पिटीरियासिस रुब्रा - Pityriasis Rubra Pilaris in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

पिटीरियासिस रुब्रा
पिटीरियासिस रुब्रा

पिटीरियासिस रुब्रा पिलारिस काय आहे?

पिटीरियासिस रुब्रा पिलारिस (पीआरपी-PRP) हा त्वचेच्या दुर्मिळ विकृतींचा समूह आहे ज्यात सूज आणि लाल रंगाच्या खवलेदार पॅच त्वचेवर दिसून येतात. पीआरपी संपूर्ण शरीरावर किंवा काही ठराविक क्षेत्रांवर जसे की पायाचा तळवा, कोपर, गुडघा आणि तळवे यांवर प्रभाव टाकू शकतो. या अवस्थेत हात आणि पाय यांची त्वचा सहसा सहभागी असते आणि जाड झालेली असते. कधीकधी, चुकीने या स्थितीचे निदान सोरायसिस म्हणून केले जाते. सर्व वयोगटातील आणि वंशातील पुरुष आणि महिला याने प्रभावित होऊ शकतात. पीआरपीच्या (PRP) प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • शास्त्रीय प्रौढ प्रारंभ.
  • शास्त्रीय किशोर प्रारंभ.
  • विशिष्ट वर्गात न बसणारे प्रौढ प्रारंभ.
  • विशिष्ट वर्गात न बसणारे किशोर प्रारंभ.
  • मर्यादा घातलेले किशोर.
  • एचआयव्ही (HIV) सोबत जोडलेले.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पीआरपीची (PRP) लक्षणे वेळानुसार प्रगती करतात आणि नखं, त्वचा, डोळे आणि म्युकस मेमब्रेनला प्रभावित करतात. लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहेत:

  • तळ हातावरची आणि पायावरची त्वचा कडक होणे.
  • नखांवर डाग पडणे, ते जाड होणे आणि गळून पडणे.
  • डोळे कोरडे पडणे.
  • केसं पातळ होणे.
  • झोपतांना त्रास होणे.
  • सततच्या वेदना.
  • खाज.
  • तोंडात चिडचिड होणे.

जरी ही गंभीर स्थिती नसली तरी पीआरपी (PRP) दैनंदिन कामात अडथळा निर्माण करते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

पीआरपी (PRP) च्या बहुतेक प्रकरणात, कारण अज्ञात असते. काही कारणांमध्ये समाविष्ट असतो:

  • अज्ञात अनुवांशिक घटक पर्यावरणीय घटकांसोबत एकत्र होतात.
  • जीन म्युटेशन.
  • असामान्य रोगप्रतिकार प्रतिसाद.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान हे सहसा त्वचेची शारीरिक तपासणी करून केले जाते ज्यात जखमांची उपस्थिती तपासली जाते. त्वचेच्या बायोप्सीचा तपास प्रभावित क्षेत्रातील त्वचा नमुना घेऊन निदान पुष्टी करण्यासाठी आणि पीआरपी (PRP) सारख्या इतर कोणत्याही त्वचेच्या स्थितीला बाहेर करण्यासाठी केला जातो.

आरोग्यसेवा प्रदाता सहसा खालील उपचारांचा सल्ला देतात :

  • यूरिया, रेटिनॉइड्स, लॅक्टिक ॲसिड आणि स्टेरॉईड्स असलेली त्वचेची मलम.
  • कोरडेपणा आणि क्रॅकिंगच्या उपचारांसाठी एक इमोलिएन्ट (त्वचा नरम होण्यास किंवा त्त्वचेला आराम मिळण्यासाठी वापरण्यात येणार कोणताही पदार्थ) कृतीसह त्वचेचे मलम निर्धारित केले आहेत.
  • आइसोट्रेटीनॉइन, मिथोट्रेकझेत किंवा एसिट्रेटिन असलेल्या तोंडी गोळ्या.
  • लाइट थेरपी ज्यामध्ये त्वचेच्या प्रभावित भागाला अल्ट्राव्हायलेट लाइट सोबत उचित प्रमाणात उघड करणे.
  • औषधं जी रोगप्रतिकारक प्रणालीला पालटू शकतात, अभ्यासांतर्गत आहेत आणि उपयुक्त ठरू शकतात.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Pityriasis rubra pilaris.
  2. National Organization for Rare Disorders [Internet]; Pityriasis rubra pilaris.
  3. Feldmeyer L, Mylonas A, et al. Interleukin 23-Helper T Cell 17 Axis as a Treatment Target for Pityriasis Rubra Pilaris.. JAMA Dermatol. 2017 Apr 1;153(4):304-308 PMID: 28122069
  4. Brown F, Badri T. Pityriasis Rubra Pilaris. [Updated 2019 Feb 22]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Ixekizumab in the Treatment of Pityriasis Rubra Pilaris (PRP).