दाढ दुखणे - Molar Tooth Pain in Marathi

Dr Razi AhsanBDS,MDS

January 03, 2019

July 31, 2020

दाढ दुखणे
दाढ दुखणे

दाढ दुखणे म्हणजे काय?

जबडा आणि दातच्यामध्ये आणि यांच्या सभोवतालच्या वेदना म्हणजे दात दुखणे होय. हे सामान्यतः दात किडण्यामुळे होते. तोंडाच्या मागच्या बाजूला दाढा असतात. आशा चार दाढा असतात, त्यातले दोन खालच्या जबड्यात आणि वरच्या जबड्यात दोन असतात. काही लोकांमध्ये काहीच नाही किंवा कमी दाढा असतात. काही लोकांमध्ये, दाढा एका कोनावर येऊन आसपासच्या दात किंवा हिरड्याला धक्का देतात. ही प्रक्रिया खूप वेदनादायक असते आणि दात्यांच्या सभोवताली चा भाग स्वच्छ ठेवणे कठीण होऊन जातो.

त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

दाढ दुखणे संबंधित मुख्य चिन्हं आणि लक्षणं खालीलप्रमाणे आहेतः

 • दाढे जवळचा जबडाचा  कडक किंवा वेदनादायक होणे.
 • गिळणे, दात घासणे आणि तोंड उघडणे यात अडचण.
 • दात किडणे.
 • दातांची गिचमिड.
 • हिरड्यांमध्ये पुस होणे.
 • दातदुखीच्या आसपास असलेल्या हिरड्यांना संक्रमण किंवा सूज.
 • श्वासाची दुर्घंधी.
 • अस्वस्थता.
 • अक्कल दाढ आणि शेजारील दातांमध्ये अन्न आणि बॅक्टेरियाचे संचय.
 • लिम्फ नोड्स मध्ये सूज.
 • चुकीच्या कोनात दाढ आल्यामुळे जीभ, गाल, तळ किंवा वरच्या तोंडात जळजळ किंवा वेदना होणे.
 • हिरड्यांचा रोग.
 • ताप.

मुख्य कारण काय आहेत?

दाढ दुखणे चे मुख्य कारणं आहेत:

 • डेंटल पल्प(दांतच्या सर्वात आतला थर) मध्ये सूज.
 • दातात फोड (जीवाणू तयार करणे आणि दातच्या मध्यभागी संक्रमित सामग्री).
 • दाढेचे मूळ संवेदनांशील बनविणाऱ्या हिरड्याला मागे टाकणे.
 • अपुरी स्वच्छता.
 • पुस रचना.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

एक दंतचिकित्सक दाढे मध्ये वेदनाचा निदान करतील, तपासणी करून आणि कोणती दाढ वेदनेस कारणीभूत आहे हे निर्धारित करण्यासाठी एक्स-रेचा संदर्भ देऊ शकतात.  

दाढ दुखी च्या उपचारात खालील पद्धतींचा वापर करून केला जातो:

 • ओव्हर-द-काउंटर वेदना रिलीव्हर्स.
 • सांगितलेली औषधे जसे अँटिबायोटिक्स.
 • संक्रमित क्षेत्र स्वच्छ करणे.
 • दात गंभीरपणे संसर्ग झाल्यास दात काढणे.
 • मीठ टाकून उबदार पाणी सह गुळण्या करणे.
 • रूट कॅनल.संदर्भ

 1. Nidirect [Internet]. Government of Northern Ireland; Causes of toothache .
 2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Wisdom teeth.
 3. Michigan Medicine: University of Michigan [internet]; Wisdom Tooth Problems.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tooth abscess.
 5. National Health Service [Internet]. UK; Wisdom tooth removal.