनशैली निवडायची शिफारस करतात ज्यामध्ये सुधारित आहार योजना, अधिक व्यायाम, नियमित झोप आणि तणाव व्यवस्थापनाचा समावेश असू शकतो. निराकरण झालेल्या समस्यांचे मूळ कारण समजायला रिलेशनशिप काउंसेलिंग आणि कपल थेरपीची शिफारस केली जाऊ शकते. अमली पदार्थांचे सेवन टाळण्याचे  देखील सुचविले जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ज्यात लैंगिक हार्मोन लक्षणीय प्रमाणात कमी असतात हार्मोन थेरपी आवश्यक असू शकते. अनेक बाबतीत, साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी आणि कामेच्छा पुनर्संचयित करण्यासाठी औषधे बदलण्याची शिफारस केली जाऊ शकते.संदर्भ

 1. Endocrine Society. [Internet]. Washington, DC, United States; Decreased Libido.
 2. American College of Obstetricians and Gynecologists. Women's Health Care Physicians [internet], Washington, DC; Your Sexual Health.
 3. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Loss of libido (reduced sex drive).
 4. Corona G. et al. J Sex Med. 2013 Apr;10(4):1074-89. PMID: 23347078.
 5. Keith A. Montgomery. Sexual Desire Disorders. Psychiatry (Edgmont). 2008 Jun; 5(6): 50–55. PMID: 19727285.

कमी कामेच्छा/लो लिबिडो साठी औषधे

Medicines listed below are available for कमी कामेच्छा/लो लिबिडो. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.