myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

रातआंधळेपणा काय आहे?

रातआंधळेपणा ही अशी स्थिती आहे जिथे रात्रीच्या वेळेस किंवा तुलनेने कमी प्रकाशात दृष्टी कमजोर होत असते. व्हिटॅमिन ए ची कमतरता हे पहिले क्लिनिकल लक्षण आहे आणि कमी सीरम रेटिनॉल पातळीचा एक विशिष्ट आणि मजबूत सूचक आहे.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

क्लिनिकल चिन्हे आणि लक्षणे अंधुक प्रकाशात कमजोर दृष्टी, रात्री गाडी चालविण्यास अडचण आणि सौम्य डोळा अस्वस्थता (माईल्ड आय डिसकंफोर्ट) यासारखी असतात. सुरुवातीच्या चिन्हांमध्ये कमी सीरम रेटिनॉल सघनता (1.0 मायक्रोमॉल / लिटरच्या खाली) आणि बिटोटचे स्पॉट्स यामुळे अंधाराशी जूळवून घेण्याची अक्षमता समाविष्ट आहे. हे स्पॉट्स विशेषत: व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमध्ये दिसतात आणि डोळ्याच्या टेम्पोरल (बाह्य) बाजूला असलेल्या त्रिकोणी, कोरड्या, पांढर्या, फेसाळ घावांनी दर्शविले जातात.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

डोळ्याच्या आत, व्हिटॅमिन ए ऱ्होडोस्पिनिन तयार करण्यासाठी जो एक रॉड्स मधील संवेदनशील व्हिज्युअल पिगमेन्ट आहे ओपसिन नावाच्या पदार्थासह एकत्र येतात. आपल्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारचे लाइट रिसेप्टर्स असतात, रॉड्स आणि कोन. रॉड्स आपल्याला दृष्टी देतो पण तो रंगीत दृष्टी देण्यात समर्थ आहे. कोन केवळ उज्ज्वल प्रकाशात सक्रिय होतो आणि आपल्याला रंगीत दृष्टी देतो. ऱ्होडोस्पिनचा स्तर कमी होऊ शकतो आणि यामुळे ते त्यांच्या कार्यामध्ये अपयशी होऊ शकतात, जे रातआंधळेपणा म्हणून दिसून येते.

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, मॅलॅबसोर्पशन (पाचन मार्गातून पोषक तत्वांचे असाधारण शोषण) यासह कुपोषणा मुळे व्हिटॅमिन ए ची कमतरता जास्त आहे. व्हिटॅमिन ए ची कमतरता नसल्यामुळेही अशीच स्थिती आहे, ती म्हणजे रेनटायटीस पिगमेंटोसा जी जीन्समध्ये झालेल्या त्रुटीमुळे होणाऱ्या वारसागत रातआंधळेपणाचा एक प्रकार आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

रातआंधळेपणाचे निदान क्लिनिकल निष्कर्ष आणि वैद्यकीय इतिहासाद्वारे केले जाते आणि नंतर कमी सीरम व्हिटॅमिन ए स्तर, बिटोटचे स्पॉट्स आणि असामान्य इलेक्ट्रोरेटिनोग्राफी चाचणी यांच्याद्वारे कमी झालेल्या रॉडचे कार्य दर्शवून पुष्टी केली जाते.

व्हिटॅमिन ए च्या 2,00,000 आययूंना (IU) तोंडा द्वारे 3 दिवस, त्यानंतर 14 दिवसांसाठी 50,000 आययू (IU) किंवा त्यानंतर 1-4 आठवड्यानंतर अतिरिक्त डोस दिल्यानंतर अशक्तपणाचा पूर्णपणे उपचार केला जातो. व्हिटॅमिन ए च्या प्रमुख आहार स्त्रोतांमध्ये वनस्पतींचे स्रोत जसे की राजगिरा, गाजर, भोपळा शिमला मिरची, मिरची, लिंबूवर्गीय फळे, पपई, आंबा, आणि इतर लाल-पिवळे फळे आणि भाज्या यांचा समावेश आहे. अंडी आणि लोणी सारखे प्राणी स्त्रोत देखील व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहेत. जे तोंडावाटे औषधे सहन करण्यास सक्षम नाही आहेत त्यांच्यासाठी इंट्रामॅस्क्यूलर व्हिटॅमिन ए चा प्रवेश आरक्षित आहे. व्हिटॅमिन ए ची कमतरता प्रकृतीत्मक असल्याने, आय ड्रॉप्सने कोणतेही फायदे दाखवले जात नाही.

  1. रातआंधळेपणा साठी औषधे
  2. रातआंधळेपणा चे डॉक्टर
Dr. Vishakha Kapoor

Dr. Vishakha Kapoor

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Svati Bansal

Dr. Svati Bansal

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Srilathaa Gunasekaran

Dr. Srilathaa Gunasekaran

ऑपथैल्मोलॉजी

रातआंधळेपणा साठी औषधे

रातआंधळेपणा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Bjain Boerhaavia diffusa Mother Tincture QBjain Boerhaavia diffusa Mother Tincture Q 143
SBL Boerhaavia diffusa DilutionSBL Boerhaavia diffusa Dilution 1000 CH86
Schwabe Boerhaavia diffusa MTSchwabe Boerhaavia diffusa MT 68
SBL Cadmium Sulphuricum LMSBL Cadmium Sulphuricum 0/1 LM64
SBL Cadmium sulphuricum DilutionSBL Cadmium sulphuricum Dilution 1000 CH86
Aquasol AAquasol A 0.5 Miu Injection0
HycibexHYCIBEX SYRUP 100ML0
Schwabe Boerhaavia diffusa CHSchwabe Boerhaavia diffusa 1000 CH96
Schwabe Cadmium sulphuricum CHSchwabe Cadmium sulphuricum 1000 CH96
Bjain Boerhaavia diffusa DilutionBjain Boerhaavia diffusa Dilution 1000 CH63
Bjain Cadmium sulphuricum DilutionBjain Cadmium sulphuricum Dilution 1000 CH63
Abbott Vitamin A Chewable TabletVITAMIN A INJECTION 2ML0
SBL Boerhaavia diffusa Mother Tincture QSBL Boerhaavia diffusa Mother Tincture Q 76

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

  1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Xerophthalmia and night blindness for the assessment of clinical vitamin A deficiency in individuals and populations.
  2. Zobor D, Zrenner E. [Retinitis pigmentosa - a review. Pathogenesis, guidelines for diagnostics and perspectives]. Ophthalmologe. 2012 May;109(5):501-14;quiz 515. PMID: 22581051
  3. National Eye Institute. Retina | Night Blindness. National Institutes of Health
  4. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. X-linked congenital stationary night blindness
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vision - night blindness
और पढ़ें ...