मुरुम - Pimples (Acne) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

मुरुम
मुरुम

मुरुम म्हणजे काय?

मुरुम एक सामान्य त्वचेची स्थिती आहे, जे पुरळ आणि ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स म्हणून ओळखल्या जाणा-या घावांच्या उद्रेका मूळे होते, जे चेहरा, खांदा, मान, पाठ आणि छातीवर सामान्यपणे दिसले जाते. या स्थितीमध्ये त्वचेवर कायमस्वरूपाची खूण होऊ शकते आणि त्वचेचे स्वरूप खराब करते.  आरोग्यासाठी याचा गंभीर धोका नसतो. महिलांमध्ये विशेषतः किशोरावस्थेमध्ये मुरुम सामान्य असते.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

त्वचेवर मुरुम खालील स्वरूपात प्रकट होतात:

  • व्हाइटहेड्स किंवा ब्लॅकहेड्स किंवा लहान सूज (पॅप्यूल्स).
  • लहान फोड (पस्ल्स) किंवा लालसर तळ आणि पू-भरलेला मुरुम .
  • वेदनादायक लहान गोलाकार गाठ (नोड्यूल्स) जे त्वचेवर खोलवर पसरलेले असतात आणि वण होतात.
  • गुहा किंवा सिस्ट जे मुख्यत्वे पु ने भरलेले असतात आणि त्वचेवर खुणा बरोबर ते बरे होऊ शकतात.

मुख्य कारण काय आहेत?

मुरुम येण्याचे विविध कारणांमध्ये समाविष्ट आहेत:

  • बॅक्टेरिया पी. ॲकेन ची जलद वाढ.
  • नर (अँन्ड्रोजन) आणि महिला सेक्स हार्मोन (एस्ट्रोजेन) मध्ये बदल, अवरोध आणि छिद्रमध्ये सूज उद्भवते.
  • गर्भनिरोधक गोळ्याच्या वापरामधील बदलांमुळे (प्रारंभ करणे किंवा थांबणे) आणि गर्भधारणेमूळे हार्मोनल बदल होते.
  • पॉलीसिस्टिक ओव्हरिअन डिसीज (पीसीओडी).
  • जीवनशैलीचे घटक ज्यात समाविष्ट आहे:

याचे निदान कसे केले जाते?

  • प्रभावित भागात पूर्ण तपासणी मुरुमांचे निदान करण्यात मदत करते. त्यांच्या कारणास्तव मुरुमांचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या दिल्या आहेत:
  • पीसीओएस शोधण्यासाठी ब्लड टेस्ट तसेच अल्ट्रासाऊंड स्कॅन वापरले जातात.

मुरुमांचा उपचार ही वेळ लागणारी प्रक्रिया आहे आणि अनिवार्यपणे त्वचेची चांगली देखभाल आवश्यक असते.

डॉक्टरांनी सुचवलेल्या काही प्रभावी मुरुम नियंत्रण पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे:

  • अँटिबायोटिक्सचा वापरः तोंडावाटे किंवा स्थानिक (त्वचेवर थेट लागू केला जाऊ शकतो) विरोधी दाहक प्रभाव असू शकतो आणि मुरुमांमुळे उद्भवणारे जीवाणू कमी करण्यास मदत करतो.
  • सल्लिस्लिक ॲसिड आणि बेंझॉयल पेरोक्साईडचा टोपलिकलचा वापर सामान्यतः सौम्य मुरुमांच्या उपचारांसाठी केला जातो.
  • आइसोट्रेटिनॉइन गोळ्या: गंभीर मुरुमांच्या बाबतीत हे सर्वात प्रभावी उपचार म्हणून वापरले जाते, ते अनावरोधित करतात आणि छिद्रच्या अधिक रोखतेस प्रतिबंध करतात ज्यामुळे तेलकट पणा कमी होते आणि एक सुखद प्रभाव पडतो.
  • प्रकाश किंवा बायोफोटोनिक थेरपीचा वापर सौम्य ते मध्यम दाहक मुरुमांच्या उपचारांसाठी केला जातो.
  • हार्मोन-रेग्युलेटिंग थेरपी ज्यामध्ये स्त्रियांना मुरुमांचा उपचार करण्यासाठी कमी किंवा खूप कमी डोस एस्ट्रोजेन आणि अँटी-अँन्ड्रोजनच्या गर्भनिरोधक गोळ्या समाविष्ट करतात.
  • टॉपिकल किंवा मौखिक रेटीनोइड्सचा उपयोग अनियंत्रित छिद्रासाठी तसेच नवीन अडथळ्यांना रोखण्यासाठी उपचार म्हणून केला जातो.
  • रेटीनोइड्स प्लस बेंझॉयल पेरोक्साइड संयोजन थेयरपी देखील वापरली जाऊ शकते.

काही स्व-काळजी टिप्स:

  • सौम्य 'साबण मुक्त' तरल फेस क्लीन्सरसह दररोज दोनदा स्वच्छ करणे.
  • फेस क्लीन्सर असा निवडा जे खोलपणे आणि अल्कोहोल साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उग्र पदार्थपासून मुक्त असेल.
  • फेस क्लीन्सरचा पीएच चांगले संतुलित असावे.
  • त्वचेतील लहान छिद्रांना (पोर्स) अवरोधित नाही करण्यासाठी प्रयत्न आणि चाचणी केलेले उत्पादन वापरले जावे.



संदर्भ

  1. Healthdirect Australia. Causes. Australian government: Department of Health
  2. Healthdirect Australia. Treatment . Australian government: Department of Health
  3. Healthdirect Australia. Acne during pregnancy. Australian government: Department of Health
  4. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Acne.
  5. National Institute of Arthritirs and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Acne.

मुरुम साठी औषधे

Medicines listed below are available for मुरुम. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.