myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

हेमरोयड्स किंवा मूळव्याध म्हणजे लोअर रेक्टम आणि गुदद्वारातील सुजलेल्या व फुगलेल्या नसा. थोडक्यात, त्यांना रेक्टम आणि गुदद्वारातील अपस्फित नसा (व्हॅरिकोझ वेन्स) असे म्हणतात. मूळव्याध आन्तरिक (रेक्टमच्या आत विकसित होणारे) किंवा बाह्य (गुदद्वाराशेजारील त्वचेच्या खाली असणारे) असू शकते.

मूळव्याधांची अनेक कारणे असू शकतात, पण यामागील नेमक्या कारणाची बहुधा माहिती नसते. त्याचे कारण मलनिःसारणाच्या वेळी अधिक ताण देणे किंवा गर्भावस्थेत रेक्टमच्या नसांवर दाब वाढणे असू शकते. लक्षणांमध्ये मूळव्याधाच्या तीव्रतेनुसार सौम्य खाज आणि गैरसोयीपासून अंग पुढे घसरणें याचे (प्रोलॅप्स) समावेश असू शकते. मूळव्याधावरील उपचार म्हणजे तंतूमय पदार्थ खाणें व आकस्मिक वेदनाशामक घेणें याइतके साधारण जीवनशैली परिवर्तनासंबंधी आणि गंभीर प्रसंगांमध्ये शस्त्रक्रियाही असू शकतात. मूळव्याध हा आजार जटिल होण्याची शक्यता कमी असते. तरी, उपचार ने केल्यास मूळव्याध तीव्र आणि जळजळीच्या संवेदनांनी युक्त असा होऊ शकतो आणि यामुळे थ्रॉंबोसिस (थक्का जमणे) आणि क्षता (अल्सर) ही होऊ शकतात.

मूळव्याध सामान्य प्रसंगांमध्ये धोकादायक नसून, त्रास झाल्यानेच उपचाराची गरज भासते. गर्भावस्थेत झाल्यास, बाळाच्या जन्मानंतर तो आपोआप बरा होतो. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध झाल्यास, आहार व जीवनशैली यामध्ये बदल केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. मूळव्याधाचे शस्त्रक्रियात्मक रहित करणें हे सुद्धा संतोषजनक परिणाम देऊ शकते.

 1. मूळव्याध ची लक्षणे - Symptoms of Piles in Marathi
 2. मूळव्याध चा उपचार - Treatment of Piles in Marathi
 3. मूळव्याध काय आहे - What is Piles in Marathi
 4. मूळव्याध साठी औषधे
 5. मूळव्याध चे डॉक्टर

मूळव्याध ची लक्षणे - Symptoms of Piles in Marathi

मूळव्याधाची लक्षणे:

 • मल निःसारणानंतर चकाकणारे लाल रंग टॉयलेट पेपरवर पडणे किंवा शौचालयामध्ये रक्ताचा थारोळा पडणे हे मूळव्याधाचे प्राथमिक लक्षण. असे रक्तस्राव आल्यास ते सामान्यतः वेदनारहित असते आणि रुग्णाचे शौच खूप कडक किंवा खूप मोठे असल्यासच होते.
 • गुदद्वारापासून म्यूकस सुटणें.
 • गुदद्वाराभोवतील भागाची खाज, लालसरपणा किंवा अशान्ती जाणवणें
 • मलनिःसारणानंतर सुद्धा पोटात मल असल्यासारखे वाटणे
 • मलनिःसारणाच्या वेळी वेदना
 • पुढे घसरलेल्या हॅमॅरॉयड्समध्ये, गुदद्वारातून बाहेर निघाले एक मऊ द्राक्षासारखे ढेकूळ लागते.
 • बाह्य हॅमॅरॉयड्समुळे, विशेषकरून अतिसार किंवा बद्धकोष्ठतेनंतर मध्यमामधे सूज, चुरचुर आणि गैरसोय होऊ शकते.
 • बाह्य हॅमॅरॉयड्समध्ये थक्के असल्यास, ढेकूळाची निळसर किंवा जांभळी छटा असून तो वेदनाकारक असतो, ज्यातून रक्त सुटू शकतो आणि अचानक तो गुदद्वाराच्या नेमीवर दिसू शकतो.
 • तीव्रता असल्यास, गुदद्वारामध्ये अत्यधिक रक्तस्राव, संक्रमण, हॅमॅरॉयड्स आवळले जाणें, ऍनल फिस्ट्यूला बनणें आणि मलावर नियंत्रण नसणे असे त्रास होऊ शकतात.

वेदनादायक हॅमॅरॉयड्स इतर वेदनादायक रक्रस्रावाच्या परिस्थिती उदा. एनल फिशर, क्रोन्स डिसीझ, एनल फिस्ट्यूला आणि कोलोरेक्टल कर्करोगापेक्षा वेगळे आहेत.

मूळव्याध चा उपचार - Treatment of Piles in Marathi

चीररहित उपचारांचे पर्याय

हॅमॅरॉयड्समुळे केवळ थोडीफार गैरसोय होत असल्यास, तुमचे डॉक्टर सहज मिळणारे क्रीम, ऑयंटमेंट, सपोझिटरी किंवा पॅडचा सल्ला देऊ शकतात. या उत्पादनांमध्ये वेदना व खाजेपासून तात्काळिक आराम देणारी हाइड्रोकॉर्टिसोन आणि लिडोकेनसारखी घटके असतात.

किमान-चीर उपचाराचे पर्याय

निरंतर रक्तस्राव किंवा वेदनायुक्त मूळव्याधेसाठी, कमी चीर असलेले उपचारांचे पर्याय सुचवले जातात. या पद्धतींना बहुतांशी भूलची गरज नसते आणि त्या डॉक्टरांच्या कार्यालयात केल्या जाऊ शकतात.

 • रबर बॅंड लिगेशन
  आंतरिक हॅमरॉयड्सच्या मुळाभोवती एक किंवा दोन लहान रबर बॅंड ठेवले जातात, जेणेकरून वाढलेल्या हॅमरॉयड्सचे पसार रबर बॅंड कापून टाकेल. अशा प्रकारे हॅमरॉयड लहान होतो आणि एक आठवड्याच्या आसपास पडतो. ही पद्धत खूप लोकांना चालते, तरी हॅमरॉयडला बॅंड लावल्याने गैरसोय आणि 2-4 दिवसांनी रक्तस्रावही होऊ शकतो. हे क्वचितची तीव्र असते पण काही वेळा गंभीर गुंतागुंती होतात.
 • इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी)
  या पद्धतीमध्ये, डॉक्टर प्रभावित हॅमरॉयडवर एक रासायनिक द्रावणाचे इंजेक्शन देतात. याने हॅमरॉयड तंतू संकुचन पावतो. या पद्धतीत थोडी वेदना होते किंवा होतही नाही, पण रबर बॅंड लिगेशनपेक्षा हे अधिक प्रभावी आहे.
 • घनीकरण (इंफ्रारेड, लेझर किंवा बायपोलर)
  या पद्धतीमध्ये लेजर किंवा इंफ्रारेड प्रकाश किंवा ऊष्मेचे वापर केले जाते. यामुळे लहान रक्तस्रावी आंतरिक हॅमरॉयड कडक होऊन नाहीसे होतात. घनीकरणाचे काही सहप्रभाव असूनही, रबर बॅंड उपचारापेक्षा हॅमरॉयड बरे होण्याचा दर अधिक असतो.

शस्त्रक्रिया उपचाराचे पर्याय

हॅमरॉयडसाठी शस्त्रक्रियेला हॅमरहॉयडॅक्टॉमी म्हणतात. हॅमरहॉयडॅक्टॉमी यांसाठी लागते:

 • तिसर्र्या व चवथ्या टप्प्याचे हॅमरॉयड
 • दुसर्र्या टप्प्याचे  हॅमरॉयड, जे बिगर शस्त्रक्रिया पद्धतीने बरे झाले नसतील.
 • तंतूयुक्त हॅमरॉयड.
 • आंतरिक-बाह्य हॅमरॉयड, मात्र बाह्य हॅमरॉयडची परिभाषा स्पष्ट असते.

ही शस्त्रक्रिया स्थानिक (सेडेशनसह), मज्जातंत्रामध्ये किंवा साधारण भूल देऊन केले जाते. तीव्र व पुनरावर्ती हॅमरॉयडसाठी शस्रक्रियाच सर्वांत प्रभावी उपाय आहे. रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो आणि अंदाजे 7-10 दिवसांत आपले दिनक्रम परत सुरू करू शकतो.
शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमध्ये पित्ताशय रिकामे करण्यात तात्काळिक कठिनता होऊ शकते आणि त्यामुळे मूत्रनलिकेचे संक्रमण होऊ शकते.

 • हॅमरॉयड स्टॅपलिंग (स्टॅपलड हॅमरॉयडॅक्टॉमी किंवा स्टॅपलड हॅमरॉयडोपेक्सी)
  हॅमरॉयडॅक्टॉमीला पर्याय म्हणून ही पद्धत हॅमरॉयड तंतूला रक्तप्रवाह थांबवून टाकते आणि हिचे वापर केवळ आंतरिक हॅमरॉयडमध्ये केले जाते. यामध्ये हॅमरॉयडॅक्टॉमीपेक्षा कमी वेदना होते, पण हॅमरॉयडॅक्टॉमीच्या तुळनेने पुनरावर्तनाचा  व रेक्टम पुढे घसरण्याचा अधिक धोका असतो.  तसेच, रक्तस्राव, लघवी न निघणें, वेदना आणि दुर्मिळरीत्या सेप्सिससारखे प्राणघातक रक्त संक्रमणही होते. तुमच्या डॉक्टराशी तुमच्यासाठी योग्य पर्यायांची चर्चा अवश्य करावी.

स्व-काळजी

 • बैठकी आंघोळ 
  या पद्धतीमध्ये नितंब आणि कंबरेची गरम पाण्याने आंघोळ होते, ज्याने गुदाशयातील खाजेमध्ये आणि एनल सफिंक्टर स्नायूलाही आराम मिळते. तुम्ही कमोडवर बसणारे एक लहान प्लास्टिक टब वापरू शकता किंवा काही इंच गरम पाण्याने भरलेल्या नियमित बाथटबमध्ये बसू शकता. दिवसांतून 2-3 वेळा प्रत्येक मलनिःसारणानंतर 20 मिनिटे बैठकी आंघोळ केल्याने मदत होते. त्यानंतर, गुदाशयाला जोराने पुसण्याखोडण्याएवजी हळुवारपणें सुकवावे.
 • आइस पॅक लावणें
  गुदाशयात आइस पॅक लावल्यास सूज आणि वेदनेत आराम मिळू शकते.
 • उशी/ मऊ पृष्ठभाग वापरणें
  बसण्यासाठी कडक पृष्ठभागापेक्षा उशी/ मऊ पृष्ठभाग वापरल्यास, निवर्तमान मूल्यवाधाची सूज कमी करण्यास मदत मिळते. हे नवीन हॅमॅरॉयड बनण्यापासूनही थांबवते.
 • सहज मिळणारी औषधे
  स्थानिक भूल असलेली सहज उपलब्ध हॅमॅरॉयड ऑयंटमेंट वापरल्याने वेदनेत आराम मिळते आणि याचे काही हानीकारक प्रभाव नाहीत.
 • पाय उंचावणे
  पश्चिमी पद्धतीच्या कमोडवर तुम्ही बसल्यास, स्टूल ठेवून पाय थोडे उंच राखण्याचे प्रयत्न करा. याने रेक्टमची स्थिती बदलते आणि विष्ठा सहज निघते.

मूळव्याध काय आहे - What is Piles in Marathi

मूळव्याध एक सामान्य अशी आरोग्याला भेडसावणारी समस्या आहे. हा आजार सामान्य पाहिला तर तसा गंभीर नसतो, पण खूप त्रासदायक असून जीवनाच्या गुणवत्तेवर प्रभाव पाडतो. व्यक्तीला मूळव्याध होण्याची शक्यता तिचे वय किंवा लिंग यावर आधारित नाही. तथापी, वयस्कर लोकांना याचा अधिक धोका आहे. मूळव्याध होण्याची शक्यता तशी विकसनशील देशांमध्ये कमी असते. पाश्चात्य देशांमध्ये घेतले जाणारे तंतूरहित आणि वसा अधिक असलेले आहार ताण आणि बद्धकोष्ठतेचे कारण असून, मूळव्याधाचे मूळ बनते.

मूळव्याध म्हणजे शरीरातील लोअर रेक्टम आणि गुदद्वारातील सुजलेल्या व फुगलेल्या नसा. आपल्याला हे समजणें आवश्यक आहे की, हॅमरॉयड्स सामान्य मानवी शरीररचनेचे भाग आहेत. हॅमरॉयड्स म्यूकस मेंब्रेंसखाली असलेल्या नसांची एक उशी तयार करते, जी रेक्टम याच्या सर्वांत खालील भाग आणि गुदद्वाराच्या नलिकेच्या किनारीला असते. या नसा सुजल्या-फुगल्यानेच लक्षणे दिसतात, आणि आपण म्हणतो की अमुक एकाला मूळव्याध आहे. यातील रक्तनलिकांनी रक्त परत हृदयात नेण्यासाठी निरंतर शरिरातील गुरुत्वाकर्षणाशी संघर्ष करावा लागतो.

Dr. Suraj Bhagat

Dr. Suraj Bhagat

गैस्ट्रोएंटरोलॉजी

Dr. Smruti Ranjan Mishra

Dr. Smruti Ranjan Mishra

गैस्ट्रोएंटरोलॉजी

Dr. Sankar Narayanan

Dr. Sankar Narayanan

गैस्ट्रोएंटरोलॉजी

मूळव्याध की जांच का लैब टेस्ट करवाएं

Thyroid Function Test ( T3 - T4 - TSH )

20% छूट + 10% कैशबैक

CBC (Complete Blood Count)

20% छूट + 10% कैशबैक

मूळव्याध साठी औषधे

मूळव्याध के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otorex खरीदें
Throatsil खरीदें
Aerocort खरीदें
Xylo(Astra) खरीदें
Schwabe Aesculus hippocastanum MT खरीदें
SBL Sedum acre Dilution खरीदें
Xylocaine Injection खरीदें
Schwabe Ranunculus ficaria CH खरीदें
Xylocaine Heavy खरीदें
ADEL 2 Apo-Ham Drop खरीदें
SBL Sempervivum tectorum Dilution खरीदें
Mahacal खरीदें
Xylocard खरीदें
Mama Natura Nisikind खरीदें
SBL Asclepias curassavica Dilution खरीदें
ADEL Nux Vomica Mother Tincture Q खरीदें
Xylox खरीदें
Fubac खरीदें
ADEL 32 Opsonat Drop खरीदें
Alocaine खरीदें
ADEL 33 Apo-Oedem Drop खरीदें
Schwabe Ratanhia CH खरीदें
Lcaine खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. American Society of Colon and Rectal Surgeons [internet]; Diseases & Conditions
 2. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Hemorrhoids and what to do about them. February 6, 2019. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 3. Shrivastava L, Borges GDS, Shrivastava R (2018). Clinical Efficacy of a Dual Action, Topical Anti-edematous and Antiinflammatory Device for the Treatment of External Hemorrhoids. Clin Exp Pharmacol 8: 246. doi:10.4172/2161-1459.1000246
 4. Hamilton Bailey, Christopher J. K. Bulstrode, Robert John McNeill Love, P. Ronan O'Connell. Bailey & Love's Short Practice of Surgery. 25th edition Taylor and fransis group, USA.
 5. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. 6 self-help tips for hemorrhoid flare-ups. OCTOBER 26, 2018. Harvard University, Cambridge, Massachusetts.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें